पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | ‘बायोमिमिक्री’चे नवनवे साक्षात्कार!

‘बायोमिमिक्री’चे नवनवे साक्षात्कार!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जीवशास्त्राविषयक आलेलं ज्ञान दर पाच वर्षानी दुप्पट होत असताना, आपण कृत्रिमरीत्या जगात आपल्या समस्या वाढवत आहोत.

निसर्गापासून काही तरी नवनवीन शिकत जाणं ही माणसाची परंपराच आहे. प्रत्येक बाबतीत निसर्ग आपल्याला मार्ग दाखवत असतो. सूर्यापासून शक्ती घेणारी पाने, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे विणले जाणारे तंतुमय भक्कम पोलाद, जमिनीतून आलेली अजिबात तडा न जाणारी माती, कर्करोगाला रोखणारी चिंपाझीमधील यंत्रणा, सतत अन्न देणारी वनस्पती ही काही ठळक उदाहरणं होत. जीवशास्त्राविषयक आलेलं ज्ञान दर पाच वर्षानी दुप्पट होत असताना, आपण कृत्रिमरीत्या जगात आपल्या समस्या वाढवत आहोत.

 

बुरशी तयार करणा-या कीटकांच्या वारुळापासून मिळणारे ज्ञान आपण भुयारी घरे बांधण्यासाठी, अळंबीच्या शेतीसाठी किंवा समान तापमान राखण्यासाठी वापरू शकतो. डोक्याच्या साहाय्याने लाकूड, झाडांवर वर्तुळकार विवरे तयार करणाच्या शिंपल्यापासून आपण बोगदे तयार करण्यासाठी किंवा वस्तूंचं पॅकेजिंग कसं करायचं, हे जाणून घेऊ शकतो. भरधाव धावणा-या घोड्याच्या पायातील खुरांमध्ये असलेल्या पोकळीमुळे तो पायांवर पडणारा ताण सहन करू शकतो. या जीवतंत्राचा वापर विमानं, जहाजं, मोटारींचं उत्पादन करताना होऊ शकतो. बायोमिमिक्री (निसर्ग-नक्कल) शास्त्राची आज घोडदौड चालू आहे. विविध क्षेत्रांत निसर्गातले तंत्रज्ञान उपयोगात आणलं जाऊ लागलं आहे.

 

शरीरावर कुठे जखम झाली की, बाहेर स्र्वणा-या रक्ताची गाठ तयार होते व रक्तस्रव थांबते. रक्तात असलेल्या खोलगट बशांच्या आकाराच्या प्लेटलेट्स ही गाठ तयार करण्यास मदत करतात. फायब्रोनोजिनया रक्तात विद्राव्य स्वरूपात वावरणा-या जीव रासायनिक द्रव्याचं फायब्रिननामक धाग्यांत रूपांतर होतं व हे धागे जखमेवर चपखल जाळे करून त्यात रक्तपेशींना अडकवून ठेवतात. त्यामुळे जाडसर अशा रक्ताची गाठ जखम बुजवते आणि पुढचा रक्तप्रवाह थांबतो. नेमकी हीच खुबी तेलक्षेत्रात आता वापरात येत आहे. तेलविहिरीतून खनिजतेलाचं उत्खनन करताना, तेलविहिरीच्या यंत्रणेला तडा जातो व तेलाची नाहक गळती होते. भरमसाट नुकसान होतं. त्यामुळे एखादी तेलविहिर निकामीदेखील होऊ शकते. पण आता तेलक्षेत्रातले तंत्रज्ञ घनाकार किंवा गोलाकार अशा प्लास्टिकच्या गोळ्या किंवा सूक्ष्म कणांचा वापर करून एखादा पाइपाला पडलेला तडा बुजवत आहेत. प्लास्टिकचे हे सूक्ष्म गोळे तेलासोबत पाइपातून वाहत असतात किंवा योग्य त्या आवश्यक ठिकाणी सूक्ष्म कणांचे इंजेक्शन देऊन, तडा गेलेल्या भागात ते घुसतात व तो भाग बुजवून टाकतात. या सूक्ष्म कृत्रिम प्लॅटलेट्सचा आकार पाइपाला पडलेल्या छिद्राच्या आकारावर असतो. तसंच जेल पदार्थासोबत इंजेक्शन दिले जाणारे सूक्ष्म कण हे प्रामुख्याने एखाद्या उत्खनन यंत्रणेतील सील फाटलं असेल तर वापरले जातात. अर्थात, हे उपाय तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. हेही लक्षात घ्यावं लागतं. म्हणजेच जखमेवर गोठलेलं रक्त जंतुनाशक कापासाच्या बोळ्याने खरवडून त्यावर नंतर मलमपट्टी केली जाते, तसाच हा एकूण प्रकार असतो.

 

गळती थांबवण्याचे हे तांत्रिक उपाय खूपच स्वस्त आहेत आणि ते तेलविहिरीतील 135 डिग्री सेल्सियस इतक्या उच्च तापमानालादेखील वापरता येतील, असा संशोधकांचा दावा आहे. या उपायामुळे तेलाची गळती होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात थांबल्याचे त्यांना प्रत्यक्षात आढळलं आहे.

 

अलीकडेच, इंग्लंडमध्ये एका तेलविहिरीतील सील खराब होऊन मोठय़ा प्रमाणात तेलगळती झाली. केवळ सहा महिन्याच्या अवधीत हे सील तुटल्याचं आढळले होते. गळती वाढून, पुढचं नुकसान टळावं, म्हणून त्या तेलविहिरीतील उत्पादन तात्पुरतं बंद करण्यात आलं. तेलविहिरीच्या आत उतरून दुरुस्ती करणं खूपच खर्चिक होणार होती; परंतु जेलपदार्थाच्या माध्यमातून तिथे सूक्ष्म कणांना पाठवलं गेलं व एक शंताश इतक्या कमी खर्चात गळती थांबवण्यात आली. पुन्हा ती तेलविहीर पूर्वीइतकी तेलउत्पादन करू लागली.

 

निसर्गावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा, त्याच्यापासून शिकणं अधिक हितकारक आहे, हे आपण लक्षात कधी घेणार?

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0