समुचित गौरव

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पारंपरिक बायोगॅस सयंत्राना लागणा-या ४० किलो शेणाऐवजी या प्रणालीला फक्त एक किलो जैव-खाद्य लागतं आणि त्यातूनच ५०० ग्रॅम गॅस तयार होतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजवाडय़ात हे सयंत्र बसवण्यासाठी इंग्लडचे इंग्लडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना आमंत्रित केलं होतं. महाराष्ट्रातच आजवर अशी ७०० सयंत्रं उभारण्यात आली असून, ग्रामीण भागाबरोबरच शहरी श्रमातही ती उपयुक्त ठरत आहेत.

ग्रीन ऑस्करसमजला जाणारा ब्रिटनमधील अ‍ॅश्डेन पुरस्कारदरवर्षी  चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणा-या जगभरातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो. पुण्यातील अ‍ॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टीटय़ूट’ (आरती)च्या क्रांतिकारी बायोगॅस सयंत्राला २००६चा अ‍ॅश्डेन पुरस्कारमिळाला होता. त्याआधी याच संस्थेने शेतातील टाकाऊ कच-यापासून कांडीकोळसा बनवण्याची प्रणाली निर्माण केल्याबद्दल २००२मध्ये हाच पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला होता. या संस्थेचे प्रवर्तक आहेत, डॉ. आनंद कर्वे. त्यांनी आपल्या सहका-यांसमवेत स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचा कचरा, उष्टी-खरकटी व खराब झालेलं अन्न वापरून बायोगॅस तयार करण्याचं क्रांतिकारी सयंत्र शोधलं आहे. पारंपरिक बायोगॅस सयंत्राना लागणा-या ४० किलो शेणाऐवजी या प्रणालीला फक्त एक किलो जैव-खाद्य लागतं आणि त्यातूनच ५०० ग्रॅम गॅस तयार होतो. त्यामुळे ब्रिटनच्या राजवाडय़ात हे सयंत्र बसवण्यासाठी इंग्लडचे इंग्लडचे प्रिन्स चार्ल्स यांनी डॉ. कर्वे यांना आमंत्रित केलं होतं. महाराष्ट्रातच आजवर अशी ७०० सयंत्रं उभारण्यात आली असून, ग्रामीण भागाबरोबरच शहरी श्रमातही ती उपयुक्त ठरत आहेत.

 पुण्यातील प्रसिद्ध कर्वे घराण्यात जन्मलेल्या या संशोधकाचं कार्य काळानुरूप असल्यानेच ते समुचित संशोधन ठरलं आहे. महात्मा गांधी यांची स्वयंपूर्ण खेडय़ांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं सामर्थ्य असलेला हा बहुआयामी संशोधक आयुष्यभर रचनात्मक कार्य करत आला आहे. त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते कोप-यावरच्या दूधवाल्याशी ते इंग्लडच्या प्रिन्स चार्ल्सपर्यंत सर्वाशी एकाच पद्धतीने वागतात. त्यांच्या संशोधनातून गावोगावात कमी खर्चाच्या टिश्यू-कल्चर प्रयोगशाळाउभारल्या गेल्या व त्याद्वारे उत्कृष्ट दर्जाच्या रोपवाटिका उभ्या राहिल्या. शेतक-यांनी रोपवाटिका तयार करून ती रोपं इतरांना विकली तर त्यांना शेतीतून मिळणा-या फायद्यापेक्षा अधिक नफा मिळू शकतो आणि रोपवाटिकेला लागणारी जागा आणि मेहनत शेतीच्या तुलनेत किरकोळ असते. तसंच शेतकरी बांबूची स्वस्त हरितगृह उभारून, त्याद्वारे फुलांची व भाजीपाल्याची शेती करतात. बांबूवर रासायनिक प्रक्रिया करून, त्यापासून हरितगृह, भाज्यांचे मांडव, पाण्याच्या टाक्या, फर्निचर, हातगाडय़ा, ट्रेलर इ. उपयुक्त तयार करून पंचक्रोशीत विक्री करतात. बांबूपासून पाण्याची टाकी तयार करून त्यात पावसाचं पाणी साठवतात व त्यामुळे, खेडय़ातील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण वाचू शकतो. डॉ. कर्वे गावागावांत बचतगट स्थापन करून, ऑस्ट्रेलियन अकोशिया या वनस्पतीची लागवड करण्यास प्रोत्साहन देतात, कारण या झाडांच्या शेंगापासून उत्कृष्ट दर्जाचा साबण तयार करता येतो. त्यांची कांडीकच-यापासून कांडीकोळसा तयार करण्याची किमया खेडोपाडय़ात व्यवसायाचं रूप घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा पर्यावरण पुरक कोळसा लघुउद्योगात इंधन म्हणून वापरता येतो.

