पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | डायनॉसॉर : उष्ण की थंड रक्ताचे?

डायनॉसॉर : उष्ण की थंड रक्ताचे?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

उत्खननात सापडलेल्या डायनॉसॉरच्या अनेक जीवाश्मांच्या अभ्यासाअंती काही शास्त्रज्ञांचं असं मत बनलं आहे की, डायनॉसॉर हे उष्ण रक्ताचे होते. त्यांच्या मताप्रमाणे आकाराने अवाढव्य व अजस्त्र प्राणी हे कधीही थंड रक्ताचे असू शकत नाहीत. शास्त्रज्ञांचं असंही म्हणणं आहे की, जर डायनॉसॉर उष्ण रक्ताचे नसते तर त्यांनी कधीच जमिनीवर स्थलांतर केलं नसतं.

दोन आठवड्यांपूर्वी अनेक वर्तमानपत्रांतून डायनॉसॉरसंबंधीची बातमी छापून आली होती. काही शास्त्रज्ञांना या महाकाय प्राण्याचे अवशेष मिळाले होते. त्यामुळे आता त्यांना डायनॉसॉरबाबत नवीन आडाखे बांधावे लागत आहेत. या प्राण्याचे अस्तित्व चोवीस ते साडेसहा कोटी वर्षाच्या कालखंडामधले होते व या संपूर्ण कालखंडात त्यांची सा-या सृष्टीवर हुकूमत होती. ते जणू या पृथ्वीतलावरचे अनभिषिक्त राजेच होते. त्यांच्याइतका शक्तिशाली असा दुसरा कोणताच प्राणी या ग्रहावर त्या काळी अस्तित्वात नव्हता. आकाराने अवाढव्य व अजस्त्र असल्या कारणाने हा प्राणी अतिशय लक्ष्यवेधी ठरतो. या प्राण्याच्या काही जाती इतक्या मोठ्या होत्या की, त्यांची उंची 12 मीटर व लांबी 20 मीटर असायची. काही डायनॉसॉरची मानच कधी कधी 8 मीटरपेशाही अधिक लांब असायची. सध्या या भूतलावर वावरणा-या प्राण्यांपैकी फक्त जिराफाचीच मान लांब वाढते; पण तीही कधी 1.8 मीटरपेक्षा अधिक वाढत नाही.

 

अर्थात, सर्वच डायनॉसॉर उंच व धिप्पाड नव्हते. काही छोटे अगदी मोराच्या आकाराएवढेही होते. शास्त्रज्ञांनी डायनॉसॉरचे साडेतीनशेपेक्षाही जास्त प्रकार शोधून काढलेले आहेत व त्यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून दोन मोठ्या समूहात त्यांना वर्गीकृत करण्यात आलेले आहे. पहिला सॉरिस्चियनव दुसरा ऑर्निथिस्पियनया नावाने ओळखला जातो. पहिल्या वर्गातील डायनॉसॉर शाकाहारी व मांसाहारी होते व त्यांच्या कमरेचा आकार आजच्या पालींच्या कमरेच्या आकारासारखा होता. ते अंगाने जाड व धिप्पाड होते. अगदी आपल्या मनात घर करून राहिलेल्या डायनॉसॉरसारखे महाकाय, अवाढव्य, चार पायांचे, लांब मानेचे व पालापाचोळा खाणारे. दुस-या वर्गात मोडणा-या डायनॉसॉरचा कमरेचा भाग पक्ष्यांसारखा होता व ते पूर्णत: शाकाहारी होते. या वर्गातील काही डायनॉसॉर फक्त दोन पायांचेच होते.

 डायनॉसॉरचे वास्तव्य त्यांचा उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात दलदलीच्या ठिकाणी होते. कालांतराने त्यांनी कोरड्या जमिनीवर स्थलांतर केले. या प्राण्याचे वास्तव्य जसे ध्रुवाजवळच्या कडाक्याच्या थंडीत होते, तसे उष्ण कटिबंधातल्या समुद्रकिनारीही होते. भारतात त्यांचे वास्तव्य गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व इतरही अनेक ठिकाणी होते. शाकाहारी डायनॉसॉरचे प्रमुख खाद्य कोनिफर फर्न, सायकॅड व गिंक्गोची ही झाडे होते. मांसाहारी डायनॉसॉर कीटक, जल-थलवासी प्राणी, सरपटणारे लहान प्राणी व आदिमानवावर यथेच्छ ताव मारत असत; पण क्वचित एखाद्या वेळी स्वत:च्याच पिल्लांना खाऊन आपल्या पोटातील आग शमवत असत.

