पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

नाटकवाला नेता!

21 June, 2010 05:30:00 AM
वाक्लाव हावेल यांना गेल्याच आठवडय़ात यंदाचं ‘फ्रान्झ काफ्का प्राइझ’ जाहीर झालं, तर ‘लीव्हिंग’ या त्यांच्या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत 20 जूनपासून (भारतीय तारीख आजचीच- 21 जून) होऊ लागले आहेत. चेकोस्लोवाकियाचे सलग 14 वर्षं राष्ट्राध्यक्ष असलेल्या या नाटककार आणि नेत्याची कारकीर्द काहीशी ‘नाटय़मय’ वळणाचीच राहिली. पण हा माणूस असा का होता, याचं उत्तर त्याच्या नाटकांमध्येच आहे.
image

भांडवलवाद ‘कल्याणकारी’?

14 June, 2010 08:55:00 AM गरिबीचं दुष्टचक्र भेदणारा आणि भांडवलाद फक्त नफेखोरीभोवती फिरू नये, हेही बजावणारा विचार बांग्लादेशातील ‘ग्रामीण बँके’चे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनुस यांनी ‘बिल्डिंग सोशल बिझनेस’ या नव्या पुस्तकात मांडला आहे....
आणखी वाचा
image

पहिलं पुस्तक

14 June, 2010 08:45:00 AM पहिलं पुस्तक म्हणजे अंकलिपी, शालेय अभ्यासक्रमातील इतिहास, भूगोल, मराठी अशी पुस्तकं नव्हे.. किंवा तुमच्या वाचनाच्या आवडीचा उमलू पाहणारा कोंब अगदी लहानपणीच खुरटून अकाली कोमेजून नष्ट होईल अशी काळजी घेणारी, पालकांच्या जबरदस्तीमुळे नाइलाजाने वाचावी लागणारी पुस्तकंही नव्हेत. अशा पुस्तकांच्या यादीत ज्याची-त्याची अनेक नावडती पुस्तकं समाविष्ट करता येतील. इथपर्यंत वाचलं असेल तर आतापर्यंत तुमच्या नजरेसमोर अशी दोन-पाच नावडती पुस्तकं सहज उभी राहिली असतील आणि कदाचित आता पुन्हा ही आपत्ती येतेय की काय.. म्हणत स्वत:शीच दचकलाही असाल....
आणखी वाचा
image

झपाटलेले ‘चिरायू’ क्षण..

14 June, 2010 08:35:00 AM जगभरच्या वेगवेगळ्या भाषांतल्या ‘मास्टरपीस’, पण भाषांतरापासून वंचित राहिलेल्या पुस्तकांची थोडक्यात माहिती देणारं सदर.....
आणखी वाचा
image

जाण्याच्या मार्गावरचा प्रवास

07 June, 2010 12:30:00 AM माणसं जातात म्हणजे नेमकं काय होतं? ती खरोखरीच संपूर्णपणे जातात की हे जाणं केवळ रक्तामांसाचं जाणं असतं, पलीकडचं काहीतरी राहतंच शिल्लक? हा प्रश्न उपमन्यू चॅटर्जीच्या 'वे टू गो' या कादंबरीच्या निमित्ताने एका वेगळ्याच अंगाने पडत राहतो....
आणखी वाचा
image

इराकी साहित्य असं काही उरलंय?

07 June, 2010 12:30:00 AM इराकी लेखक अरब वा कुर्द भाषेत जे काही लिहितात, ते इंग्रजीसारख्या परभाषेत आल्याखेरीज जगापुढे येणं अशक्यच होतं आणि आहे. पण इंग्रजी अखेर इराकच्या ‘जेत्यां’चीच भाषा, असं गेल्या पाच-सहा वर्षातल्या काही पुस्तकांतून दिसलं. युरो-अमेरिकी चष्मा बाजूला सारून इराकी साहित्याचा शोध (गुगलद्वारे! इंटरनेटवर..) घेतल्यास काय दिसतं? किती उरलंय इराकी साहित्य? ...
आणखी वाचा

बीजिंग-शांघायच्या संघर्षाची महाकथा..

07 June, 2010 08:45:00 AM जगभरच्या वेगवेगळ्या भाषांतल्या ‘मास्टरपीस’, पण भाषांतरापासून वंचित राहिलेल्या पुस्तकांची थोडक्यात माहिती देणारं सदर.....
आणखी वाचा
image

राजकीय लाँचपॅड

31 May, 2010 05:55:00 AM वलयांकित घराण्यात राहूनही स्वत:चे वेगळे कर्तृत्व सिद्ध करणा-या फातिमाचे ‘साँग्स ऑफ ब्लड अँड स्वोर्ड ’ हे पुस्तक भुत्तो घराण्यातल्या याच घडामोडींचा परामर्श घेणारं आहे. दहशतवादी ठरवले गेलेले आपले वडील मूर्तझा हे कसे निर्दोष होते आणि त्यांच्या स्वच्छ राजकीय विचारांना विरोध करणा-यांनी त्यांना कसं संपवलं, हे मांडण्याचा फातिमाने या पुस्तकातून प्रयत्न केला आहे. ...
आणखी वाचा

पाऊलो कोएलोच्या ब्रॅण्डनेमचं रेड बुक

31 May, 2010 05:30:00 AM हे पुस्तक किती मोलाचं आहे, हे मात्र वाचकांनी ठरवावं.. काय नाही या पुस्तकात! हान्स अँडरसनच्या ‘अग्ली डकलिंग’ (एका तळय़ात होती बदके पिले सुरेख..) या कथेपासून ते नेल्सन मंडेला यांच्या ‘ब्लॅक मॅन इन अ व्हाइट मॅन्स कोर्ट’ या भाषणापर्यंत.. आणि डी. एच. लॉरेन्स, ऑस्कर वाइल्ड यांच्या पुस्तकांतल्या वेच्यांपासून ते भगवद्गीतेतले श्लोक आणि ऋग्वेदातल्या ऋचांपर्यंत सग्गळं सग्ग्ग्गळं इथ्थ्थंच. ...
आणखी वाचा
image

साम्राज्यवादी अहंगंडाची उद्ध्वस्त धर्मशाळा

24 May, 2010 09:05:00 AM जे. जी. फॅरेलचं चाळीस वर्षापूर्वीचं ‘ट्रबल्स’ पुस्तक मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित आणि नव्या- प्रशस्त चकचकीत दुकानांमध्ये सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आत्ताच पुस्तकावर थेट मत व्यक्त करणं वा त्याच्या निवडक भागाचा अनुवाद वाचकांसाठी देणं अशक्य आहे. मात्र पुस्तकाची ओळख करून घ्यायला विलंब नको, यासाठी ख्यातकीर्त अमेरिकन समीक्षक मेरी व्हिपल यांनी ‘ट्रबल्स’बद्दल 2003मध्ये लिहिलेल्या समीक्षालेखाचा हा मराठी अनुवाद!...
आणखी वाचा
first back 21 22 23 24 25 26 27 28 29 30 next last total: 330 | displaying: 201 - 210
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड