पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

‘बा-इज्जत बरी’ आत्मकथा

07 March, 2011 07:30:00 AM
भारतातल्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचे ‘ऑन बॅलन्स’ हे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे. लीला सेठ या आघाडीचे भारतीय इंग्रजी लेखक विक्रम सेठ यांच्या मातोश्री. त्यांच्या पुस्तकाचा हिंदी कथाकार राजेन्द्र यादव यांनी करून दिलेला हा परिचय.
image

इझमच्या पलीकडचा लेखक

07 March, 2011 08:00:00 AM भीष्म साहनी यांची ओळख एक समाजवादी लेखक म्हणून असली तरी त्यांनी कोणत्याही इझमची सावली आपल्या लेखनावर पडू दिली नाही. अगदी खालच्या थरातील मध्यमवर्गीयांच्या शोषण- संघर्षाच्या व्यथा मांडताना त्यांनी कलात्मकतेचे भानही राखले. त्यांचे सर्वच लेखन सहेतुक होते; पण त्यात कोणतेही ग्रह किंवा आग्रह नव्हते. म्हणून तर त्यांच्या कथांतून केवळ शिल्पसौंदर्य बोलत नाही तर जीवनाचे हुंकारही आपणाला साद घालतात....
आणखी वाचा
image

आवर्जून वाचावे असे..

28 February, 2011 08:25:00 AM दरवर्षी भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणा-या पुस्तकांची संख्या जवळपास सत्तर-ऐंशी हजाराच्या आसपास आहे. एवढी पुस्तके आपण वाचू शकत नाही. कारण सर्वच भारतीय भाषा काही आपल्याला येत नसतात. पण काही खाजगी प्रकाशनसंस्था आणि साहित्य अकादेमी, नॅशनल बुक ट्रस्ट यासारख्या काही निमसरकारी संस्था यातल्या महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित करतात. त्यामुळे आपल्यासारख्या ‘वाचन-भुकेल्या’ वाचकांची सोय होते. जसे जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद इंग्रजीमध्ये होतात, त्याप्रमाणे सर्व भारतीय भाषेतील पुस्तकांचे अनुवाद हिंदीमध्ये होतात, असं दिसतं. अर्थात इंग्रजीशी हिंदीची तुलना करताना फक्त लाक्षणिक अर्थच लक्षात घेतला आहे. तर ते असो. गेल्या वर्षभरात हिंदीमध्ये प्रकाशित झालेल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचा हा परिचय.....
आणखी वाचा
image

एका प्रतिभावंताचा भारत

28 February, 2011 06:45:00 AM भारताविषयी अल्पकाळाच्या वास्तव्यात गैरसमज करून घेऊन पुस्तके लिहिली जात होती, त्याच काळात विल ड्युरांट हे जागतिक कीर्तीचे विचारवंत भारतात आले. त्यांच्या संवेदनशील मनाने ब्रिटिश अमलाखालील भारताची जी दशा पाहिली त्याने ते चक्रावून गेले. मग त्यांनी ‘द केस फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले. पण हे पुस्तक प्रकाशित होताच त्यावर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली. इंटरनेटवरही या पुस्तकाविषयी फारशी काही मिळत नाही. त्यामुळे त्याचा पूर्वइतिहास जाणून घ्यायला मर्यादा पडतात. पण तीन वर्षापूर्वी स्ट्रँड बुक स्टॉलने या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली आणि नुकताच मराठी अनुवादही प्रकाशित केला आहे. 80 वर्षापूर्वी एका प्रतिभावंताने पाहिलेला भारत या पुस्तकातून आपल्याला भेटतो. भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या या इतिहासकाराचे हे पुस्तक प्रत्यक्ष वाचणे हा त्याला समजून घेण्यासाठीही उत्तम पर्याय आहे. या पुस्तकात विल ड्युरांट यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा अनुवाद- ...
आणखी वाचा

ओढाताण आणि विरोधाभास

21 February, 2011 07:30:00 AM ‘‘जेव्हा जगण्यातले विरोधाभास असह्य होतात, त्या वेळी मी लिहितो. आपण प्रत्यक्ष जगत असतो, ते आयुष्य आणि ज्या वाटेवर जायचं ठरवलं आहे ते कल्पनेतलं आयुष्य यांच्यामध्ये जेव्हा खूप ओढाताण होते, विरोधाभास गांगरून टाकतात, त्या वेळी मी लिहितो. ...
आणखी वाचा

‘दुर्लभ अभिव्यक्ति : विरल व्यक्तित्व’

21 February, 2011 06:45:00 AM ‘सापेक्ष’ या हिंदीतल्या अनियतकालिकाने तब्बल 880 पानांचा विशेषांक काढला आहे. त्याचे नाव आहे, ‘दुर्लभ अभिव्यक्ति : विरल व्यक्तित्व’. हे विशेषण हिंदीमध्ये केवळ विनोद कुमार शुक्ल यांच्याबद्दलच वापरले जाऊ शकते, याची प्रचिती या अंकामधून येते. ...
आणखी वाचा

वाचन विचार करायला शिकवतं

21 February, 2011 06:30:00 AM ‘औदुंबर-पुस्तकांच्या सहवासात’ या शशिकांत सावंत संपादित पुस्तकाची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. चित्रपट समीक्षक आणि स्तंभलेखक इक्बाल मसूद यांनी या पुस्तकात आपल्या वाचनाविषयीच्या जागवलेल्या आठवणी..खास ‘बुकमार्क’च्या वाचकांसाठी. ...
आणखी वाचा
image

जगणं व्यापणारा कवी

14 February, 2011 03:35:00 AM चंद्रकांत देवतालेंना नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा ‘कुसुमाग्रज साहित्यसेवा पुरस्कार’ दिला जातोय ही आणखी आनंदाची गोष्ट आहे. याचं कारण देवतालेंचं मराठीशी प्रत्यक्ष आणि आत्मीय नातं आहे. बरंचसं मराठी साहित्य ते नियमितपणे वाचत असतात. ...
आणखी वाचा
image

हेमिंग्वेचा ओल्ड मॅन आणि गोनीदांचा बुधा!

14 February, 2011 05:15:00 AM ही दोन्ही कथानकं साधी.. पण सोपी नाहीत. म्हणूनच अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’मधला म्हातारा आणि गो. नी. दांडेकरांचा ‘माचीवरला बुधा’ मनात घर करतात. हे दोन म्हातारे, जगण्याचे दोन निरनिराळे दृष्टिकोनच वाचकापुढे ठेवतात.. सुजाण वाचक म्हणून त्या दोघांनाही समजून घेणेच आपल्या हाती असते! ...
आणखी वाचा
image

द्रौपदीचं महाभारत

07 February, 2011 08:15:00 AM महाभारतानं द्रौपदीला ठरवून दिलेल्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचा आवेश बॅनर्जींनी द्रौपदीच्या तोंडी घातलेल्या निवेदनात नाही. पण, परिस्थितीच्या हातचं खेळणं बनल्याची हताशा मात्र जरूर आहे. ही परिस्थितीच द्रौपदीच्या व्यक्तित्वाविषयी गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्ववादी व्यवस्थेनं विद्ध केलेल्या या असामान्य चरित्रनायिकेची वाचकांना नवी ओळख करून देणं आवश्यक होतं. ‘पॅलेस ऑफ इल्युजन्स’नं हे काम अगदी चोख बजावलं आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 298 | displaying: 81 - 90