पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | मटार.. नव्हे विजेचे दाणे!

मटार.. नव्हे विजेचे दाणे!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

सौरऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न सध्या जगभर सुरू आहेत. खनिज तेलांचे साठे उत्तरोत्तर कमी होऊ लागल्यामुळे पर्यायी ऊर्जा आवश्यक झाली आहे. यामुळे आपण ऊर्जेचेच वेगवेगळे स्रेत शोधत आहोत. असे स्रेत निसर्गात शोधताना अनेक झाडांमध्ये ही ऊर्जा लपलेली असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. याला मटाराचा वेलही अपवाद नाही..

मटाराची शेंग तुम्ही नक्कीच पाहिली असेल. वेलीवरून शेंगा काढल्यानंतर त्या सोलायच्या, त्यातले हिरवेगार दाणे वेचायचे आणि त्याची उसळ करायची हेदेखील आपल्या सर्वाना माहीत आहे. मटार वाळवून होतात ते वाटाणे. वाटाण्यांमधून उष्मांक भरपूर असतात. याचा उपयोग कडधान्य म्हणून आपण सारेच करतो. आता याच उष्मांकाचा मागोवा शास्त्रज्ञ घेत आहेत. मटारमध्ये उष्मांक अधिक आहेत, याचाच अर्थ त्यात ऊर्जा साठवण्याचं एखादं केंद्र किंवा तशी यंत्रणा असणार या साध्या तर्काने तेल अविव विद्यापीठाच्या जैवरसायन विभागातले रचना जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक नाथन नेल्सन मटाराचं अंतरंग तपासत गेले. त्यांना एक आश्चर्यकारक शोध लागला, जो आज इस्रयलमध्येच नव्हे; तर जगात सर्वत्र आकर्षणाचं केंद्र झाला आहे.

 

हा शोध आहे मटारात लपलेल्या विजेचा! मटाराची शेंग सोलायला घेतलीत तर तुम्हाला दाण्यांबरोबरच शेंगेच्या आतल्या बाजूस एक पातळ पापुद्रा दिसतो. हा पापुद्रा वेगळा काढता येतो. पापुद्रा वेगळा काढल्यास त्याचा स्पर्श प्लास्टिकसारखा किंवा मेणकागदासारखा लागतो. हा पापुद्रा वेगळा काढून वरच्या टरफलाची भाजी करण्याची काही ठिकाणी चाल आहे. पापुद्रा आणि त्यामागची टरफलाची बाजू हीच वीज साठवून ठेवण्याची मटाराची जाग आहे, असे नाथन नेल्सन यांना आढळलं. टरफलाच्या या आंतरत्वचेत, पापुद्रय़ात असलेल्या प्रथिनांमध्ये ऊर्जाकण असतात.

 

नेल्सन यांनी हे ऊर्जाकण वेगळे काढायला सुरुवात केली, त्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, मटाराची वेल हे ऊर्जाकण फोटोसिस्टिम-१ (पीएसआय)या यंत्रणेच्या माध्यमातून साठवून ठेवते. हे

ऊर्जाकण नेल्सन यांनी वेगळे केले, त्यांचं स्फटिकीकरण केलं. स्फटिकीकरणानंतर त्यांना असं आढळलं की, मटाराच्या या ऊर्जाकणांपासून वीज तयार करता येईल. हे कण सोन्याचा मुलामा दिलेल्या एका धातुप्रतलावर ठेवल्यावर त्या कणांपासून 10 वॉटपर्यंत विजनिर्मिती करण्यात नेल्सन यांना यश आलं.

 

याखेरीज हे ऊर्जाकण मटारापासून वेगळे काढल्यानंतर प्रकाशित केल्यास त्यांना पुरवलेल्या उसना प्रकाश हे कण स्वत:त मुरवतात आणि स्वत: प्रकाशित होतात. असे विद्युतभारित कण चार्जरम्हणूनही वापरतात येतील,  असा दावा नेल्सन यांनी केला आहे. मटाराची पानं, वेल, शेंगा यांतून हे ऊर्जाकण वेगळे काढतानाच मटारचे दाणे विद्युतभारित आहेत का याचा शोध आता शास्त्रज्ञ घेत आहेत. हे दाणे विद्युत भारित आहेत आणि त्यांच्यात ही ऊर्जा दुस-या माध्यमाला द्यायची क्षमता आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्यास मटाराच्या दाण्यांपासूनही वीजनिर्मिती करता येईल. असं झालं तर ही वीजनिर्मिती स्वस्तातही होईल.

 यावरून आपल्या एक लक्षात येईल की, निसर्गातल्या घटक पदार्थापासून आपल्याला शक्ती मिळते. याला आधार आहे त्यात साठवलेल्या ऊर्जेचा. ही ऊर्जा निसर्गातल्या प्रत्येक घटकात असते म्हणूनच आपल्याला हे घटक खाल्ल्यानंतर ऊर्जा मिळते, चेतना मिळते. म्हणजेच केवळ प्रथिनं, जीवनसत्त्वं, उष्मांक, कबरेदकं देण्याबरोबरच हे अन्नपदार्थ आपल्याला चैतन्यही देतात, हेच मटाराच्या या शोधावरून स्पष्ट होतं.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0