पहिले पान | मध्यंतर | `मॅड'व्हेंचर

`मॅड'व्हेंचर

image

बुलंद, बेलाग, बेफाम चढाई

18 February, 2012 10:42:00 AM
बेफाम उंची, अत्यंत कठीण आणि ठिसूळ अशी मिश्र प्रस्तररचना, तांत्रिकदृष्टय़ा कठीण आरोहण, सुरक्षादोर कापून काढणारे धारदार खडक, पाण्याचं दुर्भिक्ष्य, जंगली श्वापदांचा मुक्त वावर यांमुळे माहुली अभेद्य समजला जातो. मनगटात जोर आणि उरात धमक असेल त्यानेच माहुलीच्या वाटेला जावं, असं म्हणतात. अत्याधुनिक साधनसामग्री, सुमारे 100 हून अधिक कडे-सुळक्यांवरील चढाईचा भक्कम अनुभव आणि कुशल आरोहकांचा तगडा संघ घेऊन ‘सॅक’ने किल्ले माहुलीच्या घे-यातील तीन अजस्र सुळक्यांचं अजिंक्यत्व संपुष्टात आणलं.
image

पर्यावरण जतनाचा वसा

04 February, 2012 08:00:00 AM ‘साहस हा पाया, निसर्ग संवर्धन हे ध्येय’ या घोषवाक्यातूनच संस्थेच्या कामाची व्याप्ती स्पष्ट होते. डोंगरद-यांतील निसर्ग संवर्धनाच्या सा-याच उपक्रमांना संस्थेने आपलंस केलं आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण जतनाचे, गड संवर्धनाचे अनेक उपक्रमही राबवले आहेत. ...
आणखी वाचा
image

बुलंद बेलाग दुर्गत्रिकुटावर बाइकिंग

04 February, 2012 07:30:00 AM दहा वर्षापूर्वी ‘निगी’ने (निसर्गगिरीभ्रमण) हरिश्चंद्रगडावर पहिल्यांदा बाइकिंग केलं होतं. यंदा नववर्षाचं स्वागत करण्यासाठीही त्यांनी माउंटन बाइकिंगचाच धाडसी पर्याय निवडला. त्यासाठी ट्रेकर्सचीही दमछाक करणारं, त्यांचा कस लावणारं बुलंद-बेलाग दुर्गत्रिकुट अर्थात सह्याद्रीतील सर्वात अवघड अलंग-मदन-कुलंगगडाला पसंती दिली....
आणखी वाचा
image

‘प्रबळ’ इच्छाशक्ती!

31 December, 2011 05:30:00 AM बाहेर झेपावणा-या कडय़ाप्रमाणेच शरीरास बाक देऊन मनीषने लागोपाठ चार बोल्ट ठोकून ओव्हरहँगचं आव्हान पार पाडलं व तो वरच्या सरळसोट कडय़ास भिडला. लागोपाठ दोन बोल्ट ठोकून त्यांच्या आधारे त्याने सुरेख फ्री-मूव्ह केली व बॅलन्सिंग करत पुढील बोल्ट ठोकताना आपलं सर्वस्व पणाला लावलं. लागोपाठ फ्री-मूव्ह करताना त्याने दिवसाअखेरीस सुमारे दीडशे फूट कडा पादाक्रांत केला. त्यासाठी त्याने एकूण नऊ बोल्ट वापरले. मनीषच्या त्या दिवशीच्या अथक प्रयत्नांमुळे दोन दिवसांतच कडा सर होण्याची चिन्हं दिसू लागली.....
आणखी वाचा

कमळगड दिवस सार्थ करणारी कडी

31 December, 2011 05:30:00 AM पायथ्यापासून संपूर्ण गड दिसावा, असं कमळगडाच्या बाबतीत होत नाही. समोर दिसणारा डोंगर चढल्यावर मग कमळगड दिसतो, हे त्या समोरच्या डोंगरावर गेल्यावरच कळतं. ...
आणखी वाचा
image

माउंट युनमवर ‘सॅक’ची पताका

24 December, 2011 05:30:00 AM पहिल्या चार तासांतच ढिसाळ बर्फ, त्यावरील अस्थिर व मोठमोठाल्या खडकांमधील खडी चढाई संपवून मोहीम सदस्यांनी महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. शेवटच्या टप्प्यात बर्फवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक झालेल्या खडय़ा बर्फभिंतीवरील कौशल्यपूर्ण चढाई सुरू झाली असतानाच जोरदार वाऱ्याने आरोहकांना चांगलंच खिंडीत पकडून त्यांची परीक्षा पाहण्यास सुरुवात केली....
आणखी वाचा
image

निसर्गसंवर्धनाचा वसा

24 December, 2011 05:30:00 AM सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करत राहणं, हा गिर्यारोहकांचा स्वभावच. एखादी नवी कल्पना सुचते, ती यशस्वी होते आणि सातत्याने प्रत्यक्षात आणली जाते. मग ती एखाद्या संस्थेची कायमची ओळखच बनून राहते. म्हणूनच राजगड प्रदक्षिणा म्हटलं की नाव येतं ते ‘नेचर लव्हर्स’ या संस्थेचं....
आणखी वाचा
image

दुर्ग नव्हे, सुळका

29 October, 2011 05:30:00 AM मुंबईहून पनवेलकडे जाताना, जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर शोडुंग गाव आहे. या गावात शिरल्यावर ‘ठाकूरवाडी’त समोर ‘प्रबळगड’ आणि ‘कलावंतीण दुर्ग’ लक्ष वेधून घेतात. कलावंतीण दुर्गाला खरंतर ‘सुळका’च म्हणायला हवं, पाहताक्षणीच तो सर करण्याची प्रबळ इच्छा होते....
आणखी वाचा
image

सरसगड.. चोरवाटेने!

29 October, 2011 05:30:00 AM अष्टविनायकातील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर गणपतीचं पाली हे सरसगडाच्या पायथ्याचं गाव. 28 ऑगस्टला भल्या सकाळी भर पावसात इर्शाळगडाच्या दिशेने निघालेल्या आम्हा सहा जणांच्या नशिबी सरसगडाचा अनपेक्षित ट्रेक आणि तोही चोरवाटेने व्हावा, हा योगायोगच!...
आणखी वाचा
image

आणि कोकणकड्यावर नाव कोरलं!

08 October, 2011 04:30:00 AM तब्बल 19 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एकूण 170 एक्स्पांशन बोल्डच्या साहाय्याने ‘गिरीविराज’ची अमृत महोत्सवी मोहीम यशस्वी झाली. तंतोतंत नियोजन, अचूक निर्णय, संयम, जिद्द, चिकाटी आदींचं फलीत यशाच्या रुपानं सामोरं आलं होतं. कोकणकडय़ाच्या सर्वात अवघड, अभेद्य मार्गावर गिरीविराजचं नाव कायमचं कोरलं गेलं होतं. ...
आणखी वाचा
1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 242 | displaying: 1 - 10