22 February, 2011 05:30:00 AM
‘जेन मोबाईल’ने जेन जेड 82 नावाने एनालॉग टीव्ही मोबाईल सेट बाजारात आणला आहे. ज्यावर कुठेही दूरदर्शन पाहता येईल. 2.4 इंच स्क्रीन असलेला हा सेट उभा-आडवा कसाही ठेवला तरी फोनची स्क्रीन आपोआप अॅडजेस्ट होते. सहा तासांची बॅटरी लाइफ असल्याने संपूर्ण मॅच पाहता येते. कोणतंही
15 February, 2011 08:00:00 AM
भारत व मादागास्कर हे प्रदेश 88 दशलक्ष वर्षापूर्वी एकत्र होते. त्यानंतर ते पूर्णत: विभक्त झाले. याच्या खाणाखुणा या दोन्ही प्रदेशांत आजही पाहायला मिळतात....
15 February, 2011 08:30:00 AM
शैवालापासून तयार होणारे मेद पदार्थ व तैल पदार्थाचं शुद्धिकरण करून पेट्रोल, डिझेल, विमानाचं इंधन, इथेनॉल इत्यादींमध्ये रूपांतर करता येतं. शैवालांची शेती करून विविध त-हेची उच्च दर्जाची जैविक इंधनं निर्माण करता येतील व ही इंधनं पर्यावरणस्नेही असल्यामुळे कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल.
...
09 February, 2011 08:30:00 AM
जोतिबा या अखंडात सज्जन कोणास म्हणावं, हे सांगतात. मी सत्यासाठी सदैव गंभीर असतो, सत्याची पाठराखण करतो आणि सत्यासाठी झगडण्यात ज्यास शूरपणा वाटतो, असा जितेंद्रिय मानवास भूषण असतो. तो सर्वाना उपयोगी पडणारा, मदत करणारा सद्गुणाने संपन्न असतो. दुस-यांना होणा-या सुख-दु:खाची तुलना तो आपल्याशी करतो. आपल्यावरून जग ओळखावं, असं म्हणतात, असा माणूस आत्मपरीक्षण करतो आणि सर्वाशी सारखी वागणूक ठेवतो. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, अशा मानवास सज्जन म्हणावं. असा मानव मला आवडेल, त्याचं मी चुंबन घेईन, असं जोतिबा म्हणतात....
09 February, 2011 08:00:00 AM
समाजात आज असुरक्षितता निर्माण झालेली आहे. तसेच प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे माणसे देववादी-दैववादी बनत आहेत कष्टावरचा, नीतिमत्तेवरचा, चारित्र्यावरचा, प्रामाणिकपणावरचा माणसांचा विश्वासच उडत चाललेला आहे. म्हणूनच आज मंदिरात देवाकडे आणि भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषांकडे रांग लागत आहे. विचार केला की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे माणसाने देववादी-दैववादी होणे, हे समाजाच्या आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नव्हे....
09 February, 2011 07:30:00 AM
ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की, नाही हा वाद जुना आहे. फलज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात आणण्याचा मुद्दाही काही वर्षापूर्वी चर्चेला आला होता. देशातील बुद्धिवादी वर्गाने त्याला कडाडून विरोध केला होता. आता मुंबई हायकोर्टाने आपल्याकडे दाखल केलेली एक याचिका फेटाळताना ज्योतिष हे शास्त्र असल्याचं मान्य केलं आहे. यामुळे जुना वाद पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्योतिषशास्त्राची चिरफाड करणारा प्रबोधनकार ठाकरे यांचा ‘शनिमहात्म्य अर्थात ग्रहदशेच्या फे-यांचा उलगडा’ (1928) या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा अंश......
08 February, 2011 08:05:00 AM
‘नासा’ ही अंतराळ संस्था सध्या सूर्याबरोबरच बुध आणि शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर, बुधाच्या वैशिष्टय़ांचा उलगडा करण्यासाठी ‘नासा’ने पाठवलेल्या ‘मेसेंजर’ या यानाचा पुढील महिन्यामध्ये बुधाच्या कक्षेमध्ये प्रवेश होणार आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांबरोबरच विज्ञानप्रेमीही याकडे लक्ष ठेवून आहेत....
08 February, 2011 07:30:00 AM
पृथ्वीवरील वाढती गर्दी लक्षात घेता, माणूस आता अंतराळात वस्ती करण्याचं स्वप्न बघतो आहे. साहजिकच वनस्पतीसृष्टीची तिथे कुठे तरी वाढ करणं आवश्यक ठरणार आहे. त्यासंबंधीचे प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध अंतराळ केंद्रांद्वारे हाती घेतलेले आहेत. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाखाली झाडांची वाढ करणं शक्य आहे का, याचा आढावा घेतला जात आहे....
01 February, 2011 06:00:00 AM
निसर्गाने दिलेल्या देणग्या स्वच्छंदपणे उधळून न टाकता त्यांचा काटेकोरपणे वापर केल्यास विविध रुपातील नाना त-हेच्या ऊर्जा, जादूच्या दिव्यातील दयाळू राक्षसाप्रमाणे आपल्यासमोर हात जोडून सेवेस हजर राहील....
01 February, 2011 04:55:00 AM
अमेरिकेला नेहमी ‘मेल्टिंग पॉट’ असं संबोधलं जातं. पृथ्वीतलावर असलेल्या बहुतेक सगळ्या राष्ट्रांतून अनेक लोक या देशात काम करून पैसा कमावण्यासाठी येतात. काही अपवाद वगळता ते सारे तिथे गुण्यागोविंदाने राहातही आहेत. याची सुरुवात ‘गोल्ड रश’दरम्यान झाली....