PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: `मॅड'व्हेंचर जिद्दीचं बळ ================================================================================ अमिता बडे on 19 May, 2012 08:15:00 AM हृषीकेश यादव आणि सुरेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पहिल्या भारतीय नागरी मोहिमेने 18 मे 1998 रोजी एव्हरेस्ट सर केलं. या घटनेला 15 वर्ष पूर्ण झाली. येत्या दोन दिवसांत पुण्यातून गेलेल्या दुस-या भारतीय नागरी मोहिमेचे सदस्य एव्हरेस्टच्या समीटवर पोहोचणार आहेत. त्यानिमित्तानं पहिल्या मोहिमेचे नेते हृषीकेश यादव यांच्याशी साधलेला संवाद.. कात्रज ते सिंहगड ================================================================================ नचिकेत जोशी on 19 May, 2012 08:05:00 AM रस्ता चुकले नाही ते ट्रेकर्स कसले? काहीही झालं तरी दिशा योग्य असल्यास कुठे ना कुठे योग्य वाटेला लागूच या आत्मविश्वासाने पूर्ण केलेल्या कात्रज ते सिंहगड ट्रेकचा हा थरारक अनुभव. बळवंत गडावरचा उन्हाळी ट्रेक ================================================================================ दिवाकर साटम on 12 May, 2012 08:30:00 AM सह्याद्रीतील कडक उन्हाचे चटके सोसता सोसत नाहीत. त्यामुळे उन्हाळअयात सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत वसलेल्या किल्ल्यांवर ट्रेक करताना पंचाईत होते. पण याला अपवाद आहे कसा-यातल्या विही गावातील बळवंत गड. इतिहासाची साक्ष देणारा हा छोटासा किल्ला ऐतिहासिक दस्तावेजामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. योगी हिल्स ते तुलसी लेक ================================================================================ आरती आठवले on 12 May, 2012 07:55:00 AM वळणं घेत जाणारी पायवाट, अधूनमधून वाटेत जाणारी मस्त सावली, आजूबाजूला निरनिराळी झाडं, कोवळी पानं असलेला पिंपळ, रानपेरू, करवंदांच्या जाळय़ा, आक्शीचा मोहोर ओसरून वाळलेल्या फुलांचा सडा.. यांसारखी बरीच विलोभनीय दृश्यं योगी हिल्स ते तुलसी लेक या ट्रेकदरम्यान पाहायला मिळतात. त्यामुळेच हा ट्रेक ट्रेकर्सचा आवडता कट्टा आहे. स्काय डायव्हिंगचं स्वर्गीय सुख ================================================================================ संदीप पाचुपते on 12 May, 2012 07:30:00 AM अतिशय रोमांचक पण कधीकधी जिवावर बेतणारा खेळ ही स्काय डायव्हिंग या साहसी खेळाची ओळख आहे. उत्तम प्रशिक्षणाच्या जोडीला तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तर या खेळाचा निखळ आनंद लुटता येतो. तोरणा गडाची चढाई ================================================================================ संदीप पाचुपते on 05 May, 2012 07:55:00 AM ‘तोरणागड म्हणजे गरुडाचं घर’ हे विधान केलंय सर जेम्स डग्लस यांनी. सर डग्लस तेव्हाच्या कंपनी सरकारच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. डग्लस यांच्या या विधानाची प्रचिती पिनॅकल ग्रुपला तोरणागडाच्या चढाईदरम्यान आली. छोटी गिर्यारोहक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 05 May, 2012 07:50:00 AM शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यावर मुलं गावाल जातात. नाही तर छंदवर्गामध्ये पालक त्यांना दाखल करतात. पण अशीही काही मुलं आहेत की, जी गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीत अगदी सहजतेनं रमत आहेत. मधुरा गावडेही याला अपवाद नाही. आडरात्री नाळेच्या वाटेनं विसापूर ================================================================================ नचिकेत जोशी on 05 May, 2012 07:40:00 AM सहसा विसापूरचा ट्रेक करण्याचं धाडस कुणी करत नाही. याला कारण आहे त्या ठिकाणी बसणारे चकवे. जर अट्टल भटक्यांची सोबत असेल तर नाळेच्या वाटेने हा ट्रेक सहज करता येईल. घनदाट जंगलातील गंभीरगड ================================================================================ सुनील होरंबे on 05 May, 2012 07:05:00 AM सह्याद्रीच्या डोंगररांगेतली विविध रूपं थक्क करणारी आहेत. कितीही पाहिली तरी प्रत्येक वेळी त्याचं नावीन्यच वाटत राहतं. याच सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसला आहे गंभीरगड. घनदाट जंगलातलं गंभीरगडाचं पागोट्यासारखं रूप कायमच गिरीप्रेमींना खुणावत असतं. एव्हरेस्टच्या बेसकँपवर शिवराय ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 28 April, 2012 08:15:00 AM पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेनं एव्हरेस्टच्या बेस कँपकडे जाताना वाटेत लागणा-या गोरक्षेप गावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. इतक्या उंचीवर बसवण्यात आलेला शिवाजी महाराजांचा हा पहिलाच पुतळा आहे. त्याकामी संस्थेला गावातल्या शेर्पाची खूप मदत झाली.