हे आवाज रोखा!
शहरांमध्ये आपण किती प्रकारच्या प्रदूषणांना सामोरे जात आहोत. निसर्गावरचं अतिक्रमण या विषयांचा कितीही ऊहापोह झाला तरीही स्थलांतरं, शहरांकडे लोटणारी गर्दी आणि जागेचा उद्भवणारा प्रश्न यामुळे ‘शहरी समस्या व त्यावरील उपाय’ याचं प्रश्नचिन्ह सतत त्या शहराभोवती फिरत राहील. हे साधे सामाजिक प्रश्न पण ओघवत्या काळामध्ये भेडसावणारा आणखी एक प्रश्न म्हणजे ओसरत जाणारी शिस्त, हा एक प्रबोधनाचा विषय आहे.
‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती..’ कवी उत्स्फूर्तपणे अशी कविता लिहितो पण त्या उक्ती आणि पंक्ती आपल्याला कुठेतरी उपयोगी पडतात.घर बांधताना किंवा नवीन फ्लॅट घेतला असेल किंवा जुन्या घराचं नूतनीकरण करताना काही गोष्टी जर आपण अगोदरच लक्षात घेतल्या तर आपलं साध्य पूर्ण झाल्यावर त्या आपल्याला अधिक सुखसमाधान देतील.
शहरांमध्ये आपण किती प्रकारच्या प्रदूषणांना सामोरे जात आहोत. निसर्गावरचं अतिक्रमण या विषयांचा कितीही ऊहापोह झाला तरीही स्थलांतरं, शहरांकडे लोटणारी गर्दी आणि जागेचा उद्भवणारा प्रश्न यामुळे ‘शहरी समस्या व त्यावरील उपाय’ याचं प्रश्नचिन्ह सतत त्या शहराभोवती फिरत राहील. हे साधे सामाजिक प्रश्न पण ओघवत्या काळामध्ये भेडसावणारा आणखी एक प्रश्न म्हणजे ओसरत जाणारी शिस्त, हा एक प्रबोधनाचा विषय आहे. प्रत्येक जण फक्त स्वत:पुरता, मर्यादित. प्रत्येकाने अवलंबिल्या पाहिजेत, अशा कितीतरी गोष्टींमुळे आपण समाजस्वास्थ्य सुधारण्यास मदत करू शकतो. बेसिक एटिकेट्स पाळले तरी खूप झालं. या गोष्टी मी इथे अंतर्भूत करते आहे, कारण कुठल्याही विषयाची व्याप्ती ही मर्यादित नसते. त्याचा खोल विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. माझा विषय जरी सजावटीचा असला तरीही महागड्या गोष्टी विकत घेतल्यामुळे किंवा जगातली आर्थिक स्वरूपातली सगळी सुखं मी घरात आणून ठेवल्यामुळे मला खरोखरच समाधान मिळतं का?
तर आपण जेव्हा घरात कुठल्याही प्रकारचं काम करायचं ठरवतो तेव्हा आजूबाजूचा परिसर, भोवतालचं वातावरण किंवा घरातलं वातावरण याचा प्रत्येकानं विचार करावा. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, यावरूनसुद्धा घरातील रंगसंगती कशी असावी, याचाही आपण विचार करणं आवश्यक असतं. आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्याला बदलता येत नसली तरीही त्याचा आपल्याला घरात त्रास होणार नाही, याची खबरदारी आपण घेऊ शकतो. अंतर्गत गृहसजावटकाराने फक्त फर्निचर, ढोबळमानाने करण्यात येणारी कामं किंवा घरातल्या प्रत्येक गोष्टीचं सिलेक्शन, हे चांगलं दिसतं आहे किंवा बाजारात हेच मिळतं, असं म्हणून करू नये. तर या सगळय़ा गोष्टी दररोज काय प्रभाव देतील (रिप्लेक्सलॉजी) याचाही आवर्जून विचार करावा.
