PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क रोलिंगबाईंची चक्क मोठ्यांसाठी कादंबरी! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 23 April, 2012 08:40:00 AM हॅरी पॉटरच्या प्रती घेण्यासाठी लोकांनी आदल्या दिवसांपासून मोठमोठ्या रांगा लावल्याची दृश्य अनेकांनी वर्तमानपत्रांमध्ये वा टीव्हीवर पाहिलीही असतील. रोलिंग यांनी ही सात भागांची मालिका प्रामुख्यानं मुलांसाठी लिहिली असली तरी मोठ्यांनीही ती आवडीनं आणि चवीनं वाचली. सातव्या भागानंतर ही मालिका संपणार हे रोलिंग यांनी जाहीर केलं, तेव्हा जगभरातले हॅरी पॉटरचे चाहते खट्टू झाले. ज्ञानपीठासाठी नियम-अटी! ================================================================================ प्रहार on 23 April, 2012 08:00:00 AM ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 46 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि दर्जा कायम राहावा यासाठी साहित्यिकाच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीचा विचार केला जातो. या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अत्यंत काटेकोरपणे पद्धतीनं नावाची निवड केली जात असल्यानं त्याची विश्वसनीयताही खूप मोठी आहे. वाचन का, कसे आणि किती? ================================================================================ राजा पिंपरखेडकर on 23 April, 2012 07:30:00 AM काय वाचावं आणि कसं वाचावं, याचा साक्षेप असायलाच हवा. त्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. वय आणि वाचन यांचीही योग्य वेळी सांगड घालायला हवी. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंब-या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य असा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं. वयानुसार आपण जसे बदलत जातो, तो आपल्या जाणिवा प्रगल्भ होत जाण्याचा अपरिहार्य भाग असतो. त्याला आपण योग्य अभ्यासाची, शिस्तीची जोड दिली तर त्या त्या वयात त्या त्या प्रकारच्या विषयांबाबत आपली समज परिपक्व व्हायला मदत होते. त्यासाठी वाचन मोठय़ा प्रमाणावर उपयुक्त ठरू शकतं. वाचता वाचता, लिहून ठेवावे! ================================================================================ नीतीन रिंढे on 16 April, 2012 07:50:00 AM चांगलं पुस्तक वाचकाला चांगल्या अर्थानं त्रास देतं, विचारात पाडतं असं म्हटलं जातं. वाचकानं पुस्तक वाचणं म्हणजे लेखकाशी दोन हात करणं, संघर्ष करणं असतं, हे विसाव्या शतकातल्या विचारवंतांनी दाखवून दिलं आहे. समास-नोंदी (Marginalia) हे या संघर्षात वाचकाच्या हातातलं हत्यार बनतं. लेखक तर लिहून बसलेला असतो. त्याला वाचकाच्या प्रश्नाला, आक्षेपाला उत्तर देण्याची संधी पुन्हा मिळणार नसते. वाचकाला लेखकाची भीती नसते. समास-नोंदींतून शब्दांची तलवार हवी तशी चालवायला तो मुक्त असतो. ‘दादा’ प्रकाशक ================================================================================ शंकर सारडा on 16 April, 2012 06:30:00 AM ‘डबलडे’ या जगद्विख्यात प्रकाशन संस्थेचा एके काळी मोठा दबदबा होता. ‘प्रकाशन क्षेत्रातील जनरल मोटर्स’ असे तिचे वर्णन केले जाई. 