पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | अविनाशी खडक हिरा

अविनाशी खडक हिरा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

डायमंड हा शब्द ‘अ‍ॅडमास’ पण ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे व त्याचा अर्थ आहे अविनाशी. मानवाला ठाऊक असणारं असं एकच रत्न आहे, जे फक्त एकाच मूलद्रव्यापासून बनलेलं आहे. हिरा हा पूर्णपणे ‘कार्बन’पासून बनलेला असतो. ग्रॅफाईट हेही फक्त कार्बन आहे, परंतु ते रत्न नाही.

काही आठवडय़ांपूर्वी मध्य प्रदेशातील पन्ना खाणीत 34.37 कॅरेटचा हिरा सापडला आहे. या हि-याची किंमत साधारणत: दोन कोटी रुपये आहे. हा जगातील सर्वात मोठा हिरा नाही, पण पन्नातून निघणारा मोठा हिरा खचितच आहे.

 

डायमंड हा शब्द अ‍ॅडमास पण ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे व त्याचा अर्थ आहे अविनाशी. मानवाला ठाऊक असणारं असं एकच रत्न आहे, जे फक्त एकाच मूलद्रव्यापासून बनलेलं आहे. हिरा हा पूर्णपणे कार्बनपासून बनलेला असतो. ग्रॅफाईट हेही फक्त कार्बन आहे, परंतु ते रत्न नाही.

 

हिऱ्याची निर्मिती पृथ्वीच्या उदरात होते. जमिनीखाली 75 ते 120 मैलांच्या पट्टय़ातील मँटलच्या क्षेत्रात विपुल प्रमाणात कार्बन असतो. हा कार्बन तिथल्या खडकात बंदिस्त असतो किंवा मॅग्मात विखुरलेला असतो. मँटलमध्ये फार मोठय़ा प्रमाणात तापमान व दाब असतो. योग्य तापमान व दाब असेल तर तिथला कार्बन एकत्र येतो व विशिष्ट संरचना निर्माण झाल्यानंतर हि-याचं स्वरूप ग्रहण करतात. हि-याची पैदास 45 ते 60 किलोबार व 900 ते 1300 अंश सेल्सियसच्या दरम्यान होते. काही हिरे 200 ते 250 मैलाखालीसुद्धा तयार होतात, पण ते फारच दुर्मीळ आहेत.

 

अनुकूल परिस्थिती असेल तरी हि-यांची निर्मिती होईलच, याची खात्री नसते, कारण थोडीशी रासायनिक व भौतिक परिस्थिती बदलली तरी हिऱ्यांच्या संरचनेत बदल घडून येतात व ते इतर मूलद्रव्यात बदलून जातात. पण समजा तिथे हिरा निर्माण झाला तरी त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो. जोपर्यंत हा हिरा पृष्ठभागावर येत नाही तोपर्यंत मानवाला त्याचा वापर करणं शक्य नसतं.

 

हिरे ज्या खडकात सापडतात त्याला किंबर्लाइट पाइप किंवा ब्लू ग्राउंड म्हणतात. या खडकाची निर्मिती थोडय़ा अजब तऱ्हेनेच होते. मँटलच्या वरच्या पट्टय़ातील लाव्हारसात विरघळलेल्या स्वरूपात कार्बन डायऑक्साइडचं अस्तित्व असतं. या क्षेत्रात काही कारणास्तव तापमान वाढलं किंवा वरून दाब कमी झाल्यामुळे या वायूचे बुडबुडे मोठे होऊ लागतात. या वाढणा-या बुडबुडय़ांमुळे आजूबाजूच्या खडकांवर दाब वाहू लागतो व वायू आणि लाव्हारस मिश्रण त्यांना घेऊन पृष्ठभागावर अतिशय वेगाने झेपावते. काही वेळेला हा वेग आवाजाच्या लहरींपेक्षाही जास्त असतो. या सुपरसोनिक वेगामुळेच हिरे हिरे राहतात. कारण जर वेग कमी असेल तर भौतिक व रासायनिक बदलांमुळे हि-यांची स्फटिक संरचना ग्रॅफाइटमध्ये बदलायला वेळ लागत नाही.

