पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | आता जगा ‘निरोगी दीर्घायुष्य’

आता जगा ‘निरोगी दीर्घायुष्य’

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

शरीराच्या सर्व व्याधी-विकारांवर उपाय घेऊन येणारं जनुकशास्त्र ‘निरोगी दीर्घायुष्य’ देण्यास समर्थ ठरेल, अशी आशादायक चित्रं दिसू लागली आहेत. याचं कारण म्हणजे ‘बर्मिगहॅम यनिव्हर्सिटी’तील एका अभ्यासाअंती हाती आलेले निष्कर्ष.

आपल्या वडीलधा-याकडून आपल्याला आयुष्यमान भवं।हा आशीर्वाद नेहमीच मिळत असतो. पण या दीर्घायुष्याबरोबर हे आयुष्य निरोगी असणंही महत्त्वाचं आहे. यासाठी आपण नेहमी प्रयत्नशीलही असतो. पण योगा, समतोल आहार-विहार यांच्या माध्यमातून आपलं आयुष्य जास्तीत जास्त निरोगी असेल याची खात्री मात्र आपल्याला देता येत नाही. पण आता जवळजवळ शरीराच्या सर्व व्याधी-विकारांवर उपाय घेऊन येणारं जनुकशास्त्र निरोगी दीर्घायुष्यदेण्यास समर्थ ठरेल, अशी आशादायक चित्रं दिसू लागली आहेत. याचं कारण म्हणजे बर्मिगहॅम यनिव्हर्सिटीतील एका अभ्यासाअंती हाती आलेले निष्कर्ष.

 

वय वाढण्याचा आणि शरीरातील जनुकांचा परस्पर संबंध पडताळून पाहण्यासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञांनी प्राध्यापक रॉबिन मे यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेत (worm) जंतूंचा अभ्यास केला व त्यांच्या असं लक्षात आलं की, शरीरातील पेशींमध्ये असणा-या एक विशिष्ट जनुकाचा आपल्या आयुष्यमान होण्याशी व रोगप्रतिकारकशक्तीशी ब-याच अंशी संबंध आहे.

 

शास्त्रज्ञांच्या मते, हे जनुक प्राणी तसंच मानवामध्येही असल्याने या शोधाच्या माध्यमातून वयोवृद्धी व रोगप्रतिकारकशक्ती यांवर परिणाम करणा-या अनेक कारणांचा उलगडा होऊ शकतो. जंतूंमध्ये आढळणा-या या जनुकाला डी.ए.एफ. 16 असं म्हटलं जातं.

 

जगातील लोकसंख्येचा मोठा भाग वृद्धत्वाकडे चालला आहे. ही लोकसंख्येतील वृद्धांची वाढ धक्कादायक गतीने होत असून यामुळे आरोग्य व सामाजिक सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यातच मानवाचा जीवनकाळ हा सरासरी 80 वर्षापर्यंत पोहोचला असून मागील वर्षी हाती आलेल्या डेन्मार्कच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, आता जन्मणा-या बालकांपैकी अर्ध्याहून जास्त बालक आरोग्यातील नवनवीन शोध व सुधारणांमुळे आपला शंभरावा वाढदिवसही सहज साजरा करू शकतील.

 

पण वाढत्या जीवनकाळाचा उत्तरार्ध सुखकर व निरोगी कसा होईल, याचं उत्तर या अभ्यासाअंती मिळालं आहे. प्राध्यापक रॉबिन मे यांच्या मते, जनुकं हे वयवाढीला कसं नियंत्रित करतात, तसंच जनुकांचा रोगप्रतिकारकशक्तींसारख्या इतर गुणधर्मावर काय परिणाम होतो, हे शोधणं हा अभ्यासाचा मूळ विषय होता.

 

मे यांच्या चमूने जंतूंच्या चार वेगवेगळ्या जातींमधील आयुष्यमान, प्रतिकारकशक्ती आणि ताणावर नियंत्रण या बाबींची तुलना केली. तसंच या चारही जातींमधील काही जनुकांच्या कार्यावरही लक्ष ठेवलं. निरीक्षणांवरून असं आढळलं की, चारही जातींमधील डीएएफ-16 या जनुकाचा परिणाम खरोखरीच वेगळा आहे.

 

या भिन्न जातींमध्ये डीएएफ-१६च्या परिणामांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, ज्या जातींमध्ये डीएएफ-16 जास्त प्रमाणात कार्यक्षम होतं त्यांच्या बाबतीत दीर्घायुष्य, प्रकिारकशक्तीमध्ये वाढ व संसर्गापासून वाढीव संरक्षण आढळून आलं.

 

मे यांच्या म्हणण्यानुसार डीएएफ-16 हे जनुक शरीरातील पेशींमध्ये कार्यरत असतं व अशा जनुकांशी साधम्र्य असणारी जनुकं मानवांमध्येही असतात ज्यांना फॉक्सो जनुकअसं म्हटलं जातं. फॉक्सोजनुक वयोवृद्धीमध्ये मोठी भूमिका बजावतात असं मानलं जातं.

 

या अभ्यासाला निधी पुरवणा-या Bio technology and biological sciences reserch council (BBSRC)  च्या प्राध्यापक डग्लस केले यांनी सांगितलं आहे की, ‘हे शोध शास्त्रज्ञांना मानवाच्या वयोवृद्धीची कार्यप्रणाली समजून घेण्यात फार महत्त्वाचे ठरतील, निरोगी वृद्धत्वावर अधिकाधिक संशोधन होणं ही काळाची गरज आहे. अशा अभ्यासांमुळे शरीरविज्ञान शास्त्रातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उकल होणं शक्य होईल तसंच वृद्ध व्यक्तींना आपलं आयुष्य सुखकारक निरोगी व कमी त्रासाचं करण्यात मदत होईल.

 हे संशोधन Public library of /Rscience या विज्ञान जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0