PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क लेखकाची व्यथा आणि कथा ================================================================================ वसंत केशव पाटील on 17 October, 2011 04:30:00 AM श्रीलाल शुक्ल यांच्या बरोबरीने 2009 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, त्या परिवर्तनवादी पत्रकार-कथाकाराच्या म्हणजे अमरकांत (मूळ नाव श्रीराम वर्मा) यांच्या मे 2008 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचे हे शीर्षक वाचून कोणीही रसिक खचितच गलबलून जावा! विचारनिष्ठा आणि कर्तृत्व ================================================================================ अविनाश कोल्हे on 17 October, 2011 04:30:00 AM विसाव्या शतकातील एक महान व्यक्ती म्हणून चíचल यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांनी सर्वात आधी नाझीवाद आणि रशियातील कम्युनिझमचा धोका ओळखला होता. एवढेच नव्हे तर सर्व जग जेव्हा या ना त्या कारणाने हिटलर आणि स्टालिन यांचे गोडवे गात होते, तेव्हा चíचल वेगळी मांडणी करत होते. फिक्शनमधली पुस्तकं ================================================================================ नीतीन रिंढे on 10 October, 2011 05:30:00 AM पाब्लो द-सान्तिस या अर्जेटिनाईन लेखकाच्या ‘द पॅरिस एनिग्मा’(2008) या कादंबरीतल्या इसिदोरो ब्लॉन्देत या पात्राला त्याच्याच संग्रहातल्या एका पुस्तकाला हात लावल्यामुळे जीव गमवावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पॅरिसमध्ये घडणारी ही एक रहस्यकथा आहे. बुद्धीचे शस्त्र फार अपुरे! ================================================================================ रवीन्द्र कुलकर्णी on 03 October, 2011 07:30:00 AM विन्स्टन चर्चिल आणि आयझ्ॉक असिमॉव्ह या दोन्ही व्यक्ती अतिशय प्रतिभासपन्न व त्यांच्या वैयक्तिक जीवनात पूर्ण यशस्वी होत्या. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतल्यावर असे दिसते की, त्यांनी बुद्धीला फारसे महत्त्व दिलेले नाही. सहानुभूती, संवेदनशीलता, भाषाप्रभुत्व, उत्सुकता, धैर्य, प्रसंगी ‘एकला चलो’ची वृत्ती इत्यादी अनेक गुणांचे सुरेल मिश्रण त्यांनी जाणीवपूर्वक जोपासले होते. असिमॉव्हच्या आत्मचरित्राचा सूर तर ‘बुद्धिमान’ असल्याने त्याचे नुकसान झाले, असा आहे. छोटय़ा चर्चिलचा निर्भीडपणा, प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती, रगेलपणा व चलाखपणा हे सर्व गुण त्याच्या शिक्षकाशी झालेल्या पहिल्यावहिल्या संवादातूनही दिसून येतात. आधुनिक विचारवंताशी गप्पा ================================================================================ अविनाश कोल्हे on 26 September, 2011 06:00:00 AM डॉ. भिखू पारेख यांना आजच्या काळातील एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून सारे जग ओळखतं. त्यांच्या या गप्पा वाचकांना एका वेगळ्याच वैचारिक विश्वात घेऊन जातात. त्यांच्या मते, भारतीय यंत्रणा पुरेशी लवचिक आहे. या यंत्रणेने अनेक फुटीरतावादी लढे पचवले. मिझोंचा लढा आणि नागांचा लढा यथावकाश मध्यप्रवाहात आले. भारतात एकाच वेळेस चर्चा आणि हिंसाचार सुरू असतो. पारेख यांच्या मते आजच्या भारतीयांच्या पिढीला