PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: बुकमार्क सुपरस्टार लेखक! ================================================================================ वसंत केशव पाटील on 11 July, 2011 04:30:00 AM कथा, कादंबरी, नाटक, मुलाखत, चित्रपट- संवादलेखन, संपादन, मालिका-निर्मिती व त्यासाठी करावे लागणारे लेखन अशा सर्व कलात्मक कस पाहणा-या साहित्य प्रकारांमध्ये आपला अभूतपूर्व ठसा उमटवणा-या कमलेश्वरांची हिंदी साहित्यातील मुशाफिरी हा एक चमत्कारच होता. वाचावीच अशी पुस्तकं ================================================================================ अनुवाद- चैताली भोगले on 04 July, 2011 05:30:00 AM मागच्या अंकात ‘गार्डियन’ने केलेल्या शंभर उत्कृष्ट ललितेतर पुस्तकांच्या यादीचा पहिला भाग दिला होता. हा उत्तरार्ध. यात तत्त्वज्ञान, राजकारण, धर्म, विज्ञान, समाज आणि प्रवास या विषयांवरील महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे. ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ असं रामदास स्वामी म्हणत. या पुस्तकांचाही तोच इरादा आणि वादा आहे. उत्कृष्ट ललितेतर पुस्तकं ================================================================================ अनुवाद : चैताली भोगले on 27 June, 2011 07:30:00 AM अलीकडेच उत्कृष्ट ललितेतर पुस्तकांची यादी ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने जाहीर केली आहे. या यादीबाबत वाद होऊ शकतात, कारण ही काही आदर्श यादी नव्हे. पण अमूक पुस्तक या यादीत नको होते, असे सहसा कोणाला म्हणता येणार नाही. मात्र, आपण या विधानाशी सहमत नसाल तर तसे ‘बुकमार्क’ला सविस्तर जरूर कळवा. चिकित्सक प्रतिक्रियांचे स्वागत आहे. भारलेल्या पुस्तकांची फँटसी ================================================================================ नीतीन रिंढे on 27 June, 2011 07:50:00 AM झिवकोविचच्या साहित्यात विज्ञानकथा, फॅण्टॅस्टिका, मिथ्यकथा, रूपककथा, वास्तववादी कथा या सर्व प्रकारांची लक्षणं दिसतात. त्यामुळे त्याला कुठलं लेबल लावावं असा प्रश्न समीक्षकांना पडतो. तो मात्र स्वत:ला फक्त ‘लेखक’ समजतो. लेखक होण्यासाठी पन्नास वर्ष हे वय आदर्श आहे असं तो मानतो. भावविश्वातली वादळं ================================================================================ अविनाश कोल्हे on 20 June, 2011 05:00:00 AM अनिता नायर यांनी स्त्री-पुरुष संबंध आणि एकंदरच मानवीसंबंधांबद्दल जी प्रगल्भता दाखवली आहे, त्यामुळे कादंबरी निराळी उंची गाठते. मीराचं भावविश्व, तिच्या पतीची तिला सोडून जाण्यामागची भूमिका वगैरे गुंतागुंत लेखिकेनं तटस्थपणे मांडली आहे. त्यात कोणालाही दोष दिलेला नाही. अशी प्रगल्भता अजून भारतीय लेखकांमध्ये आलेली नाही. ते कोणाला तरी, खास करून पुरुषाला खलनायक करतात. सनावळ्या आणि तहांपलीकडचा इतिहास ================================================================================ रवीन्द्र कुलकर्णी on 20 June, 2011 05:00:00 AM पुरातत्त्वशास्त्रे, धाडसी प्रवास आणि युद्धे हा इतिहासाचा एक मोठा भाग व्यापतात. पुरातत्त्वशास्त्राची