श्रद्धा-संस्कृती
रांगोळीचं चैत्रांगण
सूर्य, चंद्र, दोन गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, पाच कोनांची आकृती (पंचेंद्रियं), कर्मेद्रियं इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो.
पडव्याचे ‘कापडखेळे’
होळीचा सण नुकताच उत्साहाने साजरा झाला. कोकणात तर होळीची धमाल वेगळीच असते. कोकणातील पडवे गावात शिमग्याच्या निमित्ताने कापडखेळे नाचवले जातात. गावातले काही पुरुष देवीचं रूप घेऊन गावात शिमगा खेळतात त्यांना ‘कापडखेळे’ म्हणतात. पडव्यातील या अनोख्या परंपरेची ही झलक....आत्मसाक्षात्कार
तुकोबांनी विठाई माऊलीला जी विशेषणे लावली आहेत, त्यावरूनच त्यांच्या भक्तीची, तीव्र ओढीची जातकुळी समजून येते. त्यांना त्यांच्या संसाराला साह्य करणारी, प्रापंचिक सुख देणारी विठाई नको. तर भवच्छेदक म्हणजे संसारबंधातून मुक्त करणारी करणारी विठाई माऊली हवीय. ही माऊली केवळ मूर्तीत नसून विश्वव्यापक, विश्वंभर आहे आणि अशा या विश्वंभराची भेट होण्यासाठी आपल्यालाही तसेच विश्वव्यापक व्हावं लागणार, ही पक्की जाण तुकोबांना आहे. ...आध्यत्मिक आचारसंहिता सांगणारी व्यासगीता
महाभारतात भगवद्गीता, कपिलगीता, वसिष्ठगीता, पराशरगीता आदी अनेक गीता आहेत. ज्या योगवासिष्ठ ग्रंथातून दिव्य आत्मबोध देतात. सर्व पुराणांतर्गत असणा-या गीता म्हणजे मानवाच्या ख-या सांगाती आहेत. भागवतात हंसगीता व भिक्षुगीता ज्याप्रमाणे मानवास शांती-सुखाचा राजमार्ग दाखवतात त्याप्रमाणे व्यासगीता अखिल मावनास सुखी जीवनाची आध्यात्मिक आचारसंहिता प्रदान करते. ...नाधवडेतील गंगा
नाधवडेच्या पवित्र भूमीत झुळझुळ वाहणा-या पाण्याचा झरा येथे पाहायला मिळतो. याच उमाळ्यावरून गोठण नदीची सुरुवात होते. हे उमाळे किती वर्षापासून येताहेत, कुणालाही ठाऊक नाही. पाऊस असो नाही तर कडक उन्हाळा, उमाळे येतच राहतात. त्यांचा वेग थांबत नाही. पाणी सातत्याने वाहत राहतं. महादेव मंदिराच्या प्रांगणात रांगत-रांगत पोहोचणारं पाणी गोठण नदीवरून मग सुसाट वेगात सुटते. या परिसरात असे 50 ते 60 उमाळे आहेत. प्रत्येक उमाळ्यातून तासागणिक हजारो लिटर पाणी येत असतं. ...वृत्रदैत्याची जीवनकथा
युद्धिष्ठिर जेव्हा आपणच पांडव दु:खी व इतर लोक सुखी असे गृहित धरून जेव्हा जगातील सुखी लोकांचा जयजयकार करतात तेव्हा हसायला येते. आम्ही पांडव प्रत्यक्ष देवापासून उत्पत्ती होऊन जीवनात वावरत असताना आम्हा पांडवांपेक्षा या जगात दु:खी कोणीच नाही, असा बाऊ करणा-या युधिष्ठिरास भीष्माचार्य वृत्तगीतेत वृत्रदैत्याचे उदाहरण देऊन जीवनातील पलायनवादापासून ते त्यास मुक्त कसे व्हावे सांगतात....अंतरंग दर्शन
अंधश्रद्धेत कधीच न अडकलेले प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांचं कवी राधोगोविंदसुत (अशोककुमार गोविंदराव इंदुलकर) कृत ‘श्रीथोरले स्वामीमहाराज चरित्रामृत’ हे चरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे ८६० पानी चरित्र ओवीबद्ध असून त्याची राधोगोविंदसूत यांचे स्नेही विजय आपटे यांनी करून दिलेली ही ओळख- ...भक्ती अन् शक्तीचा मिलाफ
नारायणगावाजवळील (जि. पुणे) हिवरे-शिवहरिनगर गावात महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या श्रीशिवहरिश्वर यात्रेत ‘भक्ती अन् शक्ती’चा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला....भवभ्रम दूर करणारी भविष्यगीता
जीवनमुक्त झाल्याशिवाय जीवनातील तीव्र जीवन कलहावर, जीवघेण्या प्रसंगांवर मात करता येत नाही. अपयशांचे विष पचवता येत नाही. प्रसंगांना सामोरे जाता येत नाही. आत्म्यातच आत्मा विष स्थित आहे. स्वस्वरूपाच्याच ज्ञानाने भ्रममुक्त होता येते, म्हणून अध्यात्माचा आत्मविचार महत्त्वाचा आहे. ...देवाशी भांडण!
देवाच्या भेटीसाठी जिवाला लागलेली तगमग इतकी निकराला पोहोचली की, देवाची आळवणी करता-करता तुकोबा त्याच्याशी भांडूच लागले! ते म्हणतात, एखाद्या प्रेताजवळ त्याच्या आप्तजनांनी ‘ऊठ रे बाबा, तू बोल रे बाबा’ अशी कितीही करुणा भाकली तरी ती वाया जाते, त्याप्रमाणे अहो देवा, तुमच्या जवळ मी केलेली काकुळती व्यर्थ गेली. ...मोस्ट कमेंटेड



‘मास्को’ द ड्रामा