साय-फाय
डोळ्यांनी ऐका
05 October, 2010 05:30:00 AM
एका शास्त्रोक्त सर्वेक्षणात आढळलं की, संपर्काची 93 टक्के परिणामकारिता देहबोलीमुळे साध्य होते. कपाळावरील आठय़ा, डोळ्यांतली चमक, नाकाचा शेंडा लाल होणं, डोळ्यांच्या पापण्या फडफडणं, डोळ्यांच्या हालचाली, ओठ चावणं, दात आवळणं, जिभेच्या हालचाली इत्यादी गोष्टींतून माणूस बोलतो तेव्हा डोळे ती भाषा ‘ऐकू’ शकतात. दुस-या एका अभ्यासात असं कळून आलंय की, एखाद्या कृतीचा परिणाम समजण्यासाठी शब्द केवळ सात टक्के उपयोगी पडतात, दर्जेदार आवाज 38 टक्के कामी येतो तर तेच काम देहबोली 55 टक्के करत असते.
समुद्राच्या पोटातील खळबळ
05 October, 2010 05:30:00 AM वातावरणात निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड समुद्रामध्ये शोषला जातो, त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण मर्यादित राहण्यास मदत झाली आहे. मात्र या प्रक्रियेचे दुष्परिणाम समुद्रावर आणि पर्यायाने समुद्राच्या पोटातील पर्यावरणावर होताना दिसत आहेत ...कृत्रिम त्वचेच्या शोधात...
27 September, 2010 07:50:00 AM स्पेनमधील ग्रेनाडा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी अगारोझ-फायब्रिन या तंतूमय जैवपदार्थाचा वापर करून, उती-अभियांत्रिकीच्या साह्याने कृत्रिम त्वचा निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. या कृत्रिम त्वचेचं त्यांनी उंदरावर प्रत्यारोपण करून त्यांच्यात होणारी वाढ आणि प्रत्यारोपित त्वचेचं कार्य यांचं निरीक्षण केलं. या प्रयोगातले निष्कर्ष न्याहाळता, मानवी त्वचेवर विविध उपचार करण्यासही याचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे स्पेनमधील संशोधकांनी लावलेला शोध क्रांतिकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.... पण तोवर त्वचादानाचं महत्त्व अबाधित राहील! ...‘नासा’ची हनुमानउडी
28 September, 2010 09:15:00 AM सुमारे 13 लाख 92 हजार किलोमीटरचा व्यास असणाऱ्या सूर्याचं एकूण वस्तुमान पृथ्वीच्या 3 लाख 30 हजार पट आहे. सूर्याचा हा अतितप्त गोळा हायड्रोजन आणि हेलियम यांच्यापासून बनला असून तिथे हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया सातत्याने सुरू असते. या प्रक्रियेतून निर्माण होणा-या उष्णतेमुळे सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे 5505 अंश सेल्सिअसपर्यंत असतं. पृष्ठभागावरील तापमानामध्ये असणा-या फरकामुळेच पृथ्वीवरून सौरडाग दिसून येत असतात....कोळशाच्या जन्माची चित्तरकथा
28 September, 2010 08:40:00 AM खडकांप्रमाणे कोळशाचीदेखील एक भूशास्त्रीय भाषा आहे. जिच्यातून तो आपल्या जन्माची व त्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या पर्यावरणाची परिस्थिती अधोरेखित करत असतो. पृथ्वीने जी काही पर्यावरणीय स्थित्यंतरं पाहिली व अनुभवली आहेत, त्याचा गोषवारा सांगण्यात कोळसा एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो....विश्वनिर्मितीचा शोध घेणारं ‘प्लान्क’
21 September, 2010 09:10:00 AM आपली आकाशगंगा एका बाजूला कललेली आहे, असा शोध अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. दुसरीकडे, अंतराळाच्या सूक्ष्मलहरी-आधारित प्रतिमा पाठवण्याचं काम मार्च 2010 पासून टप्प्याटप्प्यानं करणाऱ्या ‘प्लान्क’ने, आता पूर्ण आकाशाच्या प्रतिमांकनाचं काम तडीस नेलं आहे. अर्थात, हे फक्त एका प्रकारचं प्रतिमांकन असल्यानं अन्य प्रतिमांशी ते ताडून पाहावं लागेल. मात्र ‘प्लान्क’चं काम महत्त्वाचं आहे. कारण, आकाशगंगांमधील तापमानात मोठे फरक असू शकतात, हे या छायाचित्रांच्या या तंत्रमुळे सिद्ध होऊ शकतं. ...तेलगळतीनंतरचं उत्तरदायित्व
21 September, 2010 08:20:00 AM मासे न खाण्याचे दिवस अनंतचतुर्दशीला संपतील, मग पुन्हा- मुंबईजवळ बुडालेलं ‘चित्रा’जहाज, त्यानंतरचा तेलतवंग आणि ‘मासे खावेत की नाही’ याबद्दल तेव्हा झालेल्या गोंधळाची आठवण होईल! पण मेक्सिको आखातातली तेलगळती खरोखर भयावह होती.. त्यानंतर शास्त्रज्ञांनी काय केलं?...काय सांगतेय हिमचकती?
21 September, 2010 07:30:00 AM दरवर्षी होणाऱ्या हिमवर्षावामुळे बर्फाचे वेगवेगळे थर एकावर एक साठत जातात. वातावरणातील विविध घटक या बर्फाच्या वेगवेगळय़ा थरात अडकून राहतात. या बर्फाच्या थरांचा अभ्यास करण्यासाठी हिमचकत्या काढल्या जातात. काही वर्षापूर्वी शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने ग्रीनलँड देशाच्या हिमसाठय़ातून सुमारे तीनशे मीटर लांब हिमचकती खोदून काढली. ती अडीच लाख वर्षाची आहे. अशा या हिमचकतींच्या या रंगतदार कथा......दुर्लक्षित तारका!
14 September, 2010 05:30:00 AM नोबेल पारितोषिकासाठी हेन्रिटा लेविटचा विचार झाला होता, असं इतिहास सांगतो. पृथ्वीपासून ताऱ्यांचं अंतर किती, हे मोजण्याची अचूक पद्धत विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हेन्रिटाच्याच संशोधनामुळे रूढ झाली आणि हबलसारख्या भल्याभल्या शास्त्रज्ञांनी तिचीच पद्धत वापरली. पण हेन्रिटा मात्र हयातभर दुर्लक्षितच राहिली. महिलांना ‘साहायक’च ठेवणाऱ्या हार्वर्डच्या वेधशाळेतल्या या तारकेची चमक तिच्या हयातीत कुणीच जाणली नाही!...सौर त्सुनामी
14 September, 2010 05:30:00 AM सध्या तरी शास्त्रज्ञ या सौर त्सुनामीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि वेळोवेळी ‘त्सुनामी अॅलर्ट’ देण्यात येणार आहे. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य