माफक अल्कोहोलचे सेवन आरोग्यदायी!
वृद्धांच्या शरीराला चालताना कंप सुटतो. काही व्यक्तींना वयाच्या चाळीशीच्या आसपासही कंपवाताचा त्रास जाणवतो. कंपवात बरा व्हावा यासाठी मर्यादित प्रमाणात अल्कोहोलचा वापर परिणामकारक ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.
वृद्धांच्या शरीराला चालताना कंप सुटतो. काही व्यक्तींना वयाच्या चाळीशीच्या आसपासही कंपवाताचा त्रास जाणवतो. कंपवात बरा व्हावा यासाठी मर्यादित प्रमाणात अल्कोहोलचा वापर परिणामकारक ठरू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र, अल्कोहोल अति प्रमाणात घेणं घातक ठरू शकतं, असा इशाराही दिला आहे.
अमेरिकेच्या ‘राष्ट्रीय आरोग्य संस्थे’च्या शास्त्रज्ञांनी ‘अॅक्टानोल’ या अल्कोहोलचा वापर कंपवातासाठी हितकारक असल्याचं म्हटलं आहे. ‘अॅक्टानोल’चा वापर परफ्युममध्ये एक रंगहीन घटक म्हणूनही केला जातो. अॅक्टानोलचा वापर सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी केला जाऊ शकतो. कंपवाताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अल्कोहोल घेतल्यानंतर त्यांचा त्रास लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं आढळून आलं आहे. घातक नसलेल्या अॅक्टानोल अल्कोहोलमुळे 80 टक्के रुग्णांना त्याचा फायदाच झाला आहे.
यात संशोधकांनी प्रत्येक रुग्णाला त्याच्या वजनानुसार प्रत्येक किलोमागे एक मिलीग्रॅम या प्रमाणात औषध दिलं. त्यानंतर 90 मिनिटांतच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्याचबरोबर दुस-या प्रयोगात अॅक्टानोल दिल्यानंतर पाच तासांनी रुग्णांची तपासणी केली गेली. त्यात इतर रुग्णांनी कंपवातावर घेतलेल्या दुस-या औषधांपेक्षा अॅक्टानोल जास्त परिणामकारक असल्याचं दिसलं. कंपवाताचा त्रास संबंधित व्यक्तीला शरीराची हालचाल करताना होत होता. स्थिर बसलेलं असताना किंवा हालचाल करत नसताना हा त्रास जाणवला नाही. हात, पाय, डोकं, चेहरा याच्यावर कंपवाताचा सर्वात जास्त परिणाम जाणवतो. चुकीच्या गुणसूत्रांमुळे निर्माण होणार हा आजार अनुवंशिक आहे. त्याचबरोबर थॉयरॉईड ग्रंथींचं अति सक्रिय होणं, फिट येण्याच्या आजारावर घेतलेली औषधं आणि मानसिक व्याधींवर घेतलेल्या औषधोपचारामुळे कंपवात होऊ शकतो. मेंदूच्या हालचाली नियंत्रित करणा-या भागात उत्स्फूर्तपणे हालचाली झाल्यामुळे कंपवाताचा त्रास होतो. कंपवात पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरी अॅक्टानोलच्या प्रभावामुळे अशा अनियंत्रित हालचालींना मोठय़ा प्रमाणात आळा बसतो.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा