PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क दुस-या महायुद्धाचा ‘संजय’ ================================================================================ रवींद्र कुलकर्णी on 09 January, 2012 05:30:00 AM कार्नलिअस रायन वयाच्या 54व्या वर्षी मरण पावला. त्याच्या स्मरणशीलेवर अक्षरं कोरली आहेत, ‘रिपोर्टर.’ दुस-या महायुद्धाच्या या ‘संजया’चं हे काम पाहून मन दडपून जातं. त्यानं म्हटलं आहे, ‘मी संहार व युद्धाबद्दल लिहीत नाही तर माणसाच्या धाडस व धैर्याबद्दल लिहितो.’ मानवाच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला व मर्यादेला अंत नाही, हे रायननं लिहिलेल्या पुस्तकांवरून तर लक्षात येतंच; पण खुद्द त्याच्या पुस्तकं लिहिण्याच्या प्रयत्नातूनही लक्षात येतं. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल ================================================================================ प्रहार on 09 January, 2012 05:30:00 AM 2008 साली नमिता गोखले आणि विल्यम डर्लीमप्ले यांच्या पुढाकारानं सुरू झालेला जयपूर लिटरेचर फेस्टिवल अवघ्या चार वर्षातच आशियातला सर्वात मोठा साहित्य महोत्सव ठरू पाहतो आहे. या वर्षी हा महोत्सव 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणार आहे. वर्माची नवी इनिंग ================================================================================ प्रहार on 09 January, 2012 05:30:00 AM भूतानमधील सध्याचे भारताचे राजदूत पवन वर्मा हे इंग्रजीतील प्रतिष्ठित लेखक आहेत. एका कादंबरीकाराचा कबुलीजबाब ================================================================================ नीतीन रिंढे on 02 January, 2012 05:30:00 AM चांगला कादंबरीकार जेव्हा स्वत:च्या कादंबरीविषयी लिहितो, तेव्हा तो वाचकाला ब-याचदा वेगळी दृष्टी देऊन जातो. इकोच्या दोन पुस्तकांशिवाय मारियो वर्हास योसा या लँटिन अमेरिकन लेखकाचं ‘द रायटर्स रिअलिटी’ आणि तुर्की लेखक ओरहान पामुक याचं ‘द नाईव्ह अँड द सेन्टिमेन्टल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकांविषयीदेखील असं म्हणता येईल. कादंबरी- कारानं स्वत:च्या लेखनप्रक्रियेविषयी, लेखनाबद्दलच्या कल्पनांविषयी संवाद साधणं ही कथा-कादंब-यांच्या कट्टर, दर्दी वाचकांसाठी मोठी पर्वणी असते. एव्हरग्रीन चरित्र ================================================================================ अविनाश कोल्हे on 02 January, 2012 05:30:00 AM भारतीय चित्रपटसृष्टीचं 1950 ते 1960 हे दशक सुवर्णकाळ मानलं जातं. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रिमूर्तीचा हा काळ होता. त्यांचे चित्रपट, त्यातील संवाद, संगीत, गाणीबद्दल आजही चर्चा होत असते. राज कपूर आता हयात नाही तर देव आनंदचं अलिकडेच निधन झालं. ‘स्टोरी’मागची मोठी ‘स्टोरी’ ================================================================================ सायली परांजपे on 26 December, 2011 04:30:00 AM जिमी हे नाव मुस्लिम नसलं, तरीही ही एका मुस्लिम व्यक्तीची कहाणी असावी, असा अंदाज कादंबरीचं शीर्षक वाचूनच (त्यासाठी शीर्षक वाचणारी व्यक्ती हिंदुत्ववादी असण्याची गरज नाही!) येतो. याचं कारण म्हणजे पुढचे ‘दी टेररिस्ट’ हे शब्द. दहशतवादी म्हणजे तो मुस्लिमच असला पाहिजे, हा समज सामान्य माणसांच्या मनावर किती प्रमाणात कोरला गेला आहे, याचा प्रत्यय यावरून यावा. सुभाषचंद्र बोस आणि जर्मनी व जपान ================================================================================ अविनाश कोल्हे on 19 December, 2011 05:30:00 AM सुभाषबाबूंनी ज्या सहजतेनं हिटलरशी मैत्री केली, त्याचं आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. याचा अर्थ त्यांना नाझीवाद मान्य होता का आणि हिटलरनं केलेला ज्युंचा संहार मान्य होता का, हे या चच्रेतील एक कळीचे मुद्दे ठरतात. याबद्दल कागदी घोडे जास्त नाचवले जातात, पण अभ्यास मात्र कमी असतो. म्हणूनच रोमेन हेय या अभ्यासकाचं ‘बोस इन नाझी जर्मनी’ हे ताजं पुस्तक महत्त्वाचं ठरतं. जातिप्रथेचं विध्वंसन ================================================================================ प्रहार on 19 December, 2011 05:30:00 AM डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाहोरच्या जात-पात-तोडक मंडळाने 1936 च्या वार्षिक परिषदेसाठी भाषण करण्याचं निमंत्रण दिलं. त्याला आंबेडकरांनी मान्यताही दिली. आणि आपलं भाषण- ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’- लिहून आधीच मंडळाकडे लिहून पाठवलं. पहिल्या पिढीचे व्यंगचित्रकार ================================================================================ मधुकर धर्मापुरीकर on 12 December, 2011 05:30:00 AM प्रख्यात व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचं रविवारी गोव्यात निधन झालं. मिरांडा यांच्याबद्दल अक्षर दिवाळी 2011 मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा संपादित भाग. नोकरशाहीचे रंग ================================================================================ अविनाश कोल्हे on 05 December, 2011 03:30:00 AM ‘द ऑनेस्ट ऑलवेज स्टँड अलोन’ या शीर्षकातून सोमिआंना काही व्यक्त करायचे आहे. ते म्हणजे आजच्या काळात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की, चांगल्या व सज्जन माणसाच्या नशिबी नेहमी एकटेपणा येतो. यातून सोमिआ असे सुचवू पाहत आहेत की, ही परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात भारतीय नोकरशाहीतही आहे.