पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

सहकार्य की स्पर्धा?

08 August, 2011 06:00:00 AM
चीन आणि भारत हे देश जगाच्या इतिहासातील महान आणि प्राचीन देश. त्याचप्रमाणे ते जवळपास एकाच वेळेस स्वतंत्र झाले. भारताने 1947 मध्ये तर चीनने 49 मध्ये स्वातंत्र मिळवले. भारताने लोकशाही शासनप्रणाली स्वीकारली, तर चीनने मार्क्‍सवाद प्रमाण मानला. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची अनेक वर्षे या दोन्ही देशांची तुलना होत असे. या मागे अमेरिकाप्रणीत भांडवलशाही तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनप्रणीत समाजवाद होता. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे ऑक्टोबर 62 मध्ये झालेले भारत-चीन युद्ध. तेव्हापासून या दोन्ही देशांत सीमेवरून वाद आहे.
image

व्यासांची मुलुखगिरी

01 August, 2011 07:00:00 AM डॉ. भगवतीलाल व्यास हे अत्यंत नम्र, निगर्वी, गप्पिष्ट आणि मनमिळावू आहेत. त्यांच्यातील विनोद-उपहास मोहून टाकतो. आपल्या भोवतालच्या वास्तवात खोलवर बुडून अतिशय साध्या, सहज आणि बोच-या भाषेत उपहासगर्भ लेखन करण्यात व्यासांचा हातखंडा आहे....
आणखी वाचा
image

व्होडाफोन-क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवॉर्डची अंतिम यादी जाहीर

01 August, 2011 07:00:00 AM भारतीय लेखकांच्या इंग्रजीतल्या पुस्तकांना गेली दहा वर्षे व्होडाफोन-क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवार्ड दिले जात आहे. ललित साहित्य, भारतीय भाषांतील अनुवाद, वास्तव लेखन आणि बालसाहित्य या विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात. ...
आणखी वाचा
image

पुस्तकप्रेमींचा तत्त्वज्ञ

25 July, 2011 07:30:00 AM सारी हयात बेंजामिनने विसाव्या शतकात घालवली, पण एकोणिसाव्या शतकातील युरोपने त्याला पछाडलं होतं. त्याचे चरित्रकार सांगतात, ‘तो चालायचा-बोलायचादेखील एकोणिसाव्या शतकातल्या युरोपियनाप्रमाणे. वाट चुकून विसाव्या शतकात आलेला तो एकोणिसाव्या शतकातला जणू एक त्रस्त समंधच होता....
आणखी वाचा
image

अमेरिकेची छुपी वकिलीच

25 July, 2011 07:30:00 AM दुस-या महायुद्धानंतर जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला. तिचा एकमेव उद्देश म्हणजे मार्क्‍सवादाचा पराभव. त्यासाठी अमेरिकेने प्रसंगी विधीशून्य राजकारण केले....
आणखी वाचा
image

‘धोक्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे’

18 July, 2011 05:30:00 AM Just Between Us या पुस्तकामध्ये भारतातील काही आघाडीच्या स्त्री लेखिकांच्या दीर्घ मुलाखती आहेत. त्यात त्यांनी आपला लेखनप्रवास, जडणघडण, सामाजिक-सांस्कृतिक सेन्सॉरशिप याविषयी दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत. त्यातील शहाजहाना या जन्माने मुस्लिम पण तेलुगूत लिहिणा-या लेखिकेची ही मुलाखत..संपादित स्वरूपात. हा मराठी अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला असून लवकरच या पुस्तकाचा मराठी अनुवाद लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रकाशित होत आहे....
आणखी वाचा

टागोर आणि आंबेडकर

18 July, 2011 06:30:00 AM राष्ट्रकवी रवीन्द्रनाथ टागोर आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वरवर पाहता काही साम्य दिसेल असं नाही. पण या दोघांची स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कृत्रिप्रवणता आणि वैचारिकता पाहिली तर काही साधर्म्याचे दुवे निश्चित सापडतील, किंबहुना तसा प्रयत्न रामचंद्र गुहा यांनी केलेला आहे. त्यांनी तर डॉ. आंबेडकरांना महात्मा गांधी आणि टागोर यांच्या पंक्तीत समर्थ युक्तिवादानिशी बसवले आहे. गुहा यांच्यासारख्या आघाडीच्या विचारवंताचे लेखन वाचून कुणीही त्यांच्याशी सहमत होईल यात शंका नाही....
आणखी वाचा

'राजा राव' तत्त्वज्ञ कादंबरीकार

11 July, 2011 04:30:00 AM राजा राव यांचा भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व्यासंग होता. त्यामुळे त्यांच्या लेखनात अनेक तात्त्विक प्रश्नांची चर्चा आढळते. राजा राव यांचे कोणतेही पुस्तक वाचकांना अंतर्मुख करते. त्यांचे लेखन वाचकांसमोर तात्त्विक प्रश्न उभे करते. परांजपे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकामुळे राजा राव हा महान लेखक वाचकांसमोर योग्य प्रकारे उभा राहतो. लेखनाखेरीज या पुस्तकात राजा राव यांची काही दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे, काही रेखाचित्रे आहेत; ज्यामुळे या पुस्तकातील गूढ आशय अधिकच गूढ होतो....
आणखी वाचा

सुपरस्टार लेखक!

11 July, 2011 04:30:00 AM कथा, कादंबरी, नाटक, मुलाखत, चित्रपट- संवादलेखन, संपादन, मालिका-निर्मिती व त्यासाठी करावे लागणारे लेखन अशा सर्व कलात्मक कस पाहणा-या साहित्य प्रकारांमध्ये आपला अभूतपूर्व ठसा उमटवणा-या कमलेश्वरांची हिंदी साहित्यातील मुशाफिरी हा एक चमत्कारच होता....
आणखी वाचा

वाचावीच अशी पुस्तकं

04 July, 2011 05:30:00 AM मागच्या अंकात ‘गार्डियन’ने केलेल्या शंभर उत्कृष्ट ललितेतर पुस्तकांच्या यादीचा पहिला भाग दिला होता. हा उत्तरार्ध. यात तत्त्वज्ञान, राजकारण, धर्म, विज्ञान, समाज आणि प्रवास या विषयांवरील महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे. ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ असं रामदास स्वामी म्हणत. या पुस्तकांचाही तोच इरादा आणि वादा आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 298 | displaying: 41 - 50