अ‍ॅप्रोपिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट’ (आरती) या अग्रगण्य संशोधन केंद्राची स्थापना १९९६मध्ये झाली. डॉ. कर्वे यांनी या केंद्राद्वारे विविध उपयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेतले. त्यांचा फायदा आज महाराष्ट्रातीलच नव्हे; देशभरच्या खेडोपाडय़ातील लघुउद्योजकांना होत आहे. आज ७० टक्के भारत खेडय़ात वास्तव्य करतोय व कृषी उत्पन्नावर त्यांच्या पोटय़ापाण्याची सोय होत असते. पुरेसे शिक्षण व योग्य साधनसामग्री यांच्या अभावामुळे, देशाच्या कानाकोप-यात दडलेली क्रयशक्ती दडपून जाते. अशा वेळी, लोकांना प्रशिक्षण देऊन चांगलं जीवन जगण्यासाठी संधी आणि साधनं पुरवली तर त्याचा जीवनदर्जा कमालीचा उंचावू शकतो. आरतीहे केंद्र याच ध्येयाने प्रेरित होऊन देशभरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प राबवत आहे. त्यांचं कार्य महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून ते गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्किम, त्रिपुरा आणि केरळ या राज्यातच नव्हे; तर; आशिया व आफ्रिका खंडातील काही राज्यात लोकप्रिय होत आहे.

डॉ. आनंद कर्वे यांनी शोधलेल्या बायोगॅस प्रणालीनुसार केवळ २ किलो स्टार्च किंवा शर्करायुक्त कचऱ्यापासून २४ तासांत ५०० ग्रॅम मिथेन वायू तयार होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीने इतका गॅस निर्माण करण्यासाठी ४० किलो शेणावर ४० दिवस प्रक्रिया करावी लागते. शिवाय, ४० किलो शेणासाठी ६ ते ८ गुरं बाळगायला लागतात. त्यासाठी आकाराने खूप मोठं सयंत्र लागते, ते वेगळंच. यावरून ही नवी पद्धत किफायतशीर व जलद गतीची आहे, याची कल्पना येऊ शकते.

महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर हा पट्टा उसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऊसाचं पीक घेतल्यावर दरवर्षी साधारणत: ४५ लाख टन कचरा पाचटाच्या (वाळलेल्या पात्याच्या) रूपाने मागे उरतो व तो शेतातच जळला जातो. वर्षानुवर्षे ही पद्धत तिथे चालू आहे. आरतीने या पानापाचोळ्याच्या कच-यापासून तसंच शेतीतील अन्य पिकांच्या टाकाऊ भागापासून कांडी कोळसा निर्माण करण्याची वैज्ञानिक शक्कल शोधून काढली. आता हा कांडी कोळसा गावोगावी सराईनावाच्या निर्धूर शेगडीत जाळण्यासाठी वापरला जातो. त्यातून लाकडाची बचत होते. तसंच घरात चुलीमुळे होणारं वायुप्रदूषणही टळतं.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0