पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

बाईलवेडा आणि पुस्तकवेडाही

23 May, 2011 06:00:00 AM
मिश्किल भाषाशैलीचा वापर करून, आपलं पुस्तक कुठेही गंभीर होणार नाही याची दक्षता हॅमिल्टनने घेतली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला आल्डस हक्सले याचं ‘द प्रॉपर स्टडी ऑफ मॅनकाइंड इज बुक्स’ हे वाक्य उद्धृत करण्याआधीच हॅमिल्टन त्याला पुस्ती जोडतो - ‘पुस्तकं, वाचन आणि लोक यांचा अभ्यास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना गंभीरपणे न घेणं.’ आपल्या पुस्तकाच्या वाचनामुळे वाचकाने अजिबात गंभीर बनू नये याची काळजी स्वत: हॅमिल्टननेदेखील घेतली आहे.

नेहरूः आधुनिक भारताचे शिल्पकार

23 May, 2011 06:00:00 AM नयनतारा सहगल यांनी लिहिलेलं पंडित नेहरूंचं हे चरित्र अगदी वेगळं आहे. सहगल यांनी नेहरूंना प्रत्यक्ष बघितलं, त्या त्यांच्या सहवासात वाढल्या. त्यामुळे यातून नेहरूंची विचार करण्याची पद्धत, त्यांना कोणत्या गोष्टी प्रिय होत्या, ते कोणत्या मूल्यांशी प्रामाणिक होते वगरे गोष्टी आणि पर्यायाने नेहरू सामग्र्याने समजण्यास मदत होते. ...
आणखी वाचा
image

परंपरेसवे नवता

16 May, 2011 08:25:00 AM उर्दू कवी आणि शायर शहरयार यांना अलीकडेच ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ‘जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने, इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने’ अशा अप्रतिम गज़्‍ाला लिहिणाऱ्या शहरयार यांचे ‘इस्म-ए-आजम’, ‘सातवां दर’, ‘हिज्र के मौसम’, ‘ख्म्वाब का दर बंद है’, ‘नींद की किरचें’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद उर्दूचे अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी ‘शहरयारची कविता’ या नावाने केला आहे. त्यानिमित्ताने शहरयार यांच्या कवितेची ही ओळख....
आणखी वाचा

लघुकथेची मिराशी

16 May, 2011 07:45:00 AM ‘दि फेबर बुक ऑफ मॉडर्न शॉर्ट स्टोरी’ हे नवकथांचं पुस्तक एलिझाबेथ बॉवेन यांनी1937साली संपादित केलं होतं. त्यातल्या दीर्घ प्रस्तावनेत त्यांनी नवकथेच्या प्रेरणा आणि तिचे स्वरूप याविषयी मांडणी करताना चेकॉव्ह आणि मोपाँसा यांना आधुनिक लघुकथेच्या जनकत्वाचा मान दिला. नुकताच पाश्चात्य भाषांतील निवडक कथांचा तारा वनारसे यांनी ‘गुप्त वरदान’ (पॉप्युलर प्रकाशन) या नावाने मराठी अनुवाद केला आहे. त्याला त्यांनी मुद्दाम एलिझाबेथ बॉवेन यांच्या वरील निबंधाची जोड दिली आहे. त्यातील हा काही भाग. हा निबंध आजची भारतीय लघुकथा, मराठी नवकथा यांच्या संदर्भातही पडताळून पाहण्यासारखा आहे....
आणखी वाचा
image

नाहिशा झालेल्या पुस्तकांचा इतिहास

09 May, 2011 09:00:00 AM लहान वयापासून झपाटल्यासारखी पुस्तकं वाचत सुटलेल्या स्टुअर्ट केलीला वयाच्या पंधराव्या वर्षी एका विदारक सत्याचा साक्षात्कार झाला- ‘जगातली काही पुस्तकं कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हाती कधीच लागणार नाहीत.’ एखादा लेखक हाती घेतला की त्याची सर्व पुस्तकं मिळवायची आणि तो संपूर्ण वाचायचा, असा नाद त्याला होता. ...
आणखी वाचा