'ब्रिटानिका' हार्ड कॉपी ते सॉफ्ट कॉपी ================================================================================ सुहास सोनावणे on 09 April, 2012 07:00:00 AM 1950 ते 1960 च्या दशकात खूपच महागड्या ग्रंथांच्या यादीत या कोशाची गणना व्हायची. तरीही ग्रंथप्रेमी तो खरेदी करून आपल्या संग्रही ठेवण्यासाठी धडपडत. आजची पिढी खरेदी केलेल्या कारचे आणि फ्लॅटचे हप्ते भरण्यात धन्यता मानते, तसे त्या काळात ‘एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका’ खरेदी करून ग्रंथप्रेमी स्वत:ला धन्य समजत! मुंबईच्या दंगलींचा लेखाजोखा ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 April, 2012 07:00:00 AM भारत हा निधर्मी आणि धर्मनिरपेक्ष देश आहे. तशी घटनात्मक तरतुद केलेली आहे आणि प्रत्यक्षात तसंच चित्र भारतात जवळपास सर्वत्र पाहायला मिळतं. याचं उत्तम उदाहरण म्हणून मुंबई या शहराकडे बोट दाखवता येतं. बहुढंगी, बहुरंगी या शहरात अनेक जातिधर्माचे लोक अनेक वर्षापासून एकत्र राहताहेत, खरं म्हणजे नांदताहेत. या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणा-या गोष्टी मुंबईत अधूनमधून घडत असतात, कधी त्या उन्मादातून घडतात, तर कधी जाणीवपूर्वक ‘घडवून’ आणल्या जातात. त्यासाठी हमखास वापर होतो, तो दंगली या हत्याराचा. सर्वसामान्यांना भयभीत आणि असुरक्षित करणा-या मुंबईतील दंगलींचा आलेख ‘हिंदू’च्या वरिष्ठ पत्रकार मीना मेनन यांनी या पुस्तकात काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकांच्या कपाटांचा इतिहास ================================================================================ नीतीन रिंढे on 02 April, 2012 06:55:00 AM पुस्तक जन्मलं तेव्हापासून ते कसं आणि कुठे ‘ठेवलं’ गेलं; पुस्तकाचा आकार, उपयुक्तता आणि संख्या यांच्यात बदल होत गेले, तसतशी पुस्तकं ‘ठेवण्याची’ ही पद्धतही कशी बदलत गेली याचा पाठपुरावा या पुस्तकात आहे. पुस्तकांना टाळून पुस्तकांच्या कपाटाविषयी कसं लिहिता येईल? त्यामुळे हा पुस्तकाच्या उत्क्रांतीचाही इतिहास आहे. कायद्याचे रक्षक आणि अल्पसंख्याक समाज ================================================================================ अविनाश कोल्हे on 02 April, 2012 06:50:00 AM आपल्या समाजाचा विचार करता ‘मायनॉरिटीज अँड पोलिस इन इंडिया’ सारखी पुस्तकं महत्त्वाची ठरतात. कारण यात आपल्याला भेडसावत असलेल्या समस्येची चर्चा आहे. यातील काही सूचना व्यवहार्य आहेत. हे पुस्तक राजकारणी व नोकरशहांनी नजरेखालून घातलंच पाहिजे. बेभान, तरीही जाणते ग्रंथप्रेम ================================================================================ रवीन्द्र कुलकर्णी on 26 March, 2012 09:55:00 AM ग्रंथाचे खण वा शेल्फ हे शोभिवंत नसले तरी चालतील; कारण ग्रंथ हेच खरी त्यांची शोभा आहे. ग्रंथ लगेच हाताशी आले पाहिजेत. ग्रंथ दिसले पाहिजेत व कमी जागेत ते जास्त संख्येने एकत्र ठेवता आले पाहिजेत, हे तीन नियम विल्यम ग्लॅडस्टनने ग्रंथ साठवण्यासंबंधात सांगितले आहेत. तसेच खणामधले पुस्तक सहज आत-बाहेर सरकवता आले पाहिजे. पुस्तके दडपून भरण्याला ग्लॅडस्टनचा विरोध आहे. या सर्व गोष्टी अमलात आणण्यासाठी पुस्तकांच्या विविध आकाराचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ग्लॅडस्टन लिहितो, ‘पुस्तकांचे माणसांसारखेच असते. पुस्तकाचे बाइंडिंग, पानांचा दर्जा, छापावयाची शाई या गोष्टी म्हणजे ग्रंथांचे शरीर आहे व आतल्या लिखाणाचा दर्जा म्हणजे ग्रंथाचा आत्मा होय. या दोन्ही गोष्टी नेहमी एकमेकाला शोभनीय अशा असतीलच, असे नाही.’