PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय नायट्रोजनची उलाढाल ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 02 August, 2011 07:50:00 AM नायट्रोजन वायू हा जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा घटक आहे. अन्नधान्याचं उत्पादन नायट्रोजनवर अवलंबून असतं. मानवी विकासाच्या संबंधित विविध क्रियांतून, विशेषत: शेतीव्यवसाय आणि खनिज तेलांचा वापर करून ऊर्जा उत्पादन करताना, त्याची होणारी भरमसाठ निर्मिती पर्यावरणाला तसंच मानवी स्वास्थ्याला हानीकारक ठरते. पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. त्यातूनच सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम उभे ठाकतात. कामजीवनातले नवनवे कंगोरे ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 26 July, 2011 07:00:00 AM कामजीवनाचा हेतू केवळ प्रजनन नसून सहजीवनाची ती एक मूलभूत गरज आहे. फ्राउडने मानवी जीवनातील कामरंगाचं महत्त्व शास्त्रोक्त पद्धतीने उघड केल्यानंतर संशोधक आजवर या विषयाचा बारकाईने मागोवा घेत आहेत. यासंबंधी अलिकडेच पाच देशांत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतून कामजीवनाचे नवनवे कंगोरे समोर आले आहेत. त्रावणकोरचा वैज्ञानिक वारसा ================================================================================ प्रवीण गवळी on 26 July, 2011 07:00:00 AM 19व्या शतकात त्रावणकोर आणि शहर परिसात चुंबकीय वेधशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या स्थापन करण्याचं सारं श्रेय त्यावेळचे त्रावणकोरचे महाराज श्रीराम वर्मा (स्वाती थिरूनल) यांना जातं. या ज्ञानी राजाला वैज्ञानिक क्षेत्रात जागतिक स्तरावर होणा-या प्रगतीची जाण होती. अंतरिक्ष यानाच्या एका पर्वाची अखेर ================================================================================ सचिन दिवाण on 19 July, 2011 07:30:00 AM अ‍ॅटलांटिसच्या परतीने नासातर्फे चालवल्या जाणा-या स्पेस शटल या अंतराळ मोहिमेची उद्या सांगता होईल. लवकरच नवी अंतराळ यानं त्यांची जागा घेतील आणि अंतराळ संशोधनाची क्षितिजं विस्तारण्याचं काम सुरूच राहील. अँटी ऑक्सिडंटचं माहात्म्य ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 19 July, 2011 07:30:00 AM भरपूर ताजी फळं, कच्च्या भाज्या नियमितपणे खाल्ल्या पाहिजेत. त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराचं विविध आजारांपासून रक्षण होतं. अँटी ऑक्सिडंट्स आणि त्याचं माहात्म्य नीट जाणून घेतल्यास त्याची अधिक उपयुक्तता लक्षात येईल. लोककल्याणासाठी लैंगिक संक्रमण ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 05 July, 2011 04:00:00 AM तारुण्यातल्या लैंगिक संक्रमणाचा अस्थिर काळ अधिक जाणता व्हावा, समाजाला त्याचा कमीतकमी उपद्रव व्हावा, यासाठी लैंगिक शिक्षण हा उपाय लागू पडतो आहे. प्रजननक्षम वयात हे शिक्षण आवश्यक आहेच, पण काही नवे मार्ग शोधून लोकसंख्या वाढीची समस्या सोडवता येऊ शकेल.. ऊर्जेचा पुरेपूर उपयोग ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 28 June, 2011 08:00:00 AM ऊर्जा बचत हा पर्यावरण रक्षणासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. ऊर्जेचा पुरेपूर उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून वाहनं आणि कारखान्यांतून वाया जाणारी उष्णता उपयोगात आणण्यासाठी पर्यावरण-स्नेही यंत्रणांचा शोध लावण्याकरता संशोधक आता सरसावले आहेत. पाऊस मोजताना.. ================================================================================ सचिन दिवाण on 28 June, 2011 07:30:00 AM वर्तमानपत्रांत छापून येणारे पर्जन्यमापनाचे आकडे सामान्यांसाठी कदाचित ‘बोअरिंग’ ठरू शकतात. पण पावसाचं मोजमाप करणं, वर्षानुवर्षे आकडेवारी जमवून तिचं विश्लेषण करणं आणि देशाच्या विकासात्मक नियोजनासाठी तिचा वापर करणं, हे मोठं चिकाटीचं आणि तितकंच महत्त्वाचं काम आहे. इंटरनेटच्या ढगांमधून ================================================================================ आय. टी. नेटकर on 21 June, 2011 04:30:00 AM ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ हा शब्द भारतात, मुंबईत तुम्हाआम्हा सर्वाच्या कानांवर पडला तो गेल्या पंधरवडय़ात- अ‍ॅपल कंपनीच्या आय-क्लाउडमुळे! यातल्या ‘क्लाउड’चा ढगांशी काय संबंध? अज्ञात ठिकाणाहून घेवाण (डाउनलोड) आणि देवाण (अपलोड) करता येण्याची शक्ती ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’खेरीज अन्य इंटरनेट तंत्रज्ञानातही असतेच, मग ‘क्लाउड’चं कौतुक कशाला? हे कॉम्प्युटिंगवाले क्लाउड असतात कुठे? या प्रश्नांची ही सरळ उत्तरं.. नावीन्याचे आविष्कार ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 21 June, 2011 04:30:00 AM पर्यावरण रक्षण ही आजची गरज आहे. ऊर्जाबचत हा त्यावरील एक उपाय आहे. ऊर्जा वाचवण्यासाठी जगभरात अनेक प्रयोग केले जात आहेत. त्यात नावीन्याचे आविष्कार घडवणा-या अनेक उपकरणांचाही हातभार आहे.