साय-फाय

image

`जंगलराज' यायला हवं

12 April, 2011 05:30:00 AM
केवळ झाडांची गर्दी म्हणजे जंगल नव्हे, तर ती एक गुंतागुंतीची जैविक पद्धती आहे. त्यांचं रक्षण करणं आणि ती वाढवणं, हे आपलं कर्तव्य आहे. डोंगरमाथ्यावरील वृक्ष तोडल्यास सुरळीत चाललेलं नैसर्गिक चक्र उद्ध्वस्त होतं. एक झाड कापलं तर 10 झाडं लावली पाहिजेत हा वनविभागाचा नियम धाब्यावर बसवत गेल्या दोन दशकांत केवळ एकच टक्का वृक्षारोपण झाल्याचं आढळून आलं आहे.

हवामानबदलाचा धान्यउत्पादनावर परिणाम

12 April, 2011 05:30:00 AM हवामानात होत असलेल्या टोकाच्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अतिवृष्टी आणि दुष्काळ यांची आवर्तनं नित्याचीच होतील, असा अंदाज आहे. जगभरातील शेती ही विशिष्ट ठिकाणच्या हवामानाच्या तर्कशुद्ध अंदाजावर आधारीत असते. हवामानबदलाचा थेट परिणाम धान्यउत्पादनावरही होण्याचा धोका वर्तवण्यात आला असून अन्नसुरक्षेचा प्रश्न भविष्यात आणखी तीव्र होत जाणार हे निश्चित आहे....
आणखी वाचा

अभूतपूर्व रमण प्रभाव

12 April, 2011 05:30:00 AM मेडिटरेनियन समुद्राच्या निळय़ाभोर रंगाने रमण यांना मोहिनी घातली होती. सागराचा हा निळा रंग प्रकाशाच्या विकिरणामुळे पाण्याच्या अणूद्वारे निर्माण होतो, असं त्यांना प्रयोगात आढळून आलं. याच विषयावरील संशोधनातून पुढे ‘रमण प्रभाव’चा शोध लागला....
आणखी वाचा
image

अंतरंग भूकंप-सुनामीचं

22 March, 2011 08:30:00 AM पृथ्वीची संक्रमणावस्था अजूनही संपलेली नाही. अस्थैर्याकडून स्थैर्याकडे तिची धाव सुरू आहे. अभ्यासातून मानवाला भूकंप आणि सुनामीच्या अनेक गुणवैशिष्टय़ांचा साक्षात्कार झाला आहे....
आणखी वाचा
image

अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि फुकुशिमा दुर्घटना

22 March, 2011 08:40:00 AM फुकुशिमा येथील अणुभट्टीत समुद्राच्या पाण्याचा शीतक म्हणून वापर होत होता, मात्र सुनामीच्या तडाख्यात पाणी खेचणारे पंप आणि त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. डिझेलवर आधारित जनरेटरवर पंप सुरू होण्यास वेळ लागून त्यांच्या वापरावरही मर्यादा आल्या. यादरम्यान अणुभट्टीचं तापमान वाढत जाऊन आतील पाण्याची वाफ झाली. पाण्यापेक्षा वाफेचं प्रमाण वाढून तापमानही खूप वाढलं. अणुइंधनाचं आवरण म्हणून वापरलेल्या झिकरेनियमची पाणी आणि वाफेशी अभिक्रिया होऊन त्यातून ज्वलनशील हायड्रोजन वायूची निर्मिती झाली. ही साखळी थांबवता आली असती, तर स्फोट टळला असता.....
आणखी वाचा

विज्ञानक्षेत्राच्या दैनंदिन समस्या

15 March, 2011 03:00:00 AM विज्ञानाने मानवी समाजात क्रांती घडवून आणली आहे. पण सद्यस्थितीत आपल्या देशातील वैज्ञानिक क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासलंय, ही वस्तुस्थिती आहे, त्यावर एक नजर.....
आणखी वाचा

रमण कथा

15 March, 2011 02:30:00 AM भारतात नुकताच विज्ञान दिन पार पडला. डॉ. सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या ‘रमण प्रभाव’ या शोधाची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. भारतीय विज्ञान जगताला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणा-या रमण यांच्या जीवनकार्यावर यानिमित्ताने टाकलेला हा प्रकाश....
आणखी वाचा

संशोधनात ‘ती’

08 March, 2011 11:45:00 AM शेतीचा शोध स्त्रीनेच लावला. तेव्हापासून आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात तिचं संशोधन कार्य सुरूच आहे. कधी प्रयोगशाळेत तर कधी थेट स्वयंपाकघरातही. शोध लावलेली एखादी गोष्ट कितीही छोटी असली तरी त्यामुळे आयुष्य सुखकर होतंय हे महत्त्वाचं. आपल्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टींचा या स्त्रियांनी शोध लावला. छोटय़ा-मोठय़ा अनेक गोष्टींचं स्वरूप पालटणारे प्रयोग त्यांनी केले आणि त्यातही त्या यशस्वी झाल्या. हे शोध लावणं आणि त्यासाठी पेटंट मिळवणं ही मधल्या काळात सोपी गोष्ट नव्हती. अमेरिकेसारख्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या देशात स्त्रियांनाही अनंत अडचणींना सामोरं जावं लागत होतं. पण त्यांना तोंड देत त्या आपलं काम करतच राहिल्या. आज जगाने त्यांची दखल घेतली आहे. स्त्रियांनी केलेलं संशोधन केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते संपूर्ण जगाला अर्थात एकूणच मनुष्यजातीला उपयोगी ठरलेलं आहे....
आणखी वाचा

...यांनी बदलला इतिहास

22 February, 2011 05:30:00 AM आपल्या दैनंदिन वापरातले अनेक पदार्थ इतिहास बदलवण्यास कारणीभूत ठरले आहेत. प्लास्टिक व रबर यांसारखे पदार्थ तर आज मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. कागदाशिवाय मानवाची सांस्कृतिक प्रगती होणं शक्य नव्हतं. लाकूड, लोह आणि काचेच्या पदार्थाचं मानवी उत्थान व जडणघडणीत मोलाचं योगदान आहे. ...
आणखी वाचा

एव्हरेस्टवरील मृत्यूचं रहस्य

22 February, 2011 05:30:00 AM वास्तविक, एव्हरेस्टसारख्या उंच शिखरावर ऑक्सिजन नळकांडय़ाशिवाय पोहोचणं शक्य नाही, असं मानलं जात असे. परंतु 1953 साली एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी ऑक्सिजनविना हे अजिंक्य शिखर पादाक्रांत केलं. त्याचीच पुनरावृत्ती 1978 साली मेस्नर आणि हॅबलर या गिर्यारोहक जोडीनेही केली होती. त्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट स्वारीवर गेले. 1996 मध्ये हिमवादळात सापडून 16 जण प्राणांस मुकले होते, या वर्षीही तिथे 15 मृतदेह सापडले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 320 | displaying: 91 - 100