पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | सिंधू संस्कृतीचा मूक साक्षीदार

सिंधू संस्कृतीचा मूक साक्षीदार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

कच्छच्या रणातील बगसार या छोट्या गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर 1996मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या संशोधकांनी उत्खनन सुरू केलं होतं. कुणाला असं वाटलंही नव्हतं की इथे काही सापडेल. पण काही दिवसांपूर्वीच या चमूच्या हाती सिंधू संस्कृतीचा इतिहास सांगणारा एक खजिनाच सापडला.

कच्छच्या रणातील बगसार या छोट्या गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर 1996मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या संशोधकांनी उत्खनन सुरू केलं होतं. कुलदीप भान, व्ही. एच. सोनावणे, पी. अजितप्रसाद आणि एस. प्रतापचंद्रन या चौघांच्या नेतृत्वाखाली काम सुरू झालं तेव्हा खरं तर कुणाला असं वाटलंही नव्हतं की इथे काही सापडेल. पण काही दिवसांपूर्वीच या चमूच्या हाती सिंधू संस्कृतीचा इतिहास सांगणारा एक खजिनाच सापडला. एक अख्खं गाव, शंखशिंपल्यांपासून बांगड्या बनवण्याचे कारखाने अशा अनेक गोष्टी त्यांना इथे मिळाल्या. सिंधू संस्कृतीच्या काळातील काही मुद्राही सापडल्या. अर्थातच, हा इतिहास जगासमोर आणू शकणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे या संस्कृतीची लिपी. ती उलगडण्यात संशोधकांना अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे सापडलेल्या वस्तू आणि त्यांचं त्या काळाशी असलेलं साधम्र्य हे महत्त्वाचे पुरावे ठरतात. गोला ढोरो हादेखील सिंधू संस्कृतीचा एक मूक साक्षीदारच म्हणता येईल.

 

सुमारे 1.52 हेक्टर परिसरात हे गाव वसलं होतं, असं संशोधकांचं मत आहे. या गावाच्या उत्तरेला तीन टप्प्यांत तटबंदी बांधण्यात आली होती आणि त्या तटबंदीच्या आत घरं बांधण्यात आली होती. परंतु अशी तटबंदी दक्षिणेला दिसून आली नाही. या ठिकाणी केवळ गाव नव्हतं तर ते त्या काळातील व्यवसायाचं एक प्रमुख केंद्र होतं, असं दिसून आलं आहे. शंख, मौल्यवान दगड, सिरॅमिक, विविध प्रकारचे सूर्यमणी यांच्यापासून दागिने बनवणारं हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. तसंच इथे या सर्व कच्च्या मालाचे ढिगारेही सापडले आहेत. त्यावरून हा कच्चा माल हडप्पा संस्कृतीतील विविध ठिकाणांना पुरवणारं हे एक केंद्र असल्याचं स्पष्ट होतं. जगातील सर्वात दुर्मीळ आणि मौल्यवान शंख मानल्या गेलेल्या टर्बिनेला पायरमया प्रकारचे शंखांचे ढिगारेच इथे सापडले आहेत. या शंखांपासून दागिने बनवण्याचे कारखाने इथे होते, असं मानलं जात आहे. कारखाने इथे असले तरी येथील लोक स्वत: शंख बनवत नव्हते तर ते इथे आणले जात होते, असं स्पष्ट झालं आहे. तसंच इथे शंखांपासून दागिने बनवण्यासाठी लागणारं साहित्यही सापडलं आहे. जडावाचं काम करण्यासाठी आवश्यक असलेले फॅसिओलॅरिया ट्रॅपेझियम’ (समुद्री घोडे) हे एरवी ओमानमधून आयात केले जाणारे विशिष्ट जातीचे प्राणीही इथून पुरवले जात होते, असं दिसलं आहे.

 

सिरॅमिकपासून दागिने बनवण्याचं साहित्य, कच्चा माल, तयार केलेले काही मणी, बांगडय़ा असंही साहित्य संशोधकांना इथे सापडलं आहे. लाल, हिरव्या, पांढ-या रंगांचे मौल्यवान सूर्यमणी, इतर मौल्यवान दगड यांच्यापासून बनवलेले काही दागिने तसंच विविध टप्प्यांमधलं काही साहित्यही या भागात सापडलं आहे. लोखंडाचं पातं असलेले आणि माशांचे काटे, प्राण्यांची हाडं यांपासून बनवलेली मूठ असलेले अनेक चाकूही इथे सापडले आहेत. तसंच फेरवापरासाठी ठेवण्यात आलेल्या लोखंडाचेही तुकडे येथे सापडले आहेत. या छोट्याशा गावात सिंधू संस्कृतीच्या मुद्रा सापडणं अपेक्षित नव्हतं. पण युनिकॉर्नचं (एक शिंग असलेला घोड्यासारखा प्राणी) चित्र असलेल्या पाच वेगवेगळ्या मुद्रा इथे सापडल्या, असं हे संशोधक सांगतात. तसंच इतर कोणत्याही ठिकाणी न सापडलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या मुद्राही इथे सापडल्या आहेत. उत्खननाच्या या टप्प्यात दक्षिणेकडील किल्ल्याचा दरवाजा संशोधकांना सापडलाय. पण या तटबंदीबाबत मात्र अजूनही संशोधकांना आश्चर्य वाटत राहिलेलं आहे.

 

इसवी सनपूर्व 1700 पर्यंत दोनशे वर्षाच्या कालावधीतील सिंधू संस्कृतीतील शहरांचा इतिहास गोला ढोरोमुळे उलगडेल असं दिसतं. या काळातील व्यवहार, कारभार अशा सर्व गोष्टी पुढच्या टप्प्यात जगासमोर येतील, असा विश्वास संशोधकांना वाटतोय.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0