PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क नर्मविनोदी आणि रंजक आठवणी! ================================================================================ अविनाश कोल्हे on 13 February, 2012 05:30:00 AM अनेक वर्षे पत्रकारितेत असल्यामुळे सुरैयांचा एक खास वाचक वर्ग आहे. असा वाचक एकेकाळी मुंबईत ‘बिझी बी’ यांचा होता. या वाचकांना हलकंफुलकं वाचायला हवं असतं. ती गरज सुरैयांचं लेखन भागवण्याचा प्रयत्न करतं. पण 400 ते 500 शब्दांची करमणूक पुस्तक लेखनासाठी मात्र घातक ठरू शकते. सुरैयांनी भारतीय पत्रकारितेचा एवढा काळ बघितला आहे, पण त्यांचे पडसाद त्यांच्या या पुस्तकातून फारसे उमटताना दिसत नाहीत. माणसांचा बाजार मांडलेला! ================================================================================ रवींद्र कुलकर्णी on 13 February, 2012 05:30:00 AM एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीनंतर गुलामांच्या व्यापाराला ओहोटी लागली. धर्म आणि लोकशाहीचा समर्थ होत जाणारा आवाज यापेक्षा औद्योगिक क्रांतीनं या व्यापाराला धक्का दिला. त्याआधी गुलामांचा व्यापार घृणास्पद समजला जात नसे, पण त्याला समाजात प्रतिष्ठाही नव्हती. अटलांटिक महासागरातून चालणा-या गुलामांच्या व्यापाराविषयीचं हे पुस्तक, एखाद्या विषयाकडे किती अंगांनी बघता येतं याची शिकवण हे पुस्तक देतं. पुस्तकांच्या जगातली रहस्यमय कादंबरी ================================================================================ नीतीन रिंढे on 06 February, 2012 05:30:00 AM या कादंबरीत सुरुवातीपासून अखेपर्यंत पुस्तकांचं विश्व पसरलेलं आहे. दुर्मीळ पुस्तकविक्रेते, हाडाचे वाचक, पुस्तकसंग्राहक, संशोधक, साहित्याचे इतिहासकार यांचं हे जग आहे. त्यांच्या पुस्तका- विषयीच्या अनेक कोनांतून केलेल्या चर्चाचं हे जग आहे. युरोपातला दुर्मीळ पुस्तकांचा व्यवहार, त्यातले अनेक बारकावे यांचं हे जग आहे. त्यातल्या काही जागा आपल्याला परिचित आहेत, तर काही अपरिचित. दोन शतकांचा कादंबरीकार ================================================================================ प्रहार on 06 February, 2012 05:30:00 AM उद्या, सात फेब्रुवारीला इंग्रजीतील अभिजात कादंबरीकार चार्ल्स डिकन्सच्या द्विजन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने ‘साधना’ साप्ताहिकाच्या 11 फेब्रुवारीच्या अंकात ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी तब्बल वीस पानांचा लेख लिहिला आहे. तो मुळातूनच वाचायला हवा. त्यांच्या त्या प्रदीर्घ लेखातील हे निवडक वेचे.. पन्नास वर्षे, पन्नास नाटके आणि दुबेमॅनिया ================================================================================ अविनाश कोल्हे on 30 January, 2012 05:30:00 AM पं. सत्यदेव दुबे यांचे अलीकडेच निधन झाले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो. लोकशाहीची कसोटी पाहणारे वर्ष ================================================================================ प्रहार on 30 January, 2012 03:30:00 AM सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे मासिक इंटेलेक्च्युअल लोकांसाठीचे आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप अतिशय गंभीर आहे. या मासिकाचा दर महिन्याचा अंक हा विशेषांकच असतो. तुमची जमीन, माझं आकाश.. ================================================================================ सुनीलकुमार लवटे on 23 January, 2012 05:30:00 AM डॉ. सुनीलकुमार लवटे यांचं ‘खाली जमीन वर आकाश’ हे आत्मकथन 2006 मध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये प्रकाशित झालं. 2010 पर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याचबरोबर ब्रेल, गुजराती आणि हिंदीमध्येही त्याचे अनुवाद प्रकाशित झाले. लवकरच इंग्रजी आणि तमिळ अनुवाद प्रकाशित होत आहेत. लवटे यांच्या प्रारंभिक पन्नास वर्षाची कहाणी असलेल्या या आत्मकथनाची ही नव्या आवृत्त्यांच्या निमित्तानं त्यांच्याच शब्दांत ओळख.. या हाकांना प्रतिसाद द्या! ================================================================================ राम जगताप on 23 January, 2012 05:30:00 AM गेल्या वर्षी भारताविषयी पाच, तर चालू वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चार महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी काही सांगू पाहणारी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत. या लेखकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि जमलंच तर त्यातून काही शिकायलाही हवं. पण त्या आधी या पुस्तकांकडे कसं पाहावं याविषयीचा हा लेख.. आंबेडकर आणि स्त्री-प्रश्न ================================================================================ अविनाश कोल्हे on 16 January, 2012 05:30:00 AM इंग्रजी सत्ता स्थिर झाल्यावर आपल्या समाजाला पाश्चात्य आणि प्रगत मूल्यांचा सामना करावा लागला. यातील एक महत्त्वाचं मूल्य म्हणजे स्त्री-पुरुष समानता. ते भारतीय समाजाला पूर्णपणे नवीन होतं. अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम ================================================================================ नीतीन रिंढे on 16 January, 2012 05:30:00 AM ग्यूरीननं आयुष्यभर मास्रेल प्रूस्तची शेकडो दुर्मीळ पुस्तकं, चित्रं, जुन्या वस्तू जमवल्या. हा संग्रह राष्ट्रीय संग्रहालयासाठी मिळवण्याच्या उद्देशानं फ्रान्सचे अध्यक्ष मितरॉँ दोन वेळा त्याच्या घरी गेले. पण त्यांना त्यानं संग्रह दाखवलादेखील नाही. विसाव्या शतकभर मास्रेल प्रूस्तवर संशोधन करणा-या, त्याची चरित्रं लिहिणा-या संशोधकांसाठी ग्यूरीननं आयुष्यभर खपून जमवलेला आणि काळजीपूर्वक जतन केलेला प्रूस्त-संग्रह हा अमूल्य ठेवा ठरला आहे.