PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क माफिया डॉन्स नव्हे, अंडरवर्ल्ड क्वीन्स! ================================================================================ सायली परांजपे on 30 May, 2011 05:30:00 AM अंडरवर्ल्ड क्वीन्सच्या या कहाण्या सांगण्यासाठी झैदी यांनी अनेकदा चित्रपटाच्या पटकथेची शैली वापरली आहे. फ्लॅशबॅकसारख्या तंत्रांचा मुक्त वापर केला आहे. पटकथेची कथनशैली पुस्तकात वापरायची असेल, तर चित्रदर्शी भाषा ही सर्वात मोठी गरज असते. शब्द चित्रांचं रूप घेऊन वाचकाच्या डोळ्यासमोर उभे राहू शकत असतील, तरच ही शैली प्रभावी ठरते. याबाबतीत झैदी पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. या पुस्तकाची पानं उलगडताना एखाद्या चित्रपटाची रिळंच उलगडली जात आहेत, असा भास होतो. काँक्रिटच्या जंगलात हरवलेलं शहर ================================================================================ प्रहार on 30 May, 2011 05:30:00 AM जितेन्द्र भाटिया हे हिंदीमधील आघाडीचे लेखक काही वर्षे मुंबईमध्ये होते. नुकताच त्यांनी मुंबई शहराबद्दल कोलकात्याच्या भाषा परिषदेच्या ‘वागर्थ’ या मासिकामध्ये दीर्घ लेख लिहिला आहे. त्यांची मुंबई आजची नाही, ती कालची आहे. त्याबद्दलचा नॉस्टॅल्जिया आणि आजच्या मुंबईबद्दलचं संवेदनशील ममत्व या त्यांच्या लेखातून दृग्गोचर होतं. त्यांच्या मूळ दीर्घ लेखातील हा काही संपादित भाग.. बाईलवेडा आणि पुस्तकवेडाही ================================================================================ नीतीन रिंढे on 23 May, 2011 06:00:00 AM मिश्किल भाषाशैलीचा वापर करून, आपलं पुस्तक कुठेही गंभीर होणार नाही याची दक्षता हॅमिल्टनने घेतली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला आल्डस हक्सले याचं ‘द प्रॉपर स्टडी ऑफ मॅनकाइंड इज बुक्स’ हे वाक्य उद्धृत करण्याआधीच हॅमिल्टन त्याला पुस्ती जोडतो - ‘पुस्तकं, वाचन आणि लोक यांचा अभ्यास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना गंभीरपणे न घेणं.’ आपल्या पुस्तकाच्या वाचनामुळे वाचकाने अजिबात गंभीर बनू नये याची काळजी स्वत: हॅमिल्टननेदेखील घेतली आहे. नेहरूः आधुनिक भारताचे शिल्पकार ================================================================================ अविनाश कोल्हे on 23 May, 2011 06:00:00 AM नयनतारा सहगल यांनी लिहिलेलं पंडित नेहरूंचं हे चरित्र अगदी वेगळं आहे. सहगल यांनी नेहरूंना प्रत्यक्ष बघितलं, त्या त्यांच्या सहवासात वाढल्या. त्यामुळे यातून नेहरूंची विचार करण्याची पद्धत, त्यांना कोणत्या गोष्टी प्रिय होत्या, ते कोणत्या मूल्यांशी प्रामाणिक होते वगरे गोष्टी आणि पर्यायाने नेहरू सामग्र्याने समजण्यास मदत होते. परंपरेसवे नवता ================================================================================ डॉ. राम पंडित on 16 May, 2011 08:25:00 AM उर्दू कवी आणि शायर शहरयार यांना अलीकडेच ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ‘जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने, इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने’ अशा अप्रतिम गज़्‍ाला लिहिणाऱ्या शहरयार यांचे ‘इस्म-ए-आजम’, ‘सातवां दर’, ‘हिज्र के मौसम’, ‘ख्म्वाब का दर बंद है’, ‘नींद की किरचें’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद