वर्माची नवी इनिंग
भूतानमधील सध्याचे भारताचे राजदूत पवन वर्मा हे इंग्रजीतील प्रतिष्ठित लेखक आहेत.
भूतानमधील सध्याचे भारताचे राजदूत पवन वर्मा हे इंग्रजीतील प्रतिष्ठित लेखक आहेत. त्यांच्या ‘गालिब : द मॅन, द टाइम्स’, ‘कृष्णा : द प्लेफुल डिव्हाइन’, ‘द ग्रेट इंडियन मिडल क्लास’, ‘बिइंग इंडियन’ या पुस्तकांनी मोठीच वाचकप्रियता मिळवली. ‘द ग्रेट इंडियन मिडल क्लास’ या त्यांच्या बहुचर्चित पुस्तकाचे तर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. (मराठी अनुवाद, ‘आपला थोर मध्यमवर्ग’, 2007 मध्ये प्रकाशित झाले आहे.) वर्मा आता कादंबरी लेखनाकडे वळले असून ‘व्हेन लॉस इज गेन’ ही त्यांची पहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.
दिल्लीमध्ये घडणा-या या कादंबरीचा नायक आनंद नावाचा वकील आहे. त्याला कॅन्सर या आजारानं ग्रासलं आहे. करिअरच्या सुरुवातीलाच असा मोठा आजार झाल्यानं तो उन्मळून पडतो. त्यात त्याची पत्नीही त्याला सोडून जाते. असे आघात होत असतानाच एक दिवस त्याचा डॉक्टर त्याला सांगतो की, त्याची आधीची तपासणी चुकीची होती, त्याला कॅन्सर झालेलाच नाही. मग आनंद नव्यानं आयुष्याला सुरुवात करतो. त्यासाठी तो भूतान या देशाचा प्रवास करतो. तिथे त्याला त्याची नवी साथीदार मिळते. थोडक्यात ही कादंबरी प्रेम, आशा, निराशा या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या दु:खाविषयी आहे. कथानक काहीसे सरधोपट असले तरी वर्मा यांची भाषा, निरीक्षणं आणि भूतानचं वर्णन यामुळे ही कादंबरी प्रवाही झाली आहे. समीक्षक तिची समीक्षा करतीलच पण ती कमालीची वाचनीय आणि उत्कंठावर्धक आहे, हे मात्र नक्की!
व्हेन लॉस इज गेन : पवन वर्मा
रेनट्री, दिल्ली
पाने : 208, किंमत : 395 रुपये




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा