पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

कहाणी दलाई लामांच्या संघर्षाची

18 April, 2011 05:30:00 AM
आज एकविसाव्या शतकाच्या दुस-या दशकात प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा तिबेटची समस्या जगासमोर येत आहे. या समस्येभोवती काही मूलभूत तत्त्वं आहेत- सांस्कृतिक स्वायत्तता म्हणजे काय? राजकीय अधिकार आणि सांस्कृतिक अधिकार, धार्मिक अधिकार यांच्यातील सीमारेषा कशा आखायच्या वगरे प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत. त्या दृष्टीने तिबेट हा चिमुकला देश महत्त्वाचा ठरणार आहे.

लढाई विनायक सेनची

18 April, 2011 05:30:00 AM या पुस्तकाचा विषय डॉ. सेन यांच्यावर छत्तीसगढ सरकारनं लावलेल्या आरोपांचं खंडन हा असला तरी विनायक सेन यांनी अगदी ग्रासरूट लेव्हलवर केलेल्या कामाची ओळख करून देण्याचं मोठं काम या पुस्तकानं केलं आहे. डॉ. सेन यांना शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी, ते जामिनावर सुटलेले असताना, त्यांच्याशी तसंच त्यांच्या आसपासच्या लोकांशी बोलून लिहिलेलं हे पुस्तक आहे. डॉ. विनायक सेन यांचा उल्लेख मानवी हक्क कार्यकर्ते असा होत असला, तरी हा माणूस मुळात एक डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ आहे आणि छत्तीसगढमधल्या ग्रामीण आरोग्यसेवेत या माणसाचा अमूल्य वाटा आहे, ही बाब आजही या क्षेत्रातले लोक सोडता इतरांना फारशी माहीत नाही....
आणखी वाचा
image

पुस्तकं स्वतःविषयी बोलतात तेव्हा...

11 April, 2011 05:30:00 AM अ‍ॅनी फॅडिमन लग्न करते तेव्हा तिच्या ग्रंथसंग्रहाचंही नव-याच्या ग्रंथसंग्रहासोबत लग्न करावं लागतं. अल्बेर्तो मँग्युएलच्या ग्रंथसंग्रहातली पुस्तकं रात्री आपापसांत कुजबुजतात. कार्लोस लुईस झाफोनच्या ‘द शडो आफ द विन्ड’ या कादंबरीतल्या लिस्बन शहरात विस्मरणात गेलेल्या पुस्तकांचं एक कबरस्थान असतं. कार्लोस मारिया डॉमिन्गूजच्या ‘द हाऊस ऑफ पेपर’ या कादंबरीचा नायक पुस्तकांसोबत शय्यासोबत करतो. अशाच काही पुस्तकांविषयीच्या पुस्तकांविषयीचं हे नवं सदर.. दर पंधरवडय़ाने....
आणखी वाचा

हरफनमौला

11 April, 2011 05:30:00 AM ‘सुहाग के नुपूर’, ‘बूँद और समुद्र’, ‘शतरंज के मोहरे’, खंजन-नयन’, ‘अमृत और विष’, ‘एका नैमिषारण्ये’, ‘मानस का हंस’, ‘करवट’, ‘नाच्यौ बहुत गोपाल’ या नागरजींच्या काही गाजलेल्या कादंब-या. त्या विविध भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाल्या आहेत. ‘टुकडे टुकडे दास्तान’ ही त्यांची आत्मकथासुद्धा मोठी रोचक आणि रंजक आहे....
आणखी वाचा
image

अपप्रवृत्तीः माध्यमातल्या आणि समाजातल्या

28 March, 2011 05:30:00 AM टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. त्यामुळे टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे....
आणखी वाचा

