PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क जिंकू किंवा मरू! ================================================================================ सुप्रिया दाबके on 26 March, 2012 07:20:00 AM प्रत्येक क्षेत्रात जिंकणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी कशा प्रकारची जिद्द जोपासावी लागते त्याचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक आहे. फक्त क्रीडापटूच नाही तर उद्योजकदेखील यशस्वी होण्यासाठी आणि उच्चस्तरावर टिकून राहण्यासाठी कशी धोरणं आखतात हेही या पुस्तकात सूचकपणे सांगितलं आहे. त्यामुळे यशाचा फॉर्म्युला नेमका कसा असतो तरी कसा हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकाची काही प्रमाणात मदत होऊ शकते. 'थांबा!'.. तुम्ही ही पुस्तकं वाचू शकत नाही!! ================================================================================ हसन सुरूर - अनुवाद: समीर करंबे on 19 March, 2012 05:30:00 AM सुदैवानं या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी अद्यापि तरी कुणी केलेली नाही, पण ते नुकतंच आलेलं आहे आणि सध्याच्या अहिष्णूतेच्या दिवसात कधी, कुणाच्या, कशा भावना दुखावतील आणि पुस्तकावर दडपशाहीचा प्रयत्न होईल, हे सांगता येत नाही. एम. एफ. हुसन ‘छाया’चित्रांतले! ================================================================================ अविनाश कोल्हे on 12 March, 2012 07:55:00 AM हुसैन यांच्या अनेक मूड्समधील छायाचित्रांचं अप्रतिम पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. प्रदीप चंद्र या छायाचित्रकारानं गेली अनेक वर्ष हुसन यांची अक्षरश: शेकडो छायाचित्रं काढली आहेत. यातील निवडक छायचित्रं एकत्रित करून ‘एम. एफ. हुसन : ए पिक्टोरिअल ट्रिब्युट’ हे पुस्तक तयार झालं आहे. ऑक्सफर्ड @ 100 ================================================================================ प्रहार on 12 March, 2012 07:45:00 AM ऑक्सफर्डच्या भारतातील शाखेला 1912मध्ये मुंबईतून सुरुवात झाली. (पुढे चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीमध्येही ऑफिसेस सुरू झाली. 1972 साली दिल्ली शाखा सुरू झाल्यावर मुख्य ऑफिसही मुंबईहून दिल्लीला नेण्यात आलं.) त्याला 21 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ऑक्सफर्डचा भारतातील इतिहास सांगणारं पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकांच्या वेढय़ातले कैदी ================================================================================ नीतीन रिंढे on 05 March, 2012 04:00:00 AM हे कॉफी-टेबल पुस्तक आहे. मजकुरातून ते जितकं बोलतं त्याहून कितीतरी पटींनी अधिक पानोपानी पसरलेल्या छायाचित्रांतून ‘दाखवतं’. त्यातला प्रत्येक बारीकसारीक तपशील काहीतरी सांगू पाहतो. पुस्तकांच्या उभ्या-आडव्या रचना, त्यांची कपाटं किंवा फडताळं, टेबल-खुर्च्यांवर रचलेले पुस्तकांचे ढीग, या सर्वाची रंगसंगती, पुस्तकांच्या गर्दीतून डोकावणारे खोल्यांचे खिडक्या-दरवाजे या गोष्टी छायाचित्रांमध्ये सजीव होतात. त्यासोबतच पुस्तकांमध्ये बुडालेले पुस्तकवेडे, लेखक, वाचक आपल्याला दिसतात. त्यांच्या नजरेत पुस्तकांबद्दलचा जिव्हाळा ओतप्रोत भरलेला दिसतो. मरणोत्तर लोकोत्तर! ================================================================================ राजा पिंपरखेडकर on 05 March, 2012 04:00:00 AM माणूस जेव्हा जगत असतो, तेव्हा तो जसा जगतो, त्यानुसार तो मेल्यानंतर लोक त्याची आठवण काढतात, त्याचे पुतळे उभारतात, त्याच्या नावे इमारती, प्रयोगशाला, रस्ते, बागा तयार करतात.. त्याच्या कामाचा उपभोग घेणं आणि त्याची पुस्तकं वाचणं, हे त्यांच्याबाबतच होतं, जे लोक आपल्या निधनानंतरही ‘जिवंत’ राहतात! अमर क्रांतिकारकाचे प्रेरणादायी चरित्र ================================================================================ अविनाश कोल्हे on 27 February, 2012 06:55:00 AM चे गव्हेरा आजही जगभरच्या तरुणांचा आदर्श आहे. आजही लॅटिन अमेरिकेतील एखाद्या चुणचुणीत मुलाला विचारलं की, तुला पुढे कोण व्हायचं आहे तर तो चटकन उत्तरतो, ‘चे’. ऑक्टोबर 1967 मध्ये जरी चे गव्हेराला मारण्यात आलं तरी मेलेला चे गव्हेरा जिवंत चे गव्हेरापेक्षा जास्त धोकादायक आहे, हे लवकरच लक्षात आलं. आणि तो धोका आजही कायम आहे. शौकीन मुघलांचा सरंजाम ================================================================================ रवींद्र कुलकर्णी on 27 February, 2012 06:40:00 AM मुघल साम्राज्याच्या भव्य पार्श्वभूमीवर अब्राहम इराली यांनी चितारलेल्या सम्राटांच्या व्यक्तिरेखा मनोहर आहेत. इतिहासाला वळण देणा-या घटनाही टाळलेल्या नाहीत. अखेर घटना म्हणजे माणसाने सभोवतालच्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद; जो त्याच्या स्वभावातून जन्म घेतो. मुघल सम्राटांच्या स्वभावाचा हा मागोवा त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो. यातल्या गोष्टी 100 टक्के सत्य आहेत, असा लेखकाचाही दावा नाही. बर्नियर व मनुची जहांगीरच्या नंतर भारतात आले. त्यांच्या ऐकीव माहितीवर सर्वथा लेखकाला विसंबता येत नाही, असे असले तरी मुघल साम्राज्याचे भान निर्माण करून देण्यात लेखक यशस्वी ठरला आहे, हे मान्य करावे लागते. पुस्तकचोराच्या मागावर गुप्तहेर! ================================================================================ नीतीन रिंढे on 20 February, 2012 05:30:00 AM गिल्केची अनेक रहस्यं ठाऊक झाल्यावर अ‍ॅलिसनसमोर नतिक पेच उभा राहिला. त्याच्या कारवायांची खबर पोलिसांना द्यावी तर ती, गिल्केनं जो विश्वास तिच्याबद्दल दाखवलाय, त्याच्याशी प्रतारणा ठरेल. आणि सर्व माहीत असूनही गप्प राहावं तर ते गुन्हेगाराला सामील असणं ठरेल. तेव्हा करावं काय? पुस्तक लिहिताना अ‍ॅलिसनला अशा नतिक प्रश्नाचाही सामना करावा लागला. कण्हणारे शेल्फ आणि धडपडणारा वाचक! ================================================================================ राजा पिंपरखेडकर on 20 February, 2012 05:30:00 AM हे पुस्तक वाचताना आपलं ग्रंथवेड आणखीनच उफाळून येतं. कार्ल मार्क्‍स यांनी ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असं म्हटलं आहे. पण पुस्तकवेडय़ांसाठी ‘पुस्तकांविषयीची पुस्तकं’ ही अफूच्या गोळीसारखीच असतात! त्याची नशा उतरता उतरत नाही. सॅबॅस्टियन यांचं हे पुस्तक ती नशा वाढवतच नेतं.