डायनॉसॉर उष्ण रक्ताचे होते की थंड, हा प्रश्न शास्त्रज्ञांना एक कोडे बनून राहिलेला आहे. पालींचे उदाहरण समोर ठेवून काही जाणकारांना वाटते की डायनॉसॉरही पालींप्रमाणे थंड रक्ताचे असावेत. आपल्या घरात वावरणा-या पालींचे वंशज डायनॉसॉर आहेत, हे विसरून चालणार नाही. थंड रक्ताच्या प्राण्यांना फार काळ आपल्या स्वत:च्या मर्जी व गरजेप्रमाणे कार्यरत राहता येत नाही. कारण त्यांना स्वत:च्या शारीरिक क्रिया पार पाडण्यासाठी स्वत:च्या शरीरातून ऊर्जा उत्पन्न करण्याची अंगभूत क्षमता नसते. त्यांना त्यासाठी सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून राहावे लागते. उष्ण रक्ताच्या प्राण्यांबाबत मात्र परिस्थिती अगदी भिन्न असते. या प्राण्यांना स्वत:साठी लागणारी ऊर्जा स्वत:च शरीरात उत्पन्न करण्याची कला अवगत असते. ऊर्जानिर्मितीसाठी या प्राण्यांना सूर्यासारख्या कोणत्याही बह्य घटकांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते.

 

उत्खननात सापडलेल्या डायनॉसॉरच्या अनेक जीवाश्मांच्या अभ्यासाअंती काही शास्त्रज्ञांचे असे मत बनले आहे की, डायनॉसॉर हे उष्ण रक्ताचे होते. त्यांच्या मताप्रमाणे आकाराने अवाढव्य व अजस्त्र प्राणी हे कधीही थंड रक्ताचे असू शकत नाहीत. आज अस्तित्वात असणा-या थंड रक्ताच्या प्राण्यांच्या मानाने त्या वेळच्या डायनॉसॉरचा आकार खूप मोठा होता. जाणकारांच्या मते, सजीवांच्या आकारवाढीचा संबंध रक्ताच्या तापमानाशी असतो. त्याचबरोबर त्यांचे असेही म्हणणे आहे की, जर डायनॉसॉर उष्ण रक्ताचे नसते तर त्यांनी कधीच जमिनीवर स्थलांतर केले नसते. कारण जमिनीवर वास्तव्य करणा-या प्राण्यांना प्रचंड प्रमाणात ऊर्जेची गरज असते. स्वत:चे अस्तित्व शत्रूपासून अबाधित राखण्यासाठी फार मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा खर्च करावी लागते. शिकार साधण्यासाठीसुद्धा ऊर्जेची निरंतर गरज असते. या कारणास्तव डायनॉसॉर उष्ण रक्ताचे होते, असा काही शास्त्रज्ञांचा कयास आहे. आपले अवाढव्य शरीर पाठीमागील फक्त दोन पायांवर, सांभाळत, झाडांच्या शेंड्याला असणारा पालापाचोळा खाण्यासाठी डायनॉसॉरना फार मेहनत करावी लागत होती. त्यासाठी लागणारी ऊर्जा सूर्यापासून मिळविण्याऐवजी स्वत:च ऊर्जानिर्मितीचे कसब त्यांनी आत्मसात केले असावे. पण जोपर्यंत नि:संदिग्ध पुरावा मिळत नाही, तोपर्यंत कोणतेही ठाम भाष्य करणे शक्य होणार नाही.

 

डायनॉसॉरचा सुर्वणकाळ छत्तीस ते पंधरा कोटी वर्षादरम्यानच्या कालखंडात होता. त्या वेळी या पृथ्वीतलावर फक्त या प्राण्याचंच अधिराज्य होते. या कालखंडातील पर्यावरण त्या वेळच्या सजीवांच्या वाढीसाठी अतिशय पोषक होते. सजीवांच्या अनेक घटकांनी त्या काळी आपला उत्कर्षबिंदू गाठला होता. पण निसर्गाला त्या वेळची खुशाली पाहवली नाही. निसर्गाने कधीही, केव्हाही, कुठेही व कोणत्याही एका विवक्षित सजीवाला अमरत्व बहाल केलेले नाही. निसर्गाने डोईजड होणा-या प्रत्येक सजीवाला कायमचेच नेस्तनाबूत करून टाकलेले आहे. साडेसहा कोटी वर्षादरम्यान डायनॉसॉरचा वंशभेद पूर्णाशाने सुरू झाला होता.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0