PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क पुस्तकांची असोशी ================================================================================ नीतीन रिंढे on 25 April, 2011 07:30:00 AM 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. त्यानिमित्तानं पुस्तक-संग्राहक, पुस्तकवेडे आणि वाचनवेडय़ांचा परिचय करून देणारे, आणि पुस्तकांची महती सांगणारे हे दोन विशेष लेख. ‘अ पॅशन फॉर बुक्स’ या पुस्तकाला खरं तर वाचनवेडय़ांचं ‘बायबल’ म्हणायला हवं; तर अ‍ॅनी फॅडिमनचं पुस्तक हे तिचं पुस्तकांविषयीचं कन्फेशन आहे. पुस्तकांचं एक घर बांधून त्यातच राहावं.. ================================================================================ चैताली भोगले on 25 April, 2011 08:05:00 AM व्हर्जिनिया वूल्फनं कॉमन रीडरचं केलेलं हे वर्णन ‘एक्स लिब्रिस’ या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अ‍ॅनी फॅडिमन यांनी उद्धृत केलं आहे. एरवी विसंगती आणि अपूर्णत्वाशी झगडणा-या वाचकाला पुस्तकांच्या सान्निध्यात मिळणारं पूर्णत्व ही पुस्तकांची सगळ्यात मोठी देणगी असते हे खरंच. आणि कुणी अगदी समीक्षक किंवा विद्वान असलं तरीही पुस्तकांपाशी जाताना मात्र असं सर्वसामान्य वाचक बनून गेलं तरच त्यांची भेट होण्याची शक्यता जास्त. म्हणूनच एरवी स्वत: लेखक असूनही अ‍ॅनी फॅडिमन यांनी या छोटेखानी पुस्तकाला ‘कन्फेशन्स ऑफ अ कॉमन रीडर’ असं म्हटलं आहे. त्यामुळेच पुस्तकांवर अंतर्बाह्य प्रेम करणा-या प्रत्येकाला हे पुस्तक आवडेल, इतकंच नाही तर आपलंच वाटेल. कहाणी दलाई लामांच्या संघर्षाची ================================================================================ अविनाश कोल्हे on 18 April, 2011 05:30:00 AM आज एकविसाव्या शतकाच्या दुस-या दशकात प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा तिबेटची समस्या जगासमोर येत आहे. या समस्येभोवती काही मूलभूत तत्त्वं आहेत- सांस्कृतिक स्वायत्तता म्हणजे काय? राजकीय अधिकार आणि सांस्कृतिक अधिकार, धार्मिक अधिकार यांच्यातील सीमारेषा कशा आखायच्या वगरे प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत. त्या दृष्टीने तिबेट हा चिमुकला देश महत्त्वाचा ठरणार आहे. लढाई विनायक सेनची ================================================================================ सायली परांजपे on 18 April, 2011 05:30:00 AM या पुस्तकाचा विषय डॉ. सेन यांच्यावर छत्तीसगढ सरकारनं लावलेल्या आरोपांचं खंडन हा असला तरी विनायक सेन यांनी अगदी ग्रासरूट लेव्हलवर केलेल्या कामाची ओळख करून देण्याचं मोठं काम या पुस्तकानं केलं आहे. डॉ. सेन यांना शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी, ते जामिनावर सुटलेले असताना, त्यांच्याशी तसंच त्यांच्या आसपासच्या लोकांशी बोलून लिहिलेलं हे पुस्तक आहे. डॉ. विनायक सेन यांचा उल्लेख मानवी हक्क कार्यकर्ते असा होत असला, तरी हा माणूस मुळात एक डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ आहे आणि छत्तीसगढमधल्या ग्रामीण आरोग्यसेवेत या माणसाचा अमूल्य वाटा आहे, ही बाब आजही या क्षेत्रातले लोक सोडता इतरांना फारशी माहीत नाही. पुस्तकं स्वतःविषयी बोलतात तेव्हा... ================================================================================ नीतीन रिंढे on 11 April, 2011 05:30:00 AM अ‍ॅनी फॅडिमन लग्न करते तेव्हा तिच्या ग्रंथसंग्रहाचंही नव-याच्या ग्रंथसंग्रहासोबत लग्न करावं