श्रद्धा-संस्कृती
‘हिरवाई’ची पूजा
28 July, 2010 07:30:00 AM
विशिष्ट सणावाराला आणि व्रत-वैकल्यांतही विशिष्ट वृक्षांच्या पत्रींचा वापर करण्याची आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे. निसर्गातल्या हिरवाईची किमया आणि सण-व्रतांमधील पूजाअर्चेसाठी वापरल्या जाणाऱ्या पत्री यांचं नातं अतूट आहे. हे नातं आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ आणतं. आपण निसर्गाचंच एक रूप आहोत, याची प्रचिती देतं. किंबहुना निसर्गातच देवत्व असल्याचं आपल्याला सांगतं.
वानरांचं हनुमान स्तोत्र वानरगीता
28 July, 2010 08:20:00 AM प्रमुख छत्तीस वानरांनी आपले विचार गीतेत मांडले आहेत. या गीतेचा पाठ केल्यास पाठकास उदंड आरोग्य व आयुष्य मिळतं, शनीची पीडाही होत नाही. भीती जाते, अंगी निर्भयता बाणते, ईप्सित, मनोरथ सफल होतात, अशी या गीतेची फलश्रुती आहे. सर्व हनुमानभक्त याचा निर्वाळा देतात. ...अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची..
28 July, 2010 07:50:00 AM तुकारामांची संपूर्ण गाथा अंभग छंदातलीच असणार, असा आपला समज होतो, पण त्यांनी गाथेत काही ओव्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या या ओव्या दोन चरणाच्याच आहेत. अशा त्यांच्या साधारण दोनशे ओव्या उपलब्ध होतात....वैचारिक बोधगीत भिक्षुगीता
14 July, 2010 07:50:00 AM मर्मभेदक तीक्ष्ण वाग्बाण जितक्या व्यथा निर्माण करून अंत:करण दुखावतो तितका ताप मर्मी लागलेला बाणसुद्धा देत नाही, म्हणून कोणाचा मत्सर करून त्यास बोलून त्याचं अंत:करण कधीच दुखावू नये. तू पूर्वकर्माच्या परिपाकानुसार जे समग्र वर्तन करतोस, तसंच इतर मनुष्यही करत असतात. स्थिर अंत:करणाच्या संन्याशाने ही गीता गायलेली आहे, हे विसरू नको. ...आंधळा-पांगळा
14 July, 2010 07:30:00 AM इंद्रियांच्या कोडकौतुकात रममाण होऊन कर्मबंध पक्के केले आणि त्यामुळे चौ-यांशी लक्ष योनीत फिरून-फिरून पांगळा झालो. ही चौ-यांशी लक्ष योनींची गावं माझी मूळ ठिकाणं नाहीत, माझे मूळ ब्रह्मस्थान मिळावं, म्हणून देवा, तुझी मी करुणा भाकत आहे,’ असं तुकोबा भगवंतांना आळवतात. ...निरोप घ्या.. आमुचा जाता जाता
14 July, 2010 06:00:00 AM जैतुनबीने केवळ विठ्ठलाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं होतं. ती भजन कीर्तन करायची. पण त्यातून समाजाला काही तरी उपदेश गेला पाहिजे, यावर तिचा कटाक्ष असायचा. ‘भेदाभेद भ्रम’ या संकल्पनेचा ती प्रचार करायची. मुलगा, मुलगी, गरीब, श्रीमंत असा भेद करणं योग्य नाही. देवापुढे सर्वजण सारखेच आहेत, असं ती नेहमीच सांगायची. ...मेघदूताची मोहिनी
14 July, 2010 05:00:00 AM आवश्यक काव्यगुणांचा प्रमाणबद्ध वापर व मिलाफ हे मेघदूताच्या लोकप्रियतेचं मर्म आहे. कथानकातील कार्यकारणभाव, सुसंगतता यथाप्रमाण असल्याने मेघदूत बांधेसूद, सर्वागसुंदर, अपूर्व बनलं आहे. म्हणूनच त्याची रसिक मनावरची पकड सैल होत नाही. यातील प्रत्येक श्लोक स्वतंत्रही आहे आणि सबंध काव्याचा घटकही आहे. आषाढाचा पहिला दिवस परवाच गेला तेव्हा या भावकाव्याची मोहिनी पुन्हा एकदा मनावर गारूड करून गेली....विठ्ठलाचे सेवेकरी करती आनंदाची वारी
07 July, 2010 08:00:00 AM पंढरपूरची वारी म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळा. ही वारी दरवर्षी नित्यनेमाने करणारे अनेक जण आहेत. ऊन-पावसाची तमा न बाळगता, खाचखळग्यांची वाट तुडवत अनवाणी पायाने विठ्ठलमय ब्रह्मानंदी टाळी लागलेला जनमेळा पंढरपूरच्या दिशेनं निघतो तेव्हा त्यामागे एकच प्रेरणा असते विठ्ठलभेटीची! वारी आणि वारकरी यांच्या अंतरंगाचा घेतलेला हा वेध.....शेगाव ते पंढरपूर
07 July, 2010 07:30:00 AM आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचणा-या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर इतरही अनेक पालख्या या दिवशी तिथे पोहोचत असतात. शेगावहून निघणारी गजानन महाराजांची पालखी ही यातलीच एक. गेली 39 वर्ष ही पालखी दरवर्षी नित्यनेमाने पंढरपूरकरता जात आहे. 500 वारकरी, 100 सेवाधारी आणि कर्मचारी अशा एकूण 600 जणांची ही पालखी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावं फिरत ती पंढरपूरला मार्गक्रमण करत असते....अमृत जीवन पराशर गीता
30 June, 2010 09:15:00 AM अध्यात्म्याच्या प्रांतात महाभारतात शांतिपर्वात उत्तरार्धात मोक्षधर्म पर्वातील दोनशे नव्वद ते दोनशे अठ्ठ्याण्णव अध्यायांमध्ये ‘पराशर गीता’ आलेली आहे. ही पराशर गीता म्हणजे प्रत्येक माणसाची अमृत जीवन गीताच आहे. ही गीता युधिष्ठिरास भीष्माने आणि जनक राजास पराशर ऋषींनी सांगितली आहे. जनक आणि पराशर ऋषींचा संवाद म्हणजे हीच ‘पराशर गीता’ होय....मोस्ट कमेंटेड




राशीभविष्य