PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय यशोगाथा ‘पर्किन-एल्मर’ची ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 22 May, 2012 08:25:00 AM अंतराळ विश्वाचं आकर्षण असलेल्या चार्लस एल्मर आणि रिचर्ड पर्किन या दोन व्यावसायिकांनी एकत्र येऊन ‘पर्किन-एल्मर’ या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय उद्योगासाठी लागणा-या उपकरणांची निर्मिती करणं. गेल्या पंच्चाहत्तर वर्षापासून कंपनी ते काम अविरतपणे करत आहे. कंपनीच्या यशोगाथेवर टाकलेला प्रकाशझोत. डायनोसॉर युगातलं परागीभवन ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 07:25:00 AM परागीभवन घडवणा-या साधारण दहा कोटी वर्षापूर्वीच्या कीटकांचा शोध फ्रान्समधील संशोधक कॅरमेन सोरियानो आणि त्यांच्या चमूला लागला आहे. परागीभवनाला कारणीभूत असणा-या या कीटकांची प्रजाती डायनोसॉरच्या युगातील असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. वैशिष्ट्यपूर्ण घरांची निर्मिती करणारे ओरांगउटांग! ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 07:05:00 AM नुकताचा मँचेस्टर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी माकडांचा अभ्यास केला. त्या अभ्यासात इतर प्राण्यांपेक्षा माकडामध्ये अधिक हस्तकौशल्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. कुतूहल आफ्रिकेतील पाणीसाठ्याचं ================================================================================ प्रहार on 22 May, 2012 06:55:00 AM पाण्याचा अनियंत्रित उपसा, हे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. पाणीटंचाईची समस्या आज भारतासारख्या महत्त्वपूर्ण देशांना जाणवत आहे. मंगळच भावी आशास्थान? ================================================================================ शैलेश पाटील on 15 May, 2012 09:05:00 AM पृथ्वीवरील हवामानात होणारे बदल, दर वर्षागणिक वाढत चाललेलं तापमान लक्षात घेऊन मानवाला दुसरं वसतिस्थान शोधावं लागेल, असं भाकीत शास्त्रज्ञांनी केलं होतं. त्यासाठी मंगळाकडे डोळे लावून बसलेल्या शास्त्रज्ञांच्या पदरी मधल्या काळात निराशा आली होती. मात्र, मंगळावरील परिस्थितीबाबतचं नवं संशोधन पुन्हा एकदा या ग्रहावरील पोषक वातावरणाबाबत आशा निर्माण करत आहे. मगरींचं त-हेवाईक जग ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 15 May, 2012 08:50:00 AM आपल्याला जे जे मिळवता येईल, ते गट्टम करणं हा मगरींचा स्वभावधर्म. या मगरी पूर्वी आकाराने अजस्त्र होत्या. आयोवा विद्यापीठाचे एक संशोधक ख्रिस्तोफर ब्रीचू यांनी ते संशोधनाद्वारे सिद्ध केलं आहे. त्यांना शिंगंही होती. मगरींच्या या नव्या संशोधनावर टाकलेला हा प्रकाशझोत.. पश्चिम अंटार्क्टिकामधील हिमनगांना धोका ================================================================================ योगेश जोशी on 15 May, 2012 08:20:00 AM जागतिक तापमानवाढ सध्याच्या गतीने सुरू राहिली तर, जगातील प्रचंड हिमनगांपैकी एक असणा-या पश्चिम अंटार्क्टिकामधील हिमनग वितळतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तिसरा डोळा ================================================================================ शैलेश पाटील on 08 May, 2012 04:55:00 AM रडार इमेजिंगच्या क्षेत्रात आतापर्यंत काही मोजक्याच देशांचा संचार होता. कारण हे तंत्रज्ञान जितकं गुंतागुंतीचं आहे, तितकंच खर्चिकही आहे. पण या तंत्रज्ञानाचा आवाका, त्याची ताकद आणि कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन याबरोबरच त्याचं लष्करी महत्त्व लक्षात घेता ते आत्मसात करणं अत्यावश्यक होतं. अंतराळातून पृथ्वीचे बारकावे टिपणारं हे तंत्रज्ञान म्हणजे तिसरा डोळा आहे, असं म्हणावं लागेल. परिपूर्ण क्षेपणास्त्र तंत्रज्ञान ================================================================================ प्रहार on 08 May, 2012 04:55:00 AM काही दिवसांपूर्वीच अग्नी-5 हे क्षेपणास्त्र विकसित करून आपली ताकद जगाला दाखवून देणा-या भारताने हल्ला करणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्याबरोबरच क्षेपणास्त्रांचा हल्ला थोपवणारे तंत्रज्ञानही विकसित करून या क्षेत्रातील परिपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. निद्राधीनतेने वाढतात वाहन अपघात ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 08 May, 2012 04:45:00 AM वाहन चालवताना वाढणा-या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन अपघातांची कारणं शोधण्यासाठी अमेरिकेत नुकतंच एक सर्वेक्षण झालं. निद्राधीनता हे वाहन चालवताना होणा-या अपघातांचं प्रमुख कारण असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे. त्यातही धूम्रपान करून वाहन चालवताना होणा-या अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.