‘सरस्वती पार्क’मध्ये राहणा-यांची कहाणी
अंजली जोसेफ या अवघ्या बत्तीस वय वर्षे असलेल्या तरुणीची नुकतीच ‘सरस्वती पार्क’ ही पहिली कादंबरी हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केली आहे.
अंजली जोसेफ या अवघ्या बत्तीस वय वर्षे असलेल्या तरुणीची नुकतीच ‘सरस्वती पार्क’ ही पहिली कादंबरी हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केली आहे.
पत्रकार अंजली जोसेफ यांचा जन्म मुंबईतच झाला. मल्याळी वडील आणि बंगाली-गुजराती आई यांची ही धाकटी कन्या. सात वर्षाची असतानाच ती आई-वडीलांसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकली. लंडनमध्येही काही काळ राहिली. नंतर तिने काही मुंबईत पत्रकार म्हणून काम केलं. महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत आपण काही लिहू शकतो, असं तिला वाटत नव्हतं. ती लिहायचा प्रयत्न करायची पण अनुभवाधारित लेखन तिला करता यायचं नाही. काही दिवसांनी ती एका आशियाई वर्तमानपत्राची लंडन प्रतिनिधी झाली.
अंजली 19 वर्षाची असताना तिचे आई-वडील पुन्हा भारतात परतले. त्यानंतर अंजलीने तीन वर्षे एका राष्ट्रीय प्रकाशनगृहासाठी फीचर्स रायटर म्हणून काम केले. तिसाव्या वाढदिवशी तिने कादंबरी लिहिण्याचा संकल्प केला. मग इंग्लंडला जाऊन क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला. परत मुंबईला येऊन एका मासिकासाठी संपादक म्हणून काम केले. या काळात तिने ‘सरस्वती पार्क’ ही कादंबरी लिहिली.
मोहन कारेकर हा पत्र-लेखक या कादंबरीचा नायक आहे. तो जनरल पोस्ट ऑफिसच्या बाहेर बसून काम करतो. सेंकड हँड पुस्तकांचा संग्रह करणं हा त्याचा छंद आहे. त्या पुस्तकांच्या समासात सुचलेले विचार, कल्पना आणि प्रेरणा लिहीत असतो. पण त्यातली एकही गोष्ट त्याला करता येत नाही आणि पुस्तकही लिहिता येत नाही. अंजली त्याविषयी म्हणते, The block in his head is something that a lot of people actually feel - that your own life is not the stuff of literature, since literature is somehow special, with a linear plot line and a meaning and everything that is interconnected in a way that can be perceived in a work of art. In daily life things are not so clear. Maybe it is the thought that ‘I am a small man in a big city and what do I matter anyway?’ People find it difficult, I think.”
पण पुढे फोर्टमधल्या फुटपाथवरच्या विक्रेत्यांना हटवल्यानंतर तो निरास होतो. मग तो आपली बायको लक्ष्मीसह उपनगरातल्या ‘सरस्वती पार्क’ या हाउसिंग सोसायटीत राहायला जातो. तिथे त्यांचा आशीष हा 19 वर्षाचा आणि पदवी परीक्षेला पुन्हा बसलेला नातेवाईक राहत असतो.
‘सरस्वती पार्क’ ही प्रेम आणि तेढ तसेच माणसांच्या मनातील भावनांचा वेध घेणारी कादंबरी आहे. ‘‘सरस्वती पार्कमधलं जग हे माझे आई-वडील आणि आजोबांचं आहे. बुकीश आणि बुद्धिमान अशा मध्यमवर्गीय माणसांचं. ही माणसं तुम्हाला तुमच्या अवतीभवती कुठेही भेटतात. मला माझी मुंबई जशी वाटते तशी मी या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे,’’ असे अंजली सांगते.
अंजलीच्या या पुस्तकात ती किती प्रमाणात आहे? तर या कादंबरीला तिच्या कुटुंबाचीच पार्श्वभूमी आहे. अंजलीने स्वत:ही मुंबईत काही काळ पत्रलेखक म्हणून काम केलं होतं. या कादंबरीतल्या अनेक ठिकाणी अंजली आहे. तिच्या आयुष्यातील सत्य घटनांप्रमाणे या कादंबरीतील अनेक पात्रेही खरी आहेत. पण अशी माणसं प्रत्यक्षात असू शकतात आणि नसतातही. कारण कादंबरीत ती काही जशास तशी आलेली नाहीत. मुंबईतल्या ‘सरस्वती पार्क’ या सोसायटीत राहणा-यांची ही गोष्ट आहे. त्या सोसायटीत तुम्ही राहिला असाल वा राहत असाल तर तुम्हीही या कादंबरीत असाल.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा