पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

कल्पनेच्या विश्वातून वास्तवाचे भान

27 December, 2010 05:30:00 AM
नवी दिल्ली येथील गालिब अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘गालिब पुरस्कार’ यंदा औरंगाबादचे शायर बशर नवाज्म यांना जाहीर झाला असून 31 डिसेंबरला तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने, या शायराची ओळख..
image

इतिहास आणि कल्पनांचं नवं व्याख्यान

27 December, 2010 05:30:00 AM हिंदीमध्ये केवळ साहित्याला वाहिलेली, उत्तम निर्मिती मूल्य आणि तरीही अल्प किंमतीत उपलब्ध असलेली अनेक नियतकालिकं आहेत. वध्र्याच्या ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालया’च्या वतीनं प्रकाशित होत असलेलं ‘पुस्तक-वार्ता’ त्यापैकीच एक. नवनव्या कल्पनांचा पाठपुरावा आणि सर्वोत्तम अंक काढण्याशी बांधिलकी हे ‘पुस्तक-वार्ता’चं वैशिष्टय़ आहे. या द्वैमासिकात सप्टेंबर-ऑक्टोबरच्या अंकात ‘वाज़िद अलीशाह’ या कादंबरीच्या निमित्तानं हिंदीतल्या ऐतिहासिक कादंब-यांचाही थोडक्यात आढावा घेतला आहे. त्या लेखाचा हा स्वैर अनुवाद....
आणखी वाचा
image

कथेबद्दल बोलू काही...

13 December, 2010 05:30:00 AM कथा या प्रकाराच्या शक्यतांबद्दल आणि शक्ती/मर्यादांबद्दल बोलणे सुरू होण्याआधीच काही बंधने आलेली असतात! ‘वर्गीकरण कशाला?’ हा आस्वादकी प्रश्न, ‘कथा म्हणजे घटनाच, काळाचे कथन नव्हे’ असे गांभीर्याचा आव आणणारे आक्षेप आणि ‘जीव लहान’ म्हणून कथा या प्रकाराकडे होणारे दुर्लक्ष.. या बंधनांतून सुटण्याचा वादातीत मार्ग शोधण्यासाठी अभ्यासकांकडेच पाहावे लागते. कथनात्म साहित्याबद्दल काही आग्रह कायम ठेवणे आणि प्रयोग स्वीकारण्याची तयारी नसणे, हे ‘ग्रीक कोरसनाटय़च खरे; शेक्सपिअर कसला?’ असे म्हणण्यासारखे ठरू शकते. पण प्रयोगांकडे कसे पाहायचे? ...
आणखी वाचा

क्रायटन ब्रँड कॉकटेल

13 December, 2010 05:30:00 AM मायकेल क्रायटनचं नाव गाजायला लागलं, कादंब-या तुफान खपायला लागल्या आणि स्वत: क्रायटनलाही त्याच्यापुरता बेस्टसेलर कादंबरीचा फॉर्म्युला सापडला होता. फॅक्ट्स आणि फिक्शन म्हणजेच सत्य, वास्तव, शास्त्रीय माहिती आणि ऐकीव, सांगोवांगीच्या गोष्टी, दंतकथा यांचे दंग करणारे कॉकटेल तो वाचकांना देत होता....
आणखी वाचा
image

व्यक्तिरेखे, व्यक्तिरेखे कुठे भरकटलीस?

06 December, 2010 05:30:00 AM उर्मिला देशपांडे यांची ‘काश्मीर ब्लूज’ ही दुसरी कादंबरी. आधी मॉडेलिंग/ जाहिरात क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या या लेखिकेची ओळख ‘गौरी देशपांडे यांची मुलगी’ अशी कधीच नव्हती.. पण ताज्या कादंबरीच्या संदर्भात, गौरी देशपांडे यांच्या एका विधानाची साक्ष उर्मिला यांनी काढली. त्याच आधारानं कादंबरी वाचल्यास काय दिसतं? आईच्या लेखनप्रभावापासून पूर्णपणे अलिप्त आणि सरळ इंग्रजीतून लेखनाला सुरुवात करणा-या या लेखिकेला व्यक्तिरेखा महत्त्वाच्या वाटतात की कथानकातल्या अगम्य कलाटण्या? ‘बुकमार्क’च्या वाचकांसाठी ही उलटतपासणी.....
आणखी वाचा