सुरुवात सोन्याच्या आशेने पुरातन थडगी उकरणा-या चोरांमुळे झाली. हेन्रिच श्लिमन याने या शास्त्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. कुजबुजणा-या ग्रंथालयात ऐन रात्री ================================================================================ नीतीन रिंढे on 13 June, 2011 04:30:00 AM जगभरच्या कथा-कादंब-यांच्या काल्पनिक विश्वात रचली गेलेली ग्रंथालयं, मानवजातीच्या विस्मरणाला बळी पडलेले ग्रंथसंग्रह, पुस्तकप्रेमींच्या कल्पनेतली ग्रंथालयांची रूपं, लेखक-वाचकांचं आश्रयस्थान असलेली ग्रंथालयं - अशा विविध रूपांत मानवजातीला व्यापणारा खाजगी किंवा सार्वजनिक ग्रंथालयांचा इतिहास मँग्युएलला दिसतो आणि यातूनच ‘लायब्ररी अ‍ॅट नाईट’ हे अनोख्या धाटणीचं पुस्तक जन्माला येतं. म्हटलं तर हा ग्रंथालयांचा इतिहास आहे, म्हटलं तर मँग्युएलच्या आणि त्याचबरोबर जगभरच्या ग्रंथालयांचं चरित्र आहे. म्हटलं तर ललितलेखसंग्रह आहे, म्हटलं तर कादंबरी आहे. अजबखान्याच्या खिडक्या ================================================================================ रवीन्द्र कुलकर्णी on 13 June, 2011 04:30:00 AM हे पुस्तक परीक्षण नाही की, पुस्तकांचा परिचय नाही. ही एका वाचकाची डायरी आहे. पुस्तकं वाचताना त्याने नोंदवलेल्या निरीक्षणांची, त्याला सापडलेल्या सत्यांची आणि जगण्याचा प्रत्यय आलेल्या क्षणांची. या डायरीमध्ये लेखकाने एखाददुसरंच निरीक्षण नोंदवलं आहे, क्वचितच कुठे टिप्पणी केली आहे, पण ती अतिशय नेमकेपणाने आणि रसिकतेने. पुस्तकांच्या खिडक्यांमध्ये डोकावताना त्याला जे जे दिसलं, अनुभवायला मिळालं त्याची ही केवळ झलक आहे. महिलांनी टिवल्याबावल्या कराव्यात का? ================================================================================ अविनाश कोल्हे on 06 June, 2011 05:00:00 AM ‘लॉइटर’ या इंग्रजी शब्दाला ‘टिवल्याबावल्या’ हा प्रतिशब्द वापरता येईल का यावरही या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. लेखिकांनी लिहिले आहे, ‘जेव्हा हा प्रश्न आम्ही पुरुषांना विचारला तेव्हा अनेकांना धक्काच बसला. त्यांनी आम्हालाच प्रतिप्रश्न विचारला की, ‘पण महिलांनी टिवल्याबावल्या का कराव्यात? काम संपले की सरळ घरी जावे.’ ’ लेखिकांच्या मते यातून पारंपरिक प्रतिगामी पुरुषी मानसिकता व्यक्त होते. खरं तर पुरुषांप्रमाणेच महिलांनासुद्धा टिवल्याबावल्या करण्याचा हक्क आहे. त्यासाठी धोका पत्करण्याचा हक्क आहे. शिवाय एक नागरिक म्हणून महिलांनासुद्धा सार्वजनिक जागी वावरण्याचा, त्यांचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर पुरुष असणे गरजेचे नाही. ‘नई कहानी’चा उद्गाता ================================================================================ वसंत केशव पाटील on 06 June, 2011 05:00:00 AM प्रवासवर्णने, निबंधसंग्रह, भाषणे, मुलाखती व पत्रलेखनादीशी संलग्न विविध पुस्तकं निर्मल वर्मा यांच्या खात्यावर जमा आहेत. तरीही त्यांची खरी कलात्मक क्षमता व ऊर्जा प्रामुख्याने कथा-कादंब-यांमध्येच प्रगटली आहे. त्यांच्या कथांनी हिंदीतील ‘नई कहानी’ची चळवळ सुरू केली.