उर्दूचे अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी ‘शहरयारची कविता’ या नावाने केला आहे. त्यानिमित्ताने शहरयार यांच्या कवितेची ही ओळख. लघुकथेची मिराशी ================================================================================ एलिझाबेथ बॉवेन on 16 May, 2011 07:45:00 AM ‘दि फेबर बुक ऑफ मॉडर्न शॉर्ट स्टोरी’ हे नवकथांचं पुस्तक एलिझाबेथ बॉवेन यांनी1937साली संपादित केलं होतं. त्यातल्या दीर्घ प्रस्तावनेत त्यांनी नवकथेच्या प्रेरणा आणि तिचे स्वरूप याविषयी मांडणी करताना चेकॉव्ह आणि मोपाँसा यांना आधुनिक लघुकथेच्या जनकत्वाचा मान दिला. नुकताच पाश्चात्य भाषांतील निवडक कथांचा तारा वनारसे यांनी ‘गुप्त वरदान’ (पॉप्युलर प्रकाशन) या नावाने मराठी अनुवाद केला आहे. त्याला त्यांनी मुद्दाम एलिझाबेथ बॉवेन यांच्या वरील निबंधाची जोड दिली आहे. त्यातील हा काही भाग. हा निबंध आजची भारतीय लघुकथा, मराठी नवकथा यांच्या संदर्भातही पडताळून पाहण्यासारखा आहे. नाहिशा झालेल्या पुस्तकांचा इतिहास ================================================================================ नीतीन रिंढे on 09 May, 2011 09:00:00 AM लहान वयापासून झपाटल्यासारखी पुस्तकं वाचत सुटलेल्या स्टुअर्ट केलीला वयाच्या पंधराव्या वर्षी एका विदारक सत्याचा साक्षात्कार झाला- ‘जगातली काही पुस्तकं कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हाती कधीच लागणार नाहीत.’ एखादा लेखक हाती घेतला की त्याची सर्व पुस्तकं मिळवायची आणि तो संपूर्ण वाचायचा, असा नाद त्याला होता. बौद्धिक आनंद देणारा लेखसंग्रह ================================================================================ अविनाश कोल्हे on 09 May, 2011 08:30:00 AM अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचे संबंध घनिष्ठ असतात. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अशोक मित्रा. ते मार्क्‍सवादी आहेत. हा उल्लेख महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांच्या विवेचनाची दिशा स्पष्ट होते. अभिमन्यू अनत नावाचा प्रवासी पक्षी ================================================================================ वसंत केशव पाटील on 02 May, 2011 04:30:00 AM ‘वसंत’ या नियतकालिकाच्या माध्यमातून अभिमन्यू अनतांनी मॉरिशसमधील हिंदी लेखकांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी कित्येक लेखकांना भारतीय प्रकाशकही मिळवून दिले. मॉरिशसमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात येतं. याचा एकंदर वाचन-लेखन संस्कृतीवर चांगला परिणाम झाला आहे, असं त्यांना वाटतं. भारतीय साहित्य-संस्कृतीबद्दल अनतांना मोठी ओढ आहे. धर्मापेक्षा संस्कृती ही मोठी गोष्ट आहे असं ते मानतात. कारण धर्मामुळे भेदांची पेरणी होते. पंजाबी साहित्यः नव्या युगाची आव्हाने ================================================================================ जसविंदर सिंग on 02 May, 2011 04:30:00 AM समकालीन पंजाबी कादंब-या आणि कथांनी केवळ नव्या वाटाच चोखाळल्या नाहीत तर जागतिकीकरणाचे ताणेबाणे चांगल्या प्रकारे पकडण्याचं काम केलं आहे. त्यात जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक संकटांविषयी त्यांनी हाकारा दिला आहे, आणि बदलाच्या दिशा आणि दशाही रेखाटल्या आहेत.