विचारांचे भूकलाडू-तहानलाडू

06 December, 2010 05:30:00 AM ‘अंतर्नाद’ या मराठी मासिकाचे संस्थापक-संपादक भानू काळे हे या इंग्रजी त्रमासिकाचे संपादक. पहिल्याच अंकाची मुखपृष्ठकथा ‘फेसेस ऑफ चेंज’अशी आहे आणि सामाजिक वास्तवाचा अभ्यास करून त्यात बदल घडवण्यासाठी काम करणा-या नऊ तरुणांची ओळख त्यातून होते. भारतातल्या एकंदर आठ राज्यांतल्या सोशल एंटरप्राइज, सरकारी सेवा, सामाजिक कार्य, कला आदी क्षेत्रातल्या घडामोडींचा मागोवा आठ लेखांमधून मिळतो. ...
आणखी वाचा
image

अंदाजांना सत्यात उतरवणारी कादंबरी

29 November, 2010 05:30:00 AM फ्रेड हॉयल हे नाव जयंत नारळीकरांशी जोडले असल्याकारणाने अनेक भारतीयांना ते परिचित आहेत. या दोघांनी मिळून अनेक प्रस्थापित कल्पनांना धक्का दिलेला आहे व नवी मत-मतांतरे मांडलेली आहेत. फ्रेड हॉयल यांची ‘द ब्लॅक क्लाउड’ ही कादंबरी वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित आहे. वैज्ञानिक व त्यांचे वैज्ञानिक विश्व हे एक अजब रसायन आहे. अगदी ‘इंटॉक्सीकेटिंग’. त्या जगताची नशा काही वेगळीच असते. विश्वाची रहस्ये पहिल्यांदा त्यांच्या समोरच उलगडतात व त्या नंतर सामान्य जनतेच्या समाजमनात अवतरतात....
आणखी वाचा

कथांचा राजा

29 November, 2010 05:30:00 AM सामाजिक विषमता व अन्याय- अत्याचार आणि परिणामी होणारं निर्भय शोषण याबद्दल आंतरिक चीड असणारे रामाराव हे पीडल्या- पिचलेल्यांची, रंजल्या- गांजलेल्यांची वकिली करताना अंतर्मनातून असे काही उसळतात की वाचकातील न्यायाधीश त्यांच्याच बाजूनं आपला कौल देऊन टाकतो. त्यामुळेच अनेक समीक्षकांनी त्यांची तुलना हिंदीतील फणीश्वरनाथ रेणू आणि प्रसंगी मुन्शी प्रेमचंद यांच्याशीही केली आहे....
आणखी वाचा

...मेरे लिखे को आग लगे

29 November, 2010 05:30:00 AM कविता माणसांच्या सा-या दु:खांना मांडण्याचं काम करत असते आणि तसं होत नसेल तर कवितेच्या कवीपणाबद्दल मंडलोई यांना संशय येतो. म्हणूनच विष्णु नागर म्हणतात, ‘‘इस कविता संकलन में निश्चित रूप से कवि अपनी बनी-बनाई मूर्ति को ढहाता है और नई गढम्ता है लेकिन उसे भी अगली बार तोडने की प्रतिज्ञा के साथ.’’ ...
आणखी वाचा
image

जीवनाचा महाभाष्यकार

22 November, 2010 05:30:00 AM जगप्रसिद्ध लेखक, थोर कादंबरीकार, तत्त्वज्ञ लियो टॉलस्टॉयच्या मृत्यूनंतर शंभर वर्षानीदेखील त्याच्या लिखाणाचा, विचारांचा प्रभाव प्रकर्षानं जाणवतो. त्यातून त्याच्या विचारांची सार्वकालिकताच सिद्ध होते. युद्धातला फोलपणा, समाजातला ढोंगीपणा, खोटेपणा याचा त्याला तिटकारा होता, तर अहिंसा, सत्याग्रह, साधी राहणी, शाकाहार यांचा तो पुरस्कर्ता होता. त्या टॉलस्टॉयचा परवाच 100वा स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 298 | displaying: 101 - 110