PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क सार्वभौम लोकशाहीचं प्रतीक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 21 May, 2012 08:45:00 AM आजवर भारत आणि भारतीय लोकशाहीविषयी कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांचं संसदेच्या साठीनिमित्त स्मरण करणं, वाचन करणं आणि भारतीय लोकशाही सामंजस्यानं समजून घेणं, हे आपल्या अधिक हिताचं आहे आणि लोकशाही भारताचा नागरिक म्हणून कर्तव्यही आहे. मंटो, असे नि तसे! ================================================================================ प्रहार on 21 May, 2012 08:15:00 AM उर्दूमधील प्रसिद्ध कथाकार सआदत हसन मंटो यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 11 मे पासून सुरुवात झाली आहे. मंटो यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा वाचणं, पुन्हा पुन्हा वाचणं हा सर्वात चांगला आणि निधरेक मार्ग आहे. उर्दू आणि हिंदीमध्ये मंटोविषयी बरंच लिहिलं गेलं आहे. उपेंद्रनाथ अश्क यांनी तर ‘मंटो : मेरा दुश्मन’ या नावानं एक पुस्तकच लिहिलं आहे. या पुस्तकाशिवाय मंटो यांना समजून घेता येत नाही इतकं ते महत्त्वाचं आहे. कृष्णचंदर आणि इस्मत चुगताई यांनीही मंटोंवर खूप छान पद्धतीनं लिहिलं आहे. कृष्णचंदर यांचं व्यक्तिचित्र मंटोला न्याय देणारं आहे. फार पूर्वी ‘सारिका’ या कमलेश्वर संपादित करत असलेल्या मासिकामध्ये ‘मेरा दोस्त, मेरा दुश्मन’ अशी लेखमाला येत असे. त्यात मंटो यांनी चुगताईंवर तर चुगताई यांनी मंटोंवर लिहिलं होतं. इथं कृष्णचंदर यांच्या लेखातील दोन किस्से देत आहोत. ज्यातून मंटोंच्या व्यक्तिमत्त्वाचं ओझरतं दर्शनं व्हायला मदत होते. मोठ्या राजकीय नेत्यांची साधी चरित्रंही नाहीत! ================================================================================ प्रहार on 21 May, 2012 08:05:00 AM मोबाईल क्रांती झाल्यानंतर एसएमएसद्वारे बातमी पाठवल्यास ती सेवा होऊ शकते, या कल्पनेतून पुण्याच्या चिंतन ग्रुपनं जगातील पहिली ‘एसएमएस न्यूज सव्‍‌र्हिस’ सुरू केली. तेव्हापासून राज्यातील व केंद्रातील अनेक राजकीय नेते व प्रशासनातील अधिका-यांना चिंतन ग्रुपच्या माध्यमातून मदत होत आहे. गेल्याच महिन्यात चिंतन ग्रुपतर्फे ज्येष्ठ कवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणा-या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्तानं चिंतन ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य संपादक अभिनंदन थोरात यांच्याशी विधात्री कीर्तने यांनी केलेली बातचीत. जे सांगायला हवंच! ================================================================================ गुंटर ग्रास on 07 May, 2012 05:15:00 AM का बसता आहात चूपचाप युद्धाच्या खेळात जे उघड घडत असते, किती काळापासून का लपवता आहात ते जे संपल्यावर, जे वाचतील ते जास्तीत जास्त केवळ दुर्लक्षित राहतील.... कवितेला घाबरलेला देश ================================================================================ श्रीपाद भालचंद्र जोशी on 07 May, 2012 09:20:00 AM कवी, कविता आणि त्याचा शब्द ही काय चीज असते, याचा पुन:प्रत्यय गुंटर ग्रास यांच्या ‘जे सांगायला हवंच’ (What must be said) या कवितेचे जे पडसाद उमटले व त्याचे जे परिणाम होत आहेत, त्याने पुन: एकदा जगाला आणून दिला आहे. या प्रसंगातून भारतीय कलावंत-लेखकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. म्हणून ग्रास यांच्या कवितेचा अनुवाद आणि त्याविषयीचे टिपण प्रकाशित केले आहे. इतिहासाला वाळवी लागतेय.. ================================================================================ दिनयार पटेल on 07 May, 2012 09:05:00 AM भारतीय ग्रंथालयं आणि पुरातत्त्व विभागाकडे प्रचंड क्षमता आहे. जगातील काही महत्त्वाचे आणि मौल्यवान दस्तऐवज भारताकडे आहेत. पात्र संचालक, दर्जेदार कर्मचारी वर्ग, योग्य सोयीसुविधा मिळाल्यास भारतीय संस्था आंतराष्ट्रीय मान्यताप्रप्त संस्थामध्ये स्थान मिळवू शकतात. मुंबईचं वेगळं दर्शन ================================================================================ प्रहार on 30 April, 2012 08:50:00 AM जेरी पिंटो हे नाव आता मुंबईकरांना तसं फारसं अपरिचित असण्याचं कारण नाही. जेरी शिक्षक, पत्रकार आणि लेखक आहे. सध्या MelJol या मुलांच्या हक्कासाठी काम करणा-या एनजीओबरोबर काम करतो आहे. ‘वर्ल्ड लिटरेचर टुडे’चा 350वा अंक ================================================================================ प्रहार on 30 April, 2012 08:40:00 AM ‘वर्ल्ड लिटरेचर टुडे’ हे जगातलं ते एक अव्वल दर्जाचं द्वैमासिक. या द्वैमासिकाचा साडेतीनशेवा अंक प्रसिद्ध होतोय. रूप पाहता लोचनी.. ================================================================================ प्रहार on 30 April, 2012 08:25:00 AM ताजमहाल हे जगातलं सातवं आश्चर्य वगैरे हे काही आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. ते सर्वाना ठाऊक असतं. शहाजहाननं त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ही वास्तू उभारली ही गोष्टही सर्वाना माहीत असते. पुस्तकांच्या चेह-याची गोष्ट ================================================================================ नीतीन रिंढे on 30 April, 2012 08:15:00 AM अ‍ॅलन पॉवर्स यांनी ‘फ्रंट कव्हर’ या पुस्तकातून मुखपृष्ठांचा हा इतिहास कालानुक्रमे उलगडला आहे. पण या इतिहासाची क्षेत्रमर्यादा पुस्तकं आणि साहित्य-चित्रकलेतल्या स्थित्यंतरांपुरतीच सीमित नाही. विसाव्या शतकात सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांत दडलेली पुस्तकांच्या इतिहासाची मूळंही त्यांनी दाखवली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, दोन महायुद्धांच्या दरम्यान चित्रकारांना चित्रकलेसाठीचं साहित्य पुरेशा प्रमाणात मिळेना किंवा त्यांची चित्रं विकली जाईनात. अशा परिस्थितीत हे चित्रकार पुस्तकांच्या मुखपृष्ठरचनेकडे वळले.