आजच्या लेखात आपण ध्वनिप्रदूषणाचा जास्तीत जास्त अवरोध कसा करता येईल, हे पाहू. आपल्या अवतीभोवती इतके आवाज सतत चालू असतात आणि ते आपल्या आयुष्यावर किती दूरगामी परिणाम करू शकतात, याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भल्या पहाटे होणा-या गजराच्या आवाजापासून ते रात्री-बेरात्री चालणाऱ्या एफएमच्या आवाजापर्यंत सगळय़ा प्रकारचे आवाज आपण सराईतपणे पचवतो, पण खरोखरच पचवतो का? नकळत त्यांचा प्रभाव जेव्हा शरीरावर दिसायला लागतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
अशा प्रकारच्या गोष्टींपासून आपली सुटका नसली तरीही त्याचा जास्तीत जास्त त्रास कसा टाळता येईल, हे आपण पाहूया. आपली रूम संपूर्णत: ध्वनिरोधक (साऊंडप्रूफ) करता आला नाही, तरी आपल्याला माहीत नसलेल्या कित्येक गोष्टींमुळे ध्वनींचे शोषण होऊ शकते. हा विषय सुरुवातीला घेण्याचे कारण असे की, जेव्हा आपण इंटरनल चेंज करतो किंवा इंटरनल वॉल्स तयार करतो तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवून पुढचं काम करायला हवं.गुळगुळीत पृष्ठभागावरून आवाजाचं परावर्तन लगेचच होतं, असं मानलं जातं. यास्तव आपल्या सजावटीमध्ये रफ सरफेस किंवा टेक्स्चरचा जास्तीत जास्त उपयोग करावा. समोरासमोरील भिंतींचे पृष्ठभाग वेगळय़ा प्रकारचे घेतल्यास ध्वनिरोधकासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
ध्वनिलहरी वाहून नेण्याचं सगळय़ात प्रभावी माध्यम म्हणजे हवा. ध्वनिप्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी हवा खेळती राहणं किंवा हवा बाहेर जाणंही आवश्यक आहे. याबरोबर आवाजामुळे तयार होणारी कंपनंसुद्धा (बाउंसिंग इफेक्ट न मिळाल्यामुळे) बाहेर जातात.
लहान-लहान खोल्या, जागेची कमतरता यामुळे या साध्या-साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. किंबहुना छोटय़ा जागेत हे प्रदूषण अधिक प्रभावी ठरतं. एखादा रूम खूप नॉयझी आहे, असं वाटत असेल तर सिलिंग किंवा वॉल्स खडबडीत पृष्ठभागाच्या करून बघाव्यात.
दरवाजा साउंडप्रूफ करण्यासाठी आपण वेदरस्ट्रिप्स वापरू शकतो किंवा सँडविच दरवाजा तयार करू शकतो. खिडक्यांसाठी डबल पॅनेल विंडो किंवा विनिलफ्रेम्ड विंडो तयार करता येतात. तसं बघायला गेलं तर संपूर्ण रूम साउंडप्रूफ करण्यासाठी बेसिक वॉल्सच्या आतमध्ये गॅप ठेवून आत आणखी एक वॉल बांधावी लागते. म्हणजेच एक एन्व्हलप रूम तयार करावी लागते. अशा रूम रेकॉर्डिग स्टुडिओसाठी वापरतात, परंतु 300 स्क्वेअर फूट घर असलं तरी ही गोष्ट अशक्यप्राय आणि खर्चिक आहे.
अंतर्गत गृहसजावटीमध्ये आपण वापरत असलेल्या पीओपी सिलिंगमुळे काही अंशी याला अवरोध होतो, असं म्हणता येईल. सर्वसाधारणपणे ध्वनिप्रदूषण शोधण्यासाठी आपण घरातील फर्निशिंगचाही उपयोग करून घेऊ शकतो, असं पडद्याचं कापड, सोफ्याचं कापड, सजावटीच्या वस्तू जास्तीत जास्त रफ टेक्स्चरमधलं घ्यावं. घरातल्या साध्या पडद्यांचाही आपण इतक्या चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो, हे कुणाच्या ध्यानीमनीसुद्धा नसतं.
लहानपणी आपण अडथळा शर्यत खेळायचो तसंच हे आवाजाच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम करतं. आवाजाचे असे प्रवाह रोखण्यासाठी तयार केलेली एक भिंत पाहिली. ज्यामध्ये दिवाळीत वापरण्यात येणा-या पणत्यांचा वापर करण्यात आला होता. शेण आणि माती यांच्या मिश्रणाचा लेप क्राँक्रिट वॉल्सवर देऊन थोडय़ाथोडय़ा अंतरावर या पणत्या लावल्या होत्या.
एखाद्या लक्झरीयस फ्लॅटमध्ये जेव्हा अशी शेणा-मातीची भिंत आढळते तेव्हा असंच वाटतं की, खरंच माणसाने मातीला विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी माती त्याला विसरू देत नाही.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा