07 February, 2011 07:30:00 AM
‘भारतीय नारी’ म्हणत स्त्रियांचा खोटा गौरव करण्यात मन्नूजींनी कधीच धन्यता मानली नाही. एकाची भोगवती बनून अन्य साऱ्या मानवी नरसृष्टीला स्त्री ही का म्हणून उष्टी वाटते, हा प्रश्न त्यांच्या एकूणच लेखनात ठसठसत राहिला आहे. योनिशुचिता हाच एकमेव आपल्या नैतिकतेचा मापदंड असावा, याचे त्यांना आश्चर्य वाटते. स्त्रीच्या शीलाला काचेची उपमा द्यायची आणि तिला तडा-ओरखडा गेला- तोही पुरुषाकडूनच; तर तिला ‘पतिता’ म्हणून संबोधायचे, हा कसला पुरुषार्थ, ही मन्नूजींची भूमिका केवढी तरी अंतर्मुख करणारी आहे.
31 January, 2011 04:45:00 AM
हिंदीतील प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार नागार्जुन यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या वाङमयीन योगदानाचा आलेख चितारणारा हा विशेष लेख.
...
31 January, 2011 04:30:00 AM
रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद शारदा साठे यांनी केला आहे. तो लवकरच मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होतोय. या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील हा काही भाग.. बुकमार्कच्या वाचकांसाठी
...
24 January, 2011 05:30:00 AM
‘कलेला राजकारणाशी कोणतंही कर्तव्य नसावं, हे मतही एका राजकीय भूमिकेतूनच आलेलं आहे’, असं सांगणारा जॉर्ज ऑर्वेल लिखाणातून आपली राजकीय मतं नि:संदिग्धपणे मांडत आला. पण हे करताना त्यातलं कलात्मक मूल्य हरवू न देणंही त्याच्यासाठी तितकंच महत्त्वाचं राहिलं. सुरुवातीच्या भाबडय़ा लिखाणापासून अधिकाधिक प्रगल्भतेकडे ऑर्वेलची झालेली वाटचाल या निबंधातून स्पष्ट दिसते. त्याच्या लिखाणामागच्या हेतूंचा ऊहापोह प्रस्तुत निबंधात आहे. स्वभावत: अलंकारिक, वर्णनप्रिय, शब्दांचं सौंदर्य असणारी शैली त्याला प्रिय असली तरीही काळाशी इमान राखून ठाम राजकीय भूमिका मांडण्याची गरजही त्याला तितकीच महत्त्वाची वाटे. कालच्या 21 जानेवारीला ऑर्वेलच्या निधनाला साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्याच्या ‘व्हाय आय राईट?’ या निबंधाचा हा अनुवाद. ऑर्वेलच्या साहित्यकृतींचे संदर्भ आता बदलले आहेत, पण लिखाणामागचे हेतू तपासून बघण्याची गरज वाटणा-यांसाठी हा त्याचा निबंध आजही मार्गदर्शक ठरू शकेल. आणि लेखन का करावं, कसं करावं आणि कशासाठी करावं याचा वस्तुपाठ मानायलाही हरकत नसावी.
...
17 January, 2011 05:00:00 AM
संजीव हे हिंदीतले आघाडीचे कथाकार आणि ‘हंस’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. अलीकडेच ते महाराष्ट्रात आले होते. त्या वेळी त्यांनी हिंदीतल्या कथावाङ्मयाचा विस्तृत आणि परखड आढावा घेतला, त्यातून हिंदी कथा समजून घ्यायला मदत होते. त्याचा हा अनुवाद.
...
17 January, 2011 04:30:00 AM
एक नवा प्रयत्न काही अनिवासी भारतीय आणि भारतीय मित्रांनी ‘otherwise’ या नव्या नियतकालिकाच्या निमित्ताने सुरू केला आहे. आणि म्हणून तो दखलपात्र आहे. A socio-literary effort of of friends from USA and India ’ अशी या नियतकालिकाची टॅगलाईन आहे...
10 January, 2011 05:30:00 AM
कालानुरूप बदलत गेलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात अधिक संपत्तीसंचय करणाऱ्या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण या पुस्तकात असल्याचा दावा क्रॉसेन यांनी केला आहे. मात्र त्यांनी जगातल्या श्रीमंतांच्या इतिहासाचा श्रीगणेशा गझनीच्या महमूदापासूनच का सुरू केला, याचे उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही....
10 January, 2011 05:30:00 AM
हिंदी-ऊर्दूतले प्रेमचंद यांच्यानंतरचे लक्षणीय कथाकार म्हणून उपेन्द्रनाथ अश्क (1910-1996) यांचं नाव आदरानं घेतलं जातं. माणसांच्या नियतीचे गूढ प्रश्न, जीवनातील अंतर्विरोध, मध्यमवर्गीय माणसांच्या दैनंदिन आयुष्यातील पेचप्रसंग आणि जगण्याचा प्रत्येक पैलू जाणून घेण्याची अश्क यांची ईर्षा यामुळे त्यांच्या कथा लक्षणीय ठरतात. ‘नया ज्ञानोदय’च्या डिसेंबरच्या अंकात अश्क यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एका विशेष विभागाचे आयोजन केले आहे. त्यात ‘नया ज्ञानोदय’चे संपादक रवीन्द्र कालिया यांनी अश्क यांच्यावर लिहिलेल्या लेखाचा हा अनुवादित आणि संपादित भाग. एका ज्येष्ठ लेखकाविषयी दुस-या एका लेखकाने लिहिलेला हा लेख साहित्यिक व्यक्तिचित्राचा उत्तम नमुना ठरावा....
03 January, 2011 05:30:00 AM
अनुवादक हा एका अर्थानं लमाण असतो, इथला माल तिथे पोचवणारा. स्वत:चं काही म्हणायची मुभा नाही, पण मुळातलं चोख पोचवण्याची जबाबदारी! या दोन मर्यादांमध्ये राहून मुळातला आशय, भाव, शैली, टोन सगळं पोचवणं ही तारेवरची कसरत असते. सर्जनशील लेखनात तर ती फारच अवघड होऊन बसते. मात्र त्यावर मात करून अधिकाधिक चांगले अनुवाद करणं ही एक सहनिर्मिती असते. अशाच एका अनुवादकाचं हे मनोगत. मुंबईत आठ-नऊ जानेवारीला होणा-या ‘पाचव्या आंतरभारती साहित्य संवादा’च्या निमित्ताने..
...
03 January, 2011 05:30:00 AM
ग्रामीण समाज-संस्कारांमध्ये वाढलेल्या केदारनाथांचे व्यक्तिमत्त्व एकदम साधे आणि पारदर्शक आहे. त्यांच्या काव्यातील लोकजीवनाविषयीचा लळा-जिव्हाळा व कळवळा नितांत उत्स्फूर्त आणि अस्सल असाच. आधुनिकता आणि भारतीय परंपरा यांच्यामध्ये त्यांनी साधलेला समन्वय तर थक्क करून टाकणारा. ...