बौद्धिक आनंद देणारा लेखसंग्रह

09 May, 2011 08:30:00 AM अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचे संबंध घनिष्ठ असतात. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अशोक मित्रा. ते मार्क्‍सवादी आहेत. हा उल्लेख महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांच्या विवेचनाची दिशा स्पष्ट होते....
आणखी वाचा

अभिमन्यू अनत नावाचा प्रवासी पक्षी

02 May, 2011 04:30:00 AM ‘वसंत’ या नियतकालिकाच्या माध्यमातून अभिमन्यू अनतांनी मॉरिशसमधील हिंदी लेखकांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी कित्येक लेखकांना भारतीय प्रकाशकही मिळवून दिले. मॉरिशसमध्ये प्राथमिक शिक्षण मोफत देण्यात येतं. याचा एकंदर वाचन-लेखन संस्कृतीवर चांगला परिणाम झाला आहे, असं त्यांना वाटतं. भारतीय साहित्य-संस्कृतीबद्दल अनतांना मोठी ओढ आहे. धर्मापेक्षा संस्कृती ही मोठी गोष्ट आहे असं ते मानतात. कारण धर्मामुळे भेदांची पेरणी होते....
आणखी वाचा

पंजाबी साहित्यः नव्या युगाची आव्हाने

02 May, 2011 04:30:00 AM समकालीन पंजाबी कादंब-या आणि कथांनी केवळ नव्या वाटाच चोखाळल्या नाहीत तर जागतिकीकरणाचे ताणेबाणे चांगल्या प्रकारे पकडण्याचं काम केलं आहे. त्यात जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक संकटांविषयी त्यांनी हाकारा दिला आहे, आणि बदलाच्या दिशा आणि दशाही रेखाटल्या आहेत....
आणखी वाचा
image

पुस्तकांची असोशी

25 April, 2011 07:30:00 AM 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. त्यानिमित्तानं पुस्तक-संग्राहक, पुस्तकवेडे आणि वाचनवेडय़ांचा परिचय करून देणारे, आणि पुस्तकांची महती सांगणारे हे दोन विशेष लेख. ‘अ पॅशन फॉर बुक्स’ या पुस्तकाला खरं तर वाचनवेडय़ांचं ‘बायबल’ म्हणायला हवं; तर अ‍ॅनी फॅडिमनचं पुस्तक हे तिचं पुस्तकांविषयीचं कन्फेशन आहे. ...
आणखी वाचा
image

पुस्तकांचं एक घर बांधून त्यातच राहावं..

25 April, 2011 08:05:00 AM व्हर्जिनिया वूल्फनं कॉमन रीडरचं केलेलं हे वर्णन ‘एक्स लिब्रिस’ या आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अ‍ॅनी फॅडिमन यांनी उद्धृत केलं आहे. एरवी विसंगती आणि अपूर्णत्वाशी झगडणा-या वाचकाला पुस्तकांच्या सान्निध्यात मिळणारं पूर्णत्व ही पुस्तकांची सगळ्यात मोठी देणगी असते हे खरंच. आणि कुणी अगदी समीक्षक किंवा विद्वान असलं तरीही पुस्तकांपाशी जाताना मात्र असं सर्वसामान्य वाचक बनून गेलं तरच त्यांची भेट होण्याची शक्यता जास्त. म्हणूनच एरवी स्वत: लेखक असूनही अ‍ॅनी फॅडिमन यांनी या छोटेखानी पुस्तकाला ‘कन्फेशन्स ऑफ अ कॉमन रीडर’ असं म्हटलं आहे. त्यामुळेच पुस्तकांवर अंतर्बाह्य प्रेम करणा-या प्रत्येकाला हे पुस्तक आवडेल, इतकंच नाही तर आपलंच वाटेल. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 298 | displaying: 61 - 70