PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: खबर बखर मणिपूरमधील आर्थिक कोंडीचे 100 दिवस ================================================================================ शैलेश पाटील on 09 November, 2011 02:30:00 AM मणिपूरमध्ये कुकी आणि नागा जमातींमधील मतभेदांतून सुरू झालेल्या आर्थिक कोडींला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. नक्षलवाद्यांपुढे लोटांगण ================================================================================ संदीप नलावडे on 25 February, 2011 02:30:00 AM अनेक राजकीय नेते नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती दाखवतात आणि त्यांच्यावरील कारवाईला विरोध करतात. देशातील बुद्धिजीवी वर्गातही अशीच भावना असल्याचे दिसते. ओदिशातही याचेच प्रत्यंतर मिळाले. उत्तर प्रदेश की अपराध प्रदेश? ================================================================================ संदीप नलावडे on 17 February, 2011 05:20:00 AM त्तर प्रदेश.. देशातील सर्वात मोठे राज्य, लोकसंख्याही भरमसाट, देशाच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव, केंद्राकडून विकासनिधी मोठय़ा प्रमाणावर मिळतो. तरीही देशातील मागास राज्य म्हणून गणना. गेल्या महिनाभरात या राज्यात गुन्हेगारीत आणखी वाढ झाल्याचे चित्र दिसते. प्रजा राज्यमची काँग्रेसला कुमक ================================================================================ रेश्मा भुजबळ on 11 February, 2011 04:30:00 AM दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांनी रविवारी, सात फेब्रुवारीला आपला प्रजा राज्यम पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची घोषणा केली. चिरंजीवीच्या या निर्णयामुळे आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी काँग्रेसला अंशत: स्थैर्य लाभेल, असे चित्र निर्माण झाले आहे. आसाममध्ये शांततेची चाहूल? ================================================================================ सचिन दिवाण on 03 February, 2011 09:05:00 AM ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा) या बंडखोर संघटनेबरोबर शांतता वाटाघाटी पुढे नेण्याच्या दृष्टीने आसाम आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘उल्फा’च्या आमसभेच्या बैठकीत त्यांच्या नेतृत्वाने वाटाघाटींसाठी सार्वभौमत्वाची पूर्वअट सोडून देण्याचे मान्य केले आहे. हरयाणात `जाट'वास्तव ================================================================================ आतिश नागपुरे on 26 January, 2011 04:30:00 AM गेल्या वर्षी 21 एप्रिल रोजी हिस्सार जिल्ह्यातील मिर्चपूर गावात जाट समुदायातील तरुणांनी 150 दलित कुटुंबांना घरातून हुसकावून लावत सुमारे 18 घरांना आग लावली होती. या आगीत 70 वर्षीय वृद्ध तारा चंद आणि त्यांची 18 वर्षीय अपंग मुलगी सुमन हिचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर 98 जाट तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या या सर्व जणांना दिल्लीतील एका तुरुंगात ठेवण्यात आले असून तेथेच या प्रकरणाचा खटला सुरू आहे. हरयाणातील लोकसंख्येत सर्वाधिक म्हणजे 25 टक्के वाटा असलेल्या जाटांकडून या खटल्यात येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जाट समुदायाचा पूर्वेतिहास पाहता, याची कारणे अधिक ठळकपणे लक्षात येतात. राज्यकर्त्यांची बेपर्वाई आणि भाविकांची बेशिस्त... ================================================================================ संदीप नलावडे on 21 January, 2011 04:30:00 AM शबरीमला हे केरळ राज्यातील प्रमुख देवस्थान असून दरवर्षी या यात्रेत हजारो भाविकांची गर्दी लोटते. तरीही त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने केवळ तीस पोलिस नेमले होते, हे हास्यास्पद आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेला वा स्थानिक निवडणुकीसाठीही शेकडो पोलिस तैनात असतात. एखाद्या आध्यात्मिक बाबाच्या प्रवचनालाही मोठा फौजफाटा असतो. राज्य सरकारने 1400 पोलिस तैनात केल्याचा दावा केला असला तरी, मंदिर व्यवस्थापनाने मात्र त्याचा इन्कार केला आहे. सत्तासंघर्षाचे गौड`बंगाल' ================================================================================ विजय बनसोडे on 14 January, 2011 04:55:00 AM निताई हिंसाचार घडण्याआधीच भट्टाचारजी आणि चिदंबरम यांच्यात ‘टपाली धुसफूस’ सुरू झाली होती. पश्चिम बंगालमधील माकप कार्यकर्त्यांना नि:शस्त्र करा, असे चिदंबरम यांनी पहिल्या पत्रात भट्टाचारजींना ठणकावले होते. या पत्रात त्यांनी ‘भाडोत्री मारेकरी’ असा शब्दप्रयोग केला होता. त्याला भट्टाचारजींनी उलटपाली आक्षेप घेतला. भरीत भर म्हणजे, चिदंबरम यांचे पत्र प्रसारमाध्यमांनी फोडल्यामुळे भट्टाचारजींचे पित्त आणखीनच खवळले. तेलंगणाचे घोंगडे भिजतच? ================================================================================ आसिफ बागवान on 06 January, 2011 04:30:00 AM आंध्र प्रदेशला अनेक मोठमोठे नेते देणा-या तेलंगणाची आपल्याला सावत्र वागणूक मिळत असल्याची तक्रार आजही आहे आणि त्यात तथ्यही आहे. आंध्रातील 40 टक्के लोकसंख्या असलेल्या आणि राज्यातील एकूण उत्पन्नाच्या 76 टक्के महसूल पुरवणा-या तेलंगणाच्या वाटय़ाला राज्याच्या एकूण खर्चाच्या केवळ 30 टक्केच निधी येतो. आंध्राला पाणीपुरवठा करणा-या कृष्णा आणि गोदावरी या नद्यांचा 70 टक्के भाग तेलंगणात आहे. पण सिंचनाच्या नावाने काहीच झाले नसल्याने हे पाणी आंध्रच्या वाटय़ाला जाते. बेरोजगारीचा मुद्दाही येथे प्रामुख्याने उपस्थित केला जातो. त्यामुळेच वेगळय़ा तेलंगणाच्या निर्मितीसाठी या प्रांतात सुरू असलेल्या संघर्षात तरुणांचा सहभाग प्रचंड मोठय़ा प्रमाणात आहे.