मध्यंतर
यशोगाथा ‘पर्किन-एल्मर’ची
22 May, 2012 08:25:00 AM
अंतराळ विश्वाचं आकर्षण असलेल्या चार्लस एल्मर आणि रिचर्ड पर्किन या दोन व्यावसायिकांनी एकत्र येऊन ‘पर्किन-एल्मर’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय उद्योगासाठी लागणा-या उपकरणांची निर्मिती करणं. गेल्या पंच्चाहत्तर वर्षापासून कंपनी ते काम अविरतपणे करत आहे. कंपनीच्या यशोगाथेवर टाकलेला प्रकाशझोत.
डायनोसॉर युगातलं परागीभवन
22 May, 2012 07:25:00 AM परागीभवन घडवणा-या साधारण दहा कोटी वर्षापूर्वीच्या कीटकांचा शोध फ्रान्समधील संशोधक कॅरमेन सोरियानो आणि त्यांच्या चमूला लागला आहे. परागीभवनाला कारणीभूत असणा-या या कीटकांची प्रजाती डायनोसॉरच्या युगातील असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे....वैशिष्ट्यपूर्ण घरांची निर्मिती करणारे ओरांगउटांग!
22 May, 2012 07:05:00 AM नुकताचा मँचेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी माकडांचा अभ्यास केला. त्या अभ्यासात इतर प्राण्यांपेक्षा माकडामध्ये अधिक हस्तकौशल्य असल्याचं स्पष्ट झालं आहे....कुतूहल आफ्रिकेतील पाणीसाठ्याचं
22 May, 2012 06:55:00 AM पाण्याचा अनियंत्रित उपसा, हे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. पाणीटंचाईची समस्या आज भारतासारख्या महत्त्वपूर्ण देशांना जाणवत आहे. ...सार्वभौम लोकशाहीचं प्रतीक
21 May, 2012 08:45:00 AM आजवर भारत आणि भारतीय लोकशाहीविषयी कितीतरी पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यांचं संसदेच्या साठीनिमित्त स्मरण करणं, वाचन करणं आणि भारतीय लोकशाही सामंजस्यानं समजून घेणं, हे आपल्या अधिक हिताचं आहे आणि लोकशाही भारताचा नागरिक म्हणून कर्तव्यही आहे....मंटो, असे नि तसे!
21 May, 2012 08:15:00 AM उर्दूमधील प्रसिद्ध कथाकार सआदत हसन मंटो यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 11 मे पासून सुरुवात झाली आहे. मंटो यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या कथा वाचणं, पुन्हा पुन्हा वाचणं हा सर्वात चांगला आणि निधरेक मार्ग आहे. उर्दू आणि हिंदीमध्ये मंटोविषयी बरंच लिहिलं गेलं आहे. उपेंद्रनाथ अश्क यांनी तर ‘मंटो : मेरा दुश्मन’ या नावानं एक पुस्तकच लिहिलं आहे. या पुस्तकाशिवाय मंटो यांना समजून घेता येत नाही इतकं ते महत्त्वाचं आहे. कृष्णचंदर आणि इस्मत चुगताई यांनीही मंटोंवर खूप छान पद्धतीनं लिहिलं आहे. कृष्णचंदर यांचं व्यक्तिचित्र मंटोला न्याय देणारं आहे. फार पूर्वी ‘सारिका’ या कमलेश्वर संपादित करत असलेल्या मासिकामध्ये ‘मेरा दोस्त, मेरा दुश्मन’ अशी लेखमाला येत असे. त्यात मंटो यांनी चुगताईंवर तर चुगताई यांनी मंटोंवर लिहिलं होतं. इथं कृष्णचंदर यांच्या लेखातील दोन किस्से देत आहोत. ज्यातून मंटोंच्या व्यक्तिमत्त्वाचं ओझरतं दर्शनं व्हायला मदत होते....मोठ्या राजकीय नेत्यांची साधी चरित्रंही नाहीत!
21 May, 2012 08:05:00 AM मोबाईल क्रांती झाल्यानंतर एसएमएसद्वारे बातमी पाठवल्यास ती सेवा होऊ शकते, या कल्पनेतून पुण्याच्या चिंतन ग्रुपनं जगातील पहिली ‘एसएमएस न्यूज सव्र्हिस’ सुरू केली. तेव्हापासून राज्यातील व केंद्रातील अनेक राजकीय नेते व प्रशासनातील अधिका-यांना चिंतन ग्रुपच्या माध्यमातून मदत होत आहे. गेल्याच महिन्यात चिंतन ग्रुपतर्फे ज्येष्ठ कवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणा-या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्तानं चिंतन ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य संपादक अभिनंदन थोरात यांच्याशी विधात्री कीर्तने यांनी केलेली बातचीत....भारतीय प्रसारमाध्यमातील अदृश्य घटक
20 May, 2012 01:45:00 PM सन 1991 मध्ये तिथं कुणी नव्हतं, आजही तिथं कुणी नाही- प्रसारमाध्यमांमधील दलितांबद्दल मी बोलतो आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकसंख्या असलेल्या दलितांचं (अनुसूचित जाती आणि जमाती) काय चालू आहे हे कुणाला माहीत असायचं काही कारणच नाही, कारण त्याबद्दल कधीही लिहिलं जात नाही, कधीही दाखवलं जात नाही......शिक्षण वाचवा राजकारणापासून
20 May, 2012 12:50:00 PM राजकारणाबाबत तरुण पिढीने गंभीरतेने आणि सर्तकतेने विचार करावा यासाठी आम्ही हे पुस्तक बनवले होते. मात्र, आपले राजकारणी त्यासाठी अजून तयार झाल्याचे दिसत नाही....जिद्दीचं बळ
19 May, 2012 08:15:00 AM हृषीकेश यादव आणि सुरेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पहिल्या भारतीय नागरी मोहिमेने 18 मे 1998 रोजी एव्हरेस्ट सर केलं. या घटनेला 15 वर्ष पूर्ण झाली. येत्या दोन दिवसांत पुण्यातून गेलेल्या दुस-या भारतीय नागरी मोहिमेचे सदस्य एव्हरेस्टच्या समीटवर पोहोचणार आहेत. त्यानिमित्तानं पहिल्या मोहिमेचे नेते हृषीकेश यादव यांच्याशी साधलेला संवाद.....मोस्ट कमेंटेड















































































































राशीभविष्य