06 February, 2012 05:30:00 AM
या कादंबरीत सुरुवातीपासून अखेपर्यंत पुस्तकांचं विश्व पसरलेलं आहे. दुर्मीळ पुस्तकविक्रेते, हाडाचे वाचक, पुस्तकसंग्राहक, संशोधक, साहित्याचे इतिहासकार यांचं हे जग आहे. त्यांच्या पुस्तका- विषयीच्या अनेक कोनांतून केलेल्या चर्चाचं हे जग आहे. युरोपातला दुर्मीळ पुस्तकांचा व्यवहार, त्यातले अनेक बारकावे यांचं हे जग आहे. त्यातल्या काही जागा आपल्याला परिचित आहेत, तर काही अपरिचित.
06 February, 2012 05:30:00 AM
उद्या, सात फेब्रुवारीला इंग्रजीतील अभिजात कादंबरीकार चार्ल्स डिकन्सच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने ‘साधना’ साप्ताहिकाच्या 11 फेब्रुवारीच्या अंकात ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी तब्बल वीस पानांचा लेख लिहिला आहे. तो मुळातूनच वाचायला हवा. त्यांच्या त्या प्रदीर्घ लेखातील हे निवडक वेचे.....
30 January, 2012 05:30:00 AM
पं. सत्यदेव दुबे यांचे अलीकडेच निधन झाले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो....
30 January, 2012 03:30:00 AM
सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे मासिक इंटेलेक्च्युअल लोकांसाठीचे आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप अतिशय गंभीर आहे. या मासिकाचा दर महिन्याचा अंक हा विशेषांकच असतो....
23 January, 2012 05:30:00 AM
डॉ. सुनीलकुमार लवटे यांचं ‘खाली जमीन वर आकाश’ हे आत्मकथन 2006 मध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये प्रकाशित झालं. 2010 पर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याचबरोबर ब्रेल, गुजराती आणि हिंदीमध्येही त्याचे अनुवाद प्रकाशित झाले. लवकरच इंग्रजी आणि तमिळ अनुवाद प्रकाशित होत आहेत. लवटे यांच्या प्रारंभिक पन्नास वर्षाची कहाणी असलेल्या या आत्मकथनाची ही नव्या आवृत्त्यांच्या निमित्तानं त्यांच्याच शब्दांत ओळख.....
23 January, 2012 05:30:00 AM
गेल्या वर्षी भारताविषयी पाच, तर चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चार महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी काही सांगू पाहणारी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत. या लेखकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि जमलंच तर त्यातून काही शिकायलाही हवं. पण त्या आधी या पुस्तकांकडे कसं पाहावं याविषयीचा हा लेख.....
16 January, 2012 05:30:00 AM
इंग्रजी सत्ता स्थिर झाल्यावर आपल्या समाजाला पाश्चात्य आणि प्रगत मूल्यांचा सामना करावा लागला. यातील एक महत्त्वाचं मूल्य म्हणजे स्त्री-पुरुष समानता. ते भारतीय समाजाला पूर्णपणे नवीन होतं....
16 January, 2012 05:30:00 AM
ग्यूरीननं आयुष्यभर मास्रेल प्रूस्तची शेकडो दुर्मीळ पुस्तकं, चित्रं, जुन्या वस्तू जमवल्या. हा संग्रह राष्ट्रीय संग्रहालयासाठी मिळवण्याच्या उद्देशानं फ्रान्सचे अध्यक्ष मितरॉँ दोन वेळा त्याच्या घरी गेले. पण त्यांना त्यानं संग्रह दाखवलादेखील नाही. विसाव्या शतकभर मास्रेल प्रूस्तवर संशोधन करणा-या, त्याची चरित्रं लिहिणा-या संशोधकांसाठी ग्यूरीननं आयुष्यभर खपून जमवलेला आणि काळजीपूर्वक जतन केलेला प्रूस्त-संग्रह हा अमूल्य ठेवा ठरला आहे....
09 January, 2012 05:30:00 AM
कार्नलिअस रायन वयाच्या 54व्या वर्षी मरण पावला. त्याच्या स्मरणशीलेवर अक्षरं कोरली आहेत, ‘रिपोर्टर.’ दुस-या महायुद्धाच्या या ‘संजया’चं हे काम पाहून मन दडपून जातं. त्यानं म्हटलं आहे, ‘मी संहार व युद्धाबद्दल लिहीत नाही तर माणसाच्या धाडस व धैर्याबद्दल लिहितो.’ मानवाच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला व मर्यादेला अंत नाही, हे रायननं लिहिलेल्या पुस्तकांवरून तर लक्षात येतंच; पण खुद्द त्याच्या पुस्तकं लिहिण्याच्या प्रयत्नातूनही लक्षात येतं....
09 January, 2012 05:30:00 AM
2008 साली नमिता गोखले आणि विल्यम डर्लीमप्ले यांच्या पुढाकारानं सुरू झालेला जयपूर लिटरेचर फेस्टिवल अवघ्या चार वर्षातच आशियातला सर्वात मोठा साहित्य महोत्सव ठरू पाहतो आहे. या वर्षी हा महोत्सव 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. ...