कवितेत अंदाधुंदी आणि अराजकताही- नमिता सिंह

28 March, 2011 05:30:00 AM कोलकात्यातल्या ‘भारतीय भाषा परिषदे’च्या ‘वागर्थ’ या मासिकात (मार्च 2011)ज्येष्ठ कथालेखिका नमिता सिंह यांची मुलाखत प्रकाशित झाली आहे. नमिता सिंह यांनी हिंदीमध्ये अतिशय महत्त्वाचे कथालेखन केले आहे. लवकरच त्यांची ‘लेडीज क्लब’ ही कादंबरी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या मुलाखतीतला हा काही भाग.....
आणखी वाचा
image

अंतर्मुख करणारी चित्रमय कादंबरी

21 March, 2011 07:35:00 AM सारनाथ बॅनर्जी हे आजच्या काळातील अतिशय महत्त्वाचे चित्रकार-लेखक आहेत. त्यांची नजर समाजसुधारकाची आहे. अर्थात कोणताही चांगला व्यंगचित्रकार मूलत: समाजसुधारक असतो. फक्त त्याच्या आविष्काराचे साधन कुंचला असते. तो हसत हसत समाजातील विसंगतींवर बोट ठेवतो, आपल्यासमोर आरसा धरतो. त्यामुळे आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. सारनाथ बॅनर्जी यांच्या आविष्काराचे हे महत्त्व आहे. ‘द हरप्पा फाईल्स’ ही त्यांची नवी ग्राफिक नॉव्हेल या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे....
आणखी वाचा
image

बाल, किशोर, युवक आणि ‘कलाभारती’

21 March, 2011 08:05:00 AM ‘कलाभारती’चा दुसरा खंड इन्स्टॉलेशनविषयी असल्याने या पुढच्या काळात या कलेला महत्त्व येणार आहे वा ही कला महत्त्वाची ठरू शकते असे संपादकांना यातून सुचवायचे आहे का? पण मग अमूर्त चित्रकलेचे काय? तिचा प्रवास कसा होईल? एकंदर भारतीय चित्रकला सध्या ज्या टप्प्यावर आहे, तिचा या पुढचा प्रवास कसा राहील याविषयी या दोन्ही खंडांमध्ये लेखन नाही. काही महत्त्वाचे चित्रकार, त्यांचा चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि कलासमीक्षकांच्या नजरेतून या चित्रकारांची चित्रे असे या दोन्ही खंडांचे स्थूलस्वरूप आहे. ...
आणखी वाचा
image

भारताचे 19 शिल्पकार

14 March, 2011 05:30:00 AM या पुस्तकात राजकीय नेत्यांची जी परंपरा दिसते, ती आता आपल्या देशातून मृतप्राय झाली आहे. सध्या आपल्या देशात असा एकही नेता नाही, जो आपले विचार आणि लेखन यांनी समाजाला प्रभावित करू शकेल किंवा समाज आणि राजकारणामध्ये कुठल्या बदलांची गरज आहे, याची समज बाळगू शकेल. या पुस्तकातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रामचंद्र गुहा यांनी इतिहासासारखा रुक्ष विषय अतिशय रोचकपणे सांगितला आहे. जितका रोचकपणा गुहा यांच्या या पुस्तकात आहे, तो अन्य कुठल्याही भारतीय इतिहासकाराच्या पुस्तकात नाही. तसे पाहिले तर या पुस्तकात गुहा यांचे लेखन तसे कमी आहे, पण त्यांनी जी भाषणे संकलित केली आहेत ते काम मात्र खूप मोठे आहे. ...
आणखी वाचा

...नाही तर तुमच्याशिवाय

14 March, 2011 05:30:00 AM ‘क’च्या कुठल्याच अंकातून करमणूक होण्याची शक्यता नाही. ‘समाज प्रबोधन पत्रिका’ हे मराठीतील नियतकालिक किंवा ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’ हे इंग्रजीतील साप्ताहिक वाचताना अक्षरक्ष: झोप येते हो, असा उसासा टाकणा-या वाचकांसाठी हे मासिक अजिबात नाही. ज्यांना गंभीरपणे साहित्य आणि कलांविषयी जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीच हे मासिक आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 298 | displaying: 71 - 80