पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | ‘फ्रंटलाइन’ या इंग्रजी पाक्षिकाला 25 वर्षे पूर्ण

‘फ्रंटलाइन’ या इंग्रजी पाक्षिकाला 25 वर्षे पूर्ण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

‘सेमिनार’ची पन्नास र्वष.. झाल्याबद्दल राम जगताप यांनी लिहिलेला ‘विश्वासार्हतेची पंचवीस र्वष’ या शीर्षकाचा लेख (बुकमार्क - 08 फेब्रुवारी, 2010) वाचला. या लेखात जगताप यांनी ‘फ्रंटलाइन’प्रमाणेच सामाजिक बांधिलकी मानणारी पत्रकारिता करणा-या ‘सेमिनार’ या इंग्रजी मासिकाचा उल्लेख केला आहे.

सेमिनारची पन्नास र्वष.. झाल्याबद्दल राम जगताप यांनी लिहिलेला विश्वासार्हतेची पंचवीस र्वष या शीर्षकाचा लेख (बुकमार्क - 08 फेब्रुवारी, 2010) वाचला. या लेखात जगताप यांनी फ्रंटलाइनप्रमाणेच सामाजिक बांधिलकी मानणारी पत्रकारिता करणा-या सेमिनार या इंग्रजी मासिकाचा उल्लेख केला आहे. सेमिनारच्या प्रकाशनाला सप्टेंबर, 2009ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. सेमिनार हे मासिक रोमेश थापर आणि राज थापर यांनी 1959मध्ये मुंबईहून प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या मासिकात सर्व प्रकारच्या विचारधारांना स्थान होते/आहे. पहिल्या वर्षाच्या अंकांमध्ये अमर्त्य सेन आणि जगदीश भगवती यांच्यासारख्या विद्वानांनी लेख लिहिले होते. त्यानंतर नीरद सी. चौधरी, के. एन. राज, जे. आर. डी. टाटा, चक्रवर्ती राज गोपालाचारी हे या मासिकात लिहीत होते. निर्मलकुमार बोस, आंद्रे बेते, ए. आर. देसाई, आशिष नंदी, सुनिल खिलनानी, रामचंद्र गुहा, प्रताप भानू मेहता, शशी थरूर, योगेंद्र यादव हे त्या काळचे तरुण लेखकही सेमिनारमध्ये लिहीत होते, आजही लिहितात. 1961 साली सेमिनारचे स्थलांतर मुंबईहून दिल्लीला करण्यात आले. रोमेश थापर यांच्यावर मार्क्‍सवादाचा प्रभाव होता. काही काळ ते इंदिरा गांधीच्या निकटवर्तीयांपैकी होते, परंतु आणीबाणीला विरोध केल्यामुळे सेमिनारला सरकारचा रोष ओढवून घ्यावा लागला. सेन्सॉरशीप मान्य करण्याऐवजी सेमिनार बंद करण्याचा निर्णय थापर बंधुंनी घेतला.

 

1987 साली काही महिन्यांच्या अंतराने राज थापर आणि रोमेश थापर यांचे निधन झाले. रोमेश थापर यांची मुलगी मालविका आणि जावई तेजबीर सिंह यांनी सेमिनार हा वडिलांचा वारसा आहे, असे समजून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याचे पुनप्र्रकाशन सप्टेंबर  1987पासून सुरू केले. सेमिनारचा वाचकवर्ग अत्यंत मर्यादित आहे. त्याच्या फक्त चार हजार प्रती छापल्या जातात. सेमिनारमध्ये कोणतेही संपादकीय नसते. एक विशिष्ट विषय दिला जातो आणि त्यावर लेखकांना आपली मते मांडण्यास सांगितले जाते.

 सेमिनारच्या प्रकाशनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली, म्हणून ऑक्टोबर, 2009 च्या शेवटच्या आठवड्यात सिमला येथील भारतीय उच्चशिक्षण संस्थेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला देशातील आणि परदेशातील अनेक बुद्धिजीवी व्यक्ती आणि संपादक उपस्थित होते. सेमिनारच्या ५१व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचा विषय होता, द रिपब्लिक ऑफ आयडियाज्. या कार्यक्रमादरम्यान सेमिनारमधील निवडक लेखांचा एक संग्रह प्रकाशित करण्यात आला. इंडियन परसुएशन्स : 50 इयर्स ऑफ सेमिनार सिलेक्टेड राइटिंग्ज संपादक : रुद्रांग्शू मुखर्जी, प्रकाशक : रोली बुक्स, असं त्याचं नाव होतं.

     

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0