परदेशी लोकांची भीती वाटत नाही. उलटपक्षी आजचा भारतीय स्वत:च्या गुणांवर परदेशात नाव कमवत आहे. संघर्षशील साहित्यिक! ================================================================================ वसंत केशव पाटील on 26 September, 2011 06:00:00 AM श्रीलाल शुक्ल यांनी कलात्मकतेशी कधीही तडजोड केली नाही. मुन्शी प्रेमचंद आणि फणीश्वरनाथ रेणू यांची मौलिक परंपरा शुक्ल यांनी मोठय़ा ताकदीने पुढे प्रवाहित केली आहे. अज्ञेय आणि बंकिमचंद्र यांच्याशी असणारी त्यांची वैचारिक नाळसुद्धा उल्लेखणीय आहे. वाचकांच्या दुनियेत.. ================================================================================ नीतीन रिंढे on 19 September, 2011 07:00:00 AM पुस्तकाशी असणारं वाचकाचं नातं जेवढं आनंददायक असतं तेवढंच यातनादायकही असतं. पण हे असं आनंददायक, यातनादायक नातं जेव्हा कादंबरीचा विषय होतं तेव्हा आपल्यासारखा वाचक सुखावतो. अस्सल लेखक नेहमीच अस्सल वाचकांच्या शोधात असतात. आणि अस्सल वाचक अस्सल पुस्तकांच्या. त्याच वेळी कॅल्विनो किंवा बेनाबू यांच्यासारखे मनस्वी लेखक वाचकाभोवतीच आपल्या कादंब-यांचं अद्भुत जाळं विणतात. या जाळ्यातला कोळी होण्यासाठी वाचक कायमच उत्सुक असतो.. प्रत्युत्तर, हजरजबाबीपणा आणि धोबीपछाड! ================================================================================ रवींद्र कुलकर्णी on 05 September, 2011 08:00:00 AM कोणतीही भाषा पोकळीत वाढत नाही. ती सामाजिक आदानप्रदानातून संपन्न होत असते. जेथे असे जीवन नसते तेथील भाषाही माणसांच्या जीवनाप्रमाणे खुरटलेली राहते. भाषेची संपन्नता हे त्या त्या समाजाच्या मोकळेपणाचे व व्यक्तीप्रधानतेचे लक्षण असते. सभा-संमेलने, पत्रव्यवहार, खेळाची मैदाने, रंगमंच अशा अनेक ठिकाणी भाषा वैभवाचे प्रत्यंतर आपल्याला येत असते. चांगले प्रत्युत्तर वा मार्मिक प्रतिक्रिया ही पंचपक्वानामधील लोणच्यासारखी असते. त्याने पोट भरत नाही पण ते हवेसे वाटते. बेकारी आणि पुस्तकं ================================================================================ प्रहार on 05 September, 2011 08:30:00 AM ही एका पुणेरी वाचनवेडय़ाची दैनंदिनी आहे. म्हणजे त्याच्या दैनंदिनीतली काही पानं. त्यामुळे त्यातल्या नोंदी त्रोटक, अपु-या आणि जुजबी म्हणाव्या अशाच आहेत. शिवाय त्यात पुस्तकांबद्दल फारसं काही लिहिलेलंही नाही. या नोंदी छापण्यामागचा उद्देश वेगळाच आहे, आणि तो या नोंदींमधूनच प्रतीत होतो. बेकारीच्या काळातही पुस्तकं उसनवार घेऊन वाचणा-याची बांधीलकी ही काय स्पष्ट करून सांगायची असते? भारतीय मुस्लिम आणि स्वातंत्र्यलढा ================================================================================ अविनाश कोल्हे on 29 August, 2011 07:00:00 AM भारतातील मुस्लिम समाजाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज प्रचलित आहेत. यातील एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे या समाजाने स्वातंत्र्यलढय़ात फारसा सहभाग घेतला नव्हता. दुसरा गैरसमज म्हणजे या समाजातील सर्वाना पाकिस्तान हवे होते. खरी स्थिती अशी आहे की मुस्लिम समाजाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लक्षणीय योगदान दिलेले आहे.