 

ज्या पाइपमधून हिरे पृथ्वीच्या उदरातून तिच्या पृष्ठभागावर येतात तो पाइप अतिशय लहान असतो. हा एक ज्वालामुखीचाच प्रकार असतो, पण ज्वालामुखीचा विस्तार जेवढा अधिक असतो, तेवढा या पाइपचा नसतो. याचं मूख काही शेकडो मीटरचंच असतं. त्यामुळे यांचा पृष्ठभागावर शोध घेण्याचं काम फार कठीण असतं, म्हणूनच ते दुर्मीळ असतं.

 

भूपृष्ठावर सापडणारे सारेच हिरे दागिने तयार करण्यासाठी वापरण्यात येत नाहीत. फक्त एक चतुर्थाश हिरेच दागिन्यात वापरले जातात. बाकी सा-यांचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात होतो. प्रत्येक 100 टन मातीतून एक कॅरट म्हणजे अर्धा ग्रॅम हिरा हाती लागतो. कॅरट हे हिरा मोजण्याचं गणक आहे. एक कॅरट म्हणजे अर्धा ग्रॅम. सारेच हिरे सफेद किंवा रंगहीन नसतात. सामान्यपणे आपण टीव्ही, मासिकांतून सफेदच हिरे पाहतो, पण हिरे इतर अनेक रंगांचे असतात. ते पिवळ्या, लाल, तपकिरी, निळ्या, हिरव्या, काळ्या, जांभळ्या, नारंगी रंगातही रंगलेले असतात. रंगाच्या आधारावर हिऱ्यांची विभागणी डी ते झेड या कॅटॅगरीत होते. डी म्हणजे सफेद आणि झेड म्हणजे पिवळा किंवा तपकिरी. डी आणि झेडच्या मध्ये अनेक प्रकारचे रंग असतात. हिऱ्यांची पारदर्शिता तिचं मूल्य वाढवते. जर हि-यात एखादं व्यंग किंवा एखादा घटक नसेल तर त्याची पारदर्शिता कमी होते. ओरखडय़ामुळेही पारदर्शिता कमी होते. हि-याचं सौंदर्य त्यांचं कटिंग करून वाढवलं जातं. उत्तम कारागिराच्या हाती ओबडधोबड हिरा दिल्यानंतर तो ज्या अफलातून कापाकापी करतो त्यामुळे तो अकल्पितरीत्या सुंदर दिसतो. या कटमुळे हिऱ्यातून प्रकाश किती प्रमाणात आरपार जाऊ शकतो हे ठरतं. तो चकाकतो अगदी डोळे दिपवण्याएवढा.

 

हि-याचं मूल्य वरील चारही घटकांवर अवलंबून असतं. कॅरट, रंग, पारदर्शिता व कट हे ते चार घटक ज्याच्यावर त्यांची किंमत ठरते. जेवढा मोठा हिरा असेल तेवढा तो दुर्मीळ असतो. तो दुर्मीळ असतो म्हणूनच त्याची किंमतही जास्त असते. एक कॅरटचा हिरा अर्ध्या कॅरटच्या हि-यापेक्षा दुर्मीळ असतो, पण म्हणून त्याची किंमत दुप्पट नसते. ती कधी-कधी दुपटीहून जास्त असते दोन किंवा तीन कॅरटचा हिरा सहजासहजी सापडत नाही. पण सापडलाच तर त्याची किंमत रुपयात पाच अंकी असते. पाच किंवा त्याहून जास्त कॅरटचा हिरा बाजारात सात ते सहा किंवा त्याहून अधिक किमतीला पोहोचतो.

 हि-याचा उद्गम सव्वाचार अब्ज वर्षापूर्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचं अस्तित्व जीवनाच्या उत्पत्तीपूर्वीचं आहे. पृथ्वीतलावर जे काही हिरे सापडलेले आहेत त्यातील सर्वात कमी वयोमानाचे हिरेही सुमारे शंभर कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेले आहेत. हिरे पूर्वी फक्त भारतातच शोधून काढले जात होते. ते पन्ना व आंध्र प्रदेशातील वज्रकरूर येथील खाणींतून बाहेर उपसले जायचे. 1725 मध्ये ब्राझिल व 1870नंतर दक्षिण आफ्रिकेत हिरे सापडले. तेव्हापासून अनेक ठिकाणी या खडकांचा शोध सुरूच आहे. अंटाक्र्टिका व युरोप सोडून इतर ठिकाणी हिऱ्यांचं उत्खनन व शोध सुरू आहेत. जगातील 70 टक्के हिरे भारतात कट व पॉलिश केले जातात.या व्यवसायातून आपल्या देशाला सुमारे 50,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0