PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क ‘गोदान’ची पंचाहत्तरी ================================================================================ प्रहार on 29 August, 2011 07:00:00 AM हिंदीमधील सुप्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ या कांदबरीचे हे पंचाहत्तरावे वर्ष आहे. पुस्तकांसोबतच जगणारा ================================================================================ नीतीन रिंढे on 08 August, 2011 06:00:00 AM रिक गेकोस्कीला पुस्तकांचं प्रचंड वेड आहे. त्यापायीच तो 1984 मध्ये इंग्लंडमधल्या वारविक विद्यापीठातली प्राध्यापकाची नोकरी सोडून जुन्या, दुर्मीळ पुस्तकांचा विक्रेता बनला. प्राध्यापकी करत असताना त्याचे पुस्तकाशी विशिष्ट प्रकारचे व्यावसायिक संबंध बनले होते. पुस्तकांविषयी काही सद्धांतिक दृष्टिकोनातूनच त्याला विचार करावा लागायचा, पण त्याला पुस्तकांशी असलेलं नातं अशा बंधनांपासून मुक्त हवं होतं. कोणत्याही जड, बौद्धिक अवडंबराशिवाय वाचनाचा, पुस्तकं हाताळण्याचा निखळ आनंद हवा होता. सहकार्य की स्पर्धा? ================================================================================ अविनाश कोल्हे on 08 August, 2011 06:00:00 AM चीन आणि भारत हे देश जगाच्या इतिहासातील महान आणि प्राचीन देश. त्याचप्रमाणे ते जवळपास एकाच वेळेस स्वतंत्र झाले. भारताने 1947 मध्ये तर चीनने 49 मध्ये स्वातंत्र मिळवले. भारताने लोकशाही शासनप्रणाली स्वीकारली, तर चीनने मार्क्‍सवाद प्रमाण मानला. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची अनेक वर्षे या दोन्ही देशांची तुलना होत असे. या मागे अमेरिकाप्रणीत भांडवलशाही तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनप्रणीत समाजवाद होता. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे ऑक्टोबर 62 मध्ये झालेले भारत-चीन युद्ध. तेव्हापासून या दोन्ही देशांत सीमेवरून वाद आहे. व्यासांची मुलुखगिरी ================================================================================ वसंत केशव पाटील on 01 August, 2011 07:00:00 AM डॉ. भगवतीलाल व्यास हे अत्यंत नम्र, निगर्वी, गप्पिष्ट आणि मनमिळावू आहेत. त्यांच्यातील विनोद-उपहास मोहून टाकतो. आपल्या भोवतालच्या वास्तवात खोलवर बुडून अतिशय साध्या, सहज आणि बोच-या भाषेत उपहासगर्भ लेखन करण्यात व्यासांचा हातखंडा आहे. व्होडाफोन-क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवॉर्डची अंतिम यादी जाहीर ================================================================================ प्रहार on 01 August, 2011 07:00:00 AM भारतीय लेखकांच्या इंग्रजीतल्या पुस्तकांना गेली दहा वर्षे व्होडाफोन-क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवार्ड दिले जात आहे. ललित साहित्य, भारतीय भाषांतील अनुवाद, वास्तव लेखन आणि बालसाहित्य या विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात. पुस्तकप्रेमींचा तत्त्वज्ञ ================================================================================ नीतीन रिंढे on 25 July, 2011 07:30:00 AM सारी हयात बेंजामिनने विसाव्या शतकात घालवली, पण एकोणिसाव्या शतकातील युरोपने त्याला पछाडलं होतं. त्याचे चरित्रकार सांगतात, ‘तो चालायचा-बोलायचादेखील एकोणिसाव्या शतकातल्या युरोपियनाप्रमाणे. वाट चुकून विसाव्या शतकात आलेला तो एकोणिसाव्या शतकातला जणू एक त्रस्त समंधच होता. अमेरिकेची छुपी वकिलीच ================================================================================ अविनाश कोल्हे on 25 July, 2011 07:30:00 AM दुस-या महायुद्धानंतर जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला. तिचा एकमेव उद्देश म्हणजे मार्क्‍सवादाचा पराभव. त्यासाठी अमेरिकेने प्रसंगी विधीशून्य राजकारण केले. ‘धोक्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे’ ================================================================================ नीला चांदोरकर on 18 July, 2011 05:30:00 AM Just Between Us या पुस्तकामध्ये भारतातील काही आघाडीच्या स्त्री लेखिकांच्या दीर्घ मुलाखती आहेत. त्यात त्यांनी आपला लेखनप्रवास, जडणघडण, सामाजिक-सांस्कृतिक सेन्सॉरशिप याविषयी दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत. त्यातील शहाजहाना या जन्माने मुस्लिम पण तेलुगूत लिहिणा-या लेखिकेची ही मुलाखत..संपादित स्वरूपात. हा मराठी अनुवाद नीला चांदोरकर यांनी केला असून लवकरच या पुस्तकाचा मराठी अनुवाद लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रकाशित होत आहे. टागोर आणि आंबेडकर ================================================================================ प्रहार on 18 July, 2011 06:30:00 AM राष्ट्रकवी रवीन्द्रनाथ टागोर आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वरवर पाहता काही साम्य दिसेल असं नाही. पण या दोघांची स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील कृत्रिप्रवणता आणि वैचारिकता पाहिली तर काही साधर्म्याचे दुवे निश्चित सापडतील, किंबहुना तसा प्रयत्न रामचंद्र गुहा यांनी केलेला आहे. त्यांनी तर डॉ. आंबेडकरांना महात्मा गांधी आणि टागोर यांच्या पंक्तीत समर्थ युक्तिवादानिशी बसवले आहे. गुहा यांच्यासारख्या आघाडीच्या विचारवंताचे लेखन वाचून कुणीही त्यांच्याशी सहमत होईल यात शंका नाही. 'राजा राव' तत्त्वज्ञ कादंबरीकार ================================================================================ अविनाश कोल्हे on 11 July, 2011 04:30:00 AM राजा राव यांचा भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व्यासंग होता. त्यामुळे त्यांच्या लेखनात अनेक तात्त्विक प्रश्नांची चर्चा आढळते. राजा राव यांचे कोणतेही पुस्तक वाचकांना अंतर्मुख करते. त्यांचे लेखन वाचकांसमोर तात्त्विक प्रश्न उभे करते. परांजपे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकामुळे राजा राव हा महान लेखक वाचकांसमोर योग्य प्रकारे उभा राहतो. लेखनाखेरीज या पुस्तकात राजा राव यांची काही दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे, काही रेखाचित्रे आहेत; ज्यामुळे या पुस्तकातील गूढ आशय अधिकच गूढ होतो.