09 January, 2012 05:30:00 AM
भूतानमधील सध्याचे भारताचे राजदूत पवन वर्मा हे इंग्रजीतील प्रतिष्ठित लेखक आहेत.
02 January, 2012 05:30:00 AM
चांगला कादंबरीकार जेव्हा स्वत:च्या कादंबरीविषयी लिहितो, तेव्हा तो वाचकाला ब-याचदा वेगळी दृष्टी देऊन जातो. इकोच्या दोन पुस्तकांशिवाय मारियो वर्हास योसा या लँटिन अमेरिकन लेखकाचं ‘द रायटर्स रिअलिटी’ आणि तुर्की लेखक ओरहान पामुक याचं ‘द नाईव्ह अँड द सेन्टिमेन्टल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकांविषयीदेखील असं म्हणता येईल. कादंबरी- कारानं स्वत:च्या लेखनप्रक्रियेविषयी, लेखनाबद्दलच्या कल्पनांविषयी संवाद साधणं ही कथा-कादंब-यांच्या कट्टर, दर्दी वाचकांसाठी मोठी पर्वणी असते....
02 January, 2012 05:30:00 AM
भारतीय चित्रपटसृष्टीचं 1950 ते 1960 हे दशक सुवर्णकाळ मानलं जातं. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तीचा हा काळ होता. त्यांचे चित्रपट, त्यातील संवाद, संगीत, गाणीबद्दल आजही चर्चा होत असते. राज कपूर आता हयात नाही तर देव आनंदचं अलिकडेच निधन झालं....
26 December, 2011 04:30:00 AM
जिमी हे नाव मुस्लिम नसलं, तरीही ही एका मुस्लिम व्यक्तीची कहाणी असावी, असा अंदाज कादंबरीचं शीर्षक वाचूनच (त्यासाठी शीर्षक वाचणारी व्यक्ती हिंदुत्ववादी असण्याची गरज नाही!) येतो. याचं कारण म्हणजे पुढचे ‘दी टेररिस्ट’ हे शब्द. दहशतवादी म्हणजे तो मुस्लिमच असला पाहिजे, हा समज सामान्य माणसांच्या मनावर किती प्रमाणात कोरला गेला आहे, याचा प्रत्यय यावरून यावा....
19 December, 2011 05:30:00 AM
सुभाषबाबूंनी ज्या सहजतेनं हिटलरशी मैत्री केली, त्याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. याचा अर्थ त्यांना नाझीवाद मान्य होता का आणि हिटलरनं केलेला ज्युंचा संहार मान्य होता का, हे या चच्रेतील एक कळीचे मुद्दे ठरतात. याबद्दल कागदी घोडे जास्त नाचवले जातात, पण अभ्यास मात्र कमी असतो. म्हणूनच रोमेन हेय या अभ्यासकाचं ‘बोस इन नाझी जर्मनी’ हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं....
19 December, 2011 05:30:00 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाहोरच्या जात-पात-तोडक मंडळाने 1936 च्या वार्षिक परिषदेसाठी भाषण करण्याचं निमंत्रण दिलं. त्याला आंबेडकरांनी मान्यताही दिली. आणि आपलं भाषण- ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’- लिहून आधीच मंडळाकडे लिहून पाठवलं. ...
12 December, 2011 05:30:00 AM
प्रख्यात व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचं रविवारी गोव्यात निधन झालं. मिरांडा यांच्याबद्दल अक्षर दिवाळी 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा संपादित भाग. ...
05 December, 2011 03:30:00 AM
‘द ऑनेस्ट ऑलवेज स्टँड अलोन’ या शीर्षकातून सोमिआंना काही व्यक्त करायचे आहे. ते म्हणजे आजच्या काळात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की, चांगल्या व सज्जन माणसाच्या नशिबी नेहमी एकटेपणा येतो. यातून सोमिआ असे सुचवू पाहत आहेत की, ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात भारतीय नोकरशाहीतही आहे....
05 December, 2011 03:30:00 AM
पूर्वेकडच्या राज्यांविषयी एरवीही आपल्याला फार कमी माहिती असते. निसर्गसंपन्न अशा या राज्यांतील परंपरा, संस्कृती, तेथील समाजजीवन आणि हिंसाचार-नक्षलवाद यांनी भरलेलं वातावरण याविषयी फारच कमी गोष्टी आपण जाणून असतो. नुकतंच आसामी भाषेतील मान्यवर लेखिका आणि ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिक इंदिरा गोस्वामी यांचं निधन झालं. गोस्वामी यांच्या साहित्यातून आसामचा इतिहास उभा राहतो. त्याविषयीचं हे छोटंसं टिपण....
28 November, 2011 05:30:00 AM
देशातील सर्वाधिक वाचकप्रिय लेखक (आणि वाद्ग्रस्तही!) खुशवंतसिंग यांचं एकाच वेळी सतरा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारं सदर अलीकडेच बंद झालं. खुशवंतसिंग आता 96 वर्षाचे आहेत. त्यामुळे त्यांनी लेखननिवृत्ती स्वीकारणं समजण्यासारखंही आहे. त्यांच्या लेखनाची पुस्तकं या पुढच्या काळातही प्रकाशित होतीलच. पण त्यांचं वाचकप्रिय सदर आणि त्यावरची त्यांची तितकीच लोकप्रिय नाममुद्रा मात्र आता त्यांच्या वाचकांना पाहायला मिळणार नाही. खुशवंतसिंग यांच्या लेखननिवृत्तीच्या निमित्तानं ‘आऊटलुक’ या साप्ताहिकात 24 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचा हा अनुवाद....