PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क लढणारी तलवार ================================================================================ अरुण राय on 05 December, 2011 03:30:00 AM पूर्वेकडच्या राज्यांविषयी एरवीही आपल्याला फार कमी माहिती असते. निसर्गसंपन्न अशा या राज्यांतील परंपरा, संस्कृती, तेथील समाजजीवन आणि हिंसाचार-नक्षलवाद यांनी भरलेलं वातावरण याविषयी फारच कमी गोष्टी आपण जाणून असतो. नुकतंच आसामी भाषेतील मान्यवर लेखिका आणि ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिक इंदिरा गोस्वामी यांचं निधन झालं. गोस्वामी यांच्या साहित्यातून आसामचा इतिहास उभा राहतो. त्याविषयीचं हे छोटंसं टिपण. ‘आता मी कुठल्याही दिवशी मरेन!’ ================================================================================ शीला रेड्डी on 28 November, 2011 05:30:00 AM देशातील सर्वाधिक वाचकप्रिय लेखक (आणि वाद्ग्रस्तही!) खुशवंतसिंग यांचं एकाच वेळी सतरा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारं सदर अलीकडेच बंद झालं. खुशवंतसिंग आता 96 वर्षाचे आहेत. त्यामुळे त्यांनी लेखननिवृत्ती स्वीकारणं समजण्यासारखंही आहे. त्यांच्या लेखनाची पुस्तकं या पुढच्या काळातही प्रकाशित होतीलच. पण त्यांचं वाचकप्रिय सदर आणि त्यावरची त्यांची तितकीच लोकप्रिय नाममुद्रा मात्र आता त्यांच्या वाचकांना पाहायला मिळणार नाही. खुशवंतसिंग यांच्या लेखननिवृत्तीच्या निमित्तानं ‘आऊटलुक’ या साप्ताहिकात 24 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचा हा अनुवाद. दुस-या चेतन भगतची पहिली कादंबरी! ================================================================================ अविनाश कोल्हे on 21 November, 2011 05:30:00 AM ही कादंबरी आजची असल्यामुळे यातील पात्रांची भाषा हल्लीची म्हणजे हिंग्लीश आहे. या कादंबरीत खटकण्यासारखी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे यात नको इतके संवाद आहेत. सतत कोणी ना कोणी बोलतच असते. कादंबरी या साहित्यप्रकाराची खरी शक्ती म्हणजे त्यात लेखकाला आपल्या सर्व पात्रांना व्यवस्थित उभे करता येते; त्यांचे व्यक्तिमत्त्व, मनोविषेण सविस्तर रेखाटता येते. मात्र येथे त्याची कमतरता जाणवते. अर्थात, ही लेखकाची पहिलीच कादंबरी असल्यामुळे असे होणे स्वाभाविकही आहे. मात्र असे असले तरी कादंबरीची वाचनीयता कमी होत नाही. प्रकाशकांचे धाबे दणाणते आहे.. ================================================================================ प्रहार on 21 November, 2011 05:30:00 AM द न्यू यॉर्क टाइम्स या मान्यवर वर्तमानपत्रात ‘रूम फॉर डिबेट होम’ असा एक विभाग असतो. त्यात वेगवेगळे विषय घेऊन त्यावर मान्यवर लेखक मंडळी चर्चा करतात. स्टीव्ह जॉब्ज आणि भारतीय फिनॉमिनन ================================================================================ प्रहार on 21 November, 2011 05:30:00 AM सध्या दोन पुस्तकांची बरीच चर्चा आणि चलती आहे. त्यातला पहिला आहे, स्टिव्ह जॉब्ज. त्याच्या तंत्रज्ञानानं तरुण पिढीवर मोठं गारुड केलं आहे. तर दुसरा आहे भारतीय तरुण पिढीचा आवडता लेखक, चेतन भगत. जगावेगळा कलावंत ================================================================================ वसंत केशव पाटील on 14 November, 2011 05:30:00 AM बलराज सिनेमा, नाटय़-चळवळ व लेखन, याशिवाय साध्या कामातही उडी घेत असे. सभा, मिरवणुका, निवडणुका, निदर्शने, निधी-संकलन या सा-या गोष्टीत बलराज आघाडीवर असे. त्याचे सामाजिक भान खूप सखोल व कृतिशील होते. साध्या गोष्टीचीही तो खूप गंभीर दखल घेत असे. मृत्युपूर्वी काही दिवस त्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्र लिहून जुहू विभागात होत असलेल्या नारळांच्या झाडांच्या कत्तलींबद्दल आवाज उठवला होता. आधुनिक आणि दूरदृष्टीचा दिग्दर्शक ================================================================================ अविनाश कोल्हे on 07 November, 2011 07:30:00 AM प्रा. सुरंजन गांगुली यांचं हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी केवळ राय यांच्या चित्रपटांचं रसग्रहण केलं नसून तेव्हाचा भारत, सत्यजित राय यांच्यावर झालेले संस्कार, भारतीय समाजात सुरू झालेली प्रबोधनाची चळवळ, त्याचे राय यांच्यावर झालेले संस्कार यांचाही अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक राय यांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. उत्तम दहा पुस्तके! ================================================================================ प्रहार on 07 November, 2011 08:05:00 AM पब्लिशर्स वीकली’ हे साप्ताहिक न्यूयॉर्कहून प्रकाशित होतं. या साप्ताहिकाच्या वतीनं दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्या वर्षातील ‘उत्तम दहा पुस्तकां’ची निवड केली जाते. या वर्षीची यादी नुकतीच त्यांच्या चालू अंकात आणि अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झाली आहे. ‘लोकपाल’ची सर्वांगीण चर्चा ================================================================================ अविनाश कोल्हे on 24 October, 2011 07:00:00 AM भ्रष्टाचार विरोधी लढय़ाची टीम अण्णांना एवढी नशा चढली आहे की, भ्रष्टाचार रोखण्याचे इतरही मार्ग असू शकतात याचा ते विचार करायला तयार नाहीत. उदा. भारतातील बराच भ्रष्टाचार जुने कायदे, त्यातील कालबाह्य तरतुदींमुळे होतो. यावर उपाय म्हणजे नियम सोपे करणे. हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे. चरित्रातून बातम्यांची लयलूट.. ================================================================================ प्रहार on 24 October, 2011 07:00:00 AM स्टीव्ह जॉब्ज यांचं हे चरित्र मराठीतही आजच प्रकाशित होतंय. आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्याच तारखेला मराठी अनुवाद प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ. डॉ. विलास साळुंखे यांनी अनुवादित केलेल्या आणि पुण्याच्या डायमंड पब्लिकेशननं काढलेल्या मराठी आवृत्तीची किंमत इंग्रजीपेक्षा कमी ( 495 रु.) आहे.