PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय आज सर्वात मोठा दिवस ================================================================================ प्रहार on 21 June, 2011 04:30:00 AM पृथ्वीचा ध्रुवीय अक्ष आज सूर्याच्या दिशेने कलणार आहे. विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्धात विभागलेल्या देशांत आजचा दिवस सर्वात मोठा ठरणार आहे. वाघ वाचवा रे वाचवा! ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 14 June, 2011 05:30:00 AM आशियातील अभयारण्यांची नीट देखभाल केल्यास 2020 पर्यंत वाघांची संख्या 10 हजारांच्या वर पोहोचेल, असं अलिकडे एका पाहणीत आढळून आलं आहे. व्याघ्ररक्षणामुळे जैवविविधता राखण्यासोबतच कार्बन जप्ती, पाण्याच्या साठय़ाचं रक्षण आणि समाजाच्या सर्वागिण विकासासाठी प्रोत्साहन असे अन्य फायदेदेखील होणार आहेत. ‘एंडोसल्फान’चा वापर तूर्त अपरिहार्यच ================================================================================ गिरीश सावंत on 14 June, 2011 05:30:00 AM एंडोसल्फान या कीटकनाशकाविरोधात जगभरात निसर्गवाद्यांकडून लढा उभारला गेला आहे. पण भारतात या कीटकनाशकावर बंदी आणणं कितपत व्यवहार्य ठरेल? नॅनो टेकची दुसरी बाजू ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 07 June, 2011 08:05:00 AM आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग असलेल्या नॅनो-टेक्नॉलॉजीच्या आधारे एकीकडे मानवी जीवन अधिकाधिक आधुनिक आणि सोपं होत असलं तरी दुसरीकडे मात्र मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचंही आढळून येत आहे. ‘यश’स्वी मेंदू संशोधन ================================================================================ स्वाधीन तांदळे on 07 June, 2011 07:30:00 AM यश मिळवण्यात मेंदूची कार्यप्रणाली महत्त्वाची ठरते, हे मेंदूविज्ञानाच्या आधारे, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. विचार अथवा कृती करताना मेंदूच्या ठराविक भागात होत असलेल्या विशिष्ट हालचालींवर नियंत्रण शक्य आहे. याआधारे माणसाच्या यशाचे मार्ग आणखी सोपे होऊ शकतील. अक्षांश, रेखांश शोधताना ================================================================================ नीता वाळूंज on 31 May, 2011 05:30:00 AM होकायंत्राविना सागरी मार्गाने प्रवास करणारे खलाशी ‘पायलटेज’ आणि ‘डेड रेकनिंग’ तंत्रांचा वापर करत. पण या पद्धतीने ठिकाण-निश्चितीची परिणामकारता आणि अचूकपणा साधण्यासाठी जमिनीचाही विचार करावा लागत असे. शिवाय रात्रीच्या वेळी किंवा अंधारात हे तंत्र कुचकामी ठरत असे. पुढे अक्षांश-रेखांशाचा शोध लागल्यानंतर मात्र परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून आला. पृथ्वीचं भवितव्य आपल्या हाती ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 31 May, 2011 05:30:00 AM पाच जूनला साज-या होणा-या ‘जागतिक पर्यावरणदिना’चं यजमानपद यंदा भारताकडे आहे. या वर्षीचं घोषवाक्य आहे, ‘जंगल : निसर्ग तुमच्यासाठी’. लोकसंख्या आणि नैसर्गिक चक्रातील समतोलाचा बिघाड या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील नैसर्गिक पर्यावरणाचा मुद्दा विशेष महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने योग्य ध्येयधोरणं-पद्धतींचा अवलंब केला तरच यजमानपदाचा मान राखला जाईल. जैविक इंधन आणि नैतिकता ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 24 May, 2011 08:10:00 AM जगात कुपोषणाचं प्रमाण मोठं असताना, पर्यायी इंधनासाठी पिकांची जमीन वापरणं हे नैतिकदृष्टय़ा चुकीचं आहे. जैविक इंधनांचा वापर स्तुत्य असला तरी ती आर्थिक आणि पर्यावरणदृष्टय़ाही परवडणारी नाहीत. विद्युत-चुंबकीय सुईचं ‘मूळपद’ ================================================================================ प्रवीण गवळी on 24 May, 2011 07:30:00 AM भूचुंबकत्वाचा सिद्धांत पुढे जाण्यासाठी ज्या विद्युत-चुंबकीय प्रयोगांची मदत झाली, ते 190 वर्षापूर्वीपासून तिघा भौतिकशास्त्रज्ञांनी सुरू केले होते. विजेचा प्रवाह चुंबकीय बल निर्माण करतो, या तत्त्वावर आधारलेला ‘विद्युत प्रवर्तना’चा मायकल फॅरेडेचा शोध 1831 साली मान्य झाला, पण त्या आधीच्या घडामोडी म्हणजे ‘असं का घडतं? सुईची दिशा बदलते, पण बदललेल्या दिशेला ती कायम का नाही राहात?’ याबद्दलच्या वैज्ञानिक कुतूहलाची सुरस कथाच म्हणावी लागेल.. गोष्ट चुंबक-ध्रुवाची ================================================================================ प्रवीण गवळी on 17 May, 2011 07:30:00 AM गुरुत्वाकर्षणाइतकंच पृथ्वीच्या नैसर्गिक अंगभूत गुणवैशिष्टय़ांपैकी दुसरं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे चुंबकत्व. गुरुत्वाकर्षणाच्या कारणमीमांसेमुळे विश्वाच्या अनेक मूलभूत क्रिया-प्रक्रिया समजावून घेणं शक्य झालेलं आहे. पण भूचुंबकत्वाचं स्वरूप समजण्यासाठी व ‘ध्रुव’ ही संकल्पना विकसित होण्यासाठी फार मोठा कालावधी खर्ची घालावा लागला आहे.