लागतं. अल्बेर्तो मँग्युएलच्या ग्रंथसंग्रहातली पुस्तकं रात्री आपापसांत कुजबुजतात. कार्लोस लुईस झाफोनच्या ‘द शडो आफ द विन्ड’ या कादंबरीतल्या लिस्बन शहरात विस्मरणात गेलेल्या पुस्तकांचं एक कबरस्थान असतं. कार्लोस मारिया डॉमिन्गूजच्या ‘द हाऊस ऑफ पेपर’ या कादंबरीचा नायक पुस्तकांसोबत शय्यासोबत करतो. अशाच काही पुस्तकांविषयीच्या पुस्तकांविषयीचं हे नवं सदर.. दर पंधरवडय़ाने. हरफनमौला ================================================================================ वसंत केशव पाटील on 11 April, 2011 05:30:00 AM ‘सुहाग के नुपूर’, ‘बूँद और समुद्र’, ‘शतरंज के मोहरे’, खंजन-नयन’, ‘अमृत और विष’, ‘एका नैमिषारण्ये’, ‘मानस का हंस’, ‘करवट’, ‘नाच्यौ बहुत गोपाल’ या नागरजींच्या काही गाजलेल्या कादंब-या. त्या विविध भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाल्या आहेत. ‘टुकडे टुकडे दास्तान’ ही त्यांची आत्मकथासुद्धा मोठी रोचक आणि रंजक आहे. अपप्रवृत्तीः माध्यमातल्या आणि समाजातल्या ================================================================================ राम जगताप on 28 March, 2011 05:30:00 AM टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. त्यामुळे टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे. कवितेत अंदाधुंदी आणि अराजकताही- नमिता सिंह ================================================================================ प्रहार on 28 March, 2011 05:30:00 AM कोलकात्यातल्या ‘भारतीय भाषा परिषदे’च्या ‘वागर्थ’ या मासिकात (मार्च 2011)ज्येष्ठ कथालेखिका नमिता सिंह यांची मुलाखत प्रकाशित झाली आहे. नमिता सिंह यांनी हिंदीमध्ये अतिशय महत्त्वाचे कथालेखन केले आहे. लवकरच त्यांची ‘लेडीज क्लब’ ही कादंबरी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या मुलाखतीतला हा काही भाग.. अंतर्मुख करणारी चित्रमय कादंबरी ================================================================================ अविनाश कोल्हे on 21 March, 2011 07:35:00 AM सारनाथ बॅनर्जी हे आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे चित्रकार-लेखक आहेत. त्यांची नजर समाजसुधारकाची आहे. अर्थात कोणताही चांगला व्यंगचित्रकार मूलत: समाजसुधारक असतो. फक्त त्याच्या आविष्काराचे साधन कुंचला असते. तो हसत हसत समाजातील विसंगतींवर बोट ठेवतो, आपल्यासमोर आरसा धरतो. त्यामुळे आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. सारनाथ बॅनर्जी यांच्या आविष्काराचे हे महत्त्व आहे. ‘द हरप्पा फाईल्स’ ही त्यांची नवी ग्राफिक नॉव्हेल या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. बाल, किशोर, युवक आणि ‘कलाभारती’ ================================================================================ राजा पिंपरखेडकर on 21 March, 2011 08:05:00 AM ‘कलाभारती’चा दुसरा खंड इन्स्टॉलेशनविषयी असल्याने या पुढच्या काळात या कलेला महत्त्व येणार आहे वा ही कला महत्त्वाची ठरू शकते असे संपादकांना यातून सुचवायचे आहे का? पण मग अमूर्त चित्रकलेचे काय? तिचा प्रवास कसा होईल? एकंदर भारतीय चित्रकला सध्या ज्या टप्प्यावर आहे, तिचा या पुढचा प्रवास कसा राहील याविषयी या दोन्ही खंडांमध्ये लेखन नाही. काही महत्त्वाचे चित्रकार, त्यांचा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कलासमीक्षकांच्या नजरेतून या चित्रकारांची चित्रे असे या दोन्ही खंडांचे स्थूलस्वरूप आहे.