PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय तापमानवाढीची समस्या जुनीच ================================================================================ वैभव शिरवडकर on 17 April, 2012 07:25:00 AM जागतिक तापमानवाढ ही अलीकडील समस्या असल्याचं म्हटलं जात होतं. औद्योगिक क्रांतीनंतर या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, ही तापमानवाढ अलीकडची नसून गेल्या 135 वर्षापासून पृथ्वीच्या तापमानात वाढ होत असल्याचं सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील नॅशनल ओशिनोग्राफी सेंटर या तीन संस्थांनी केलेल्या संशोधनात आढळलं आहे. मुंग्यांची लक्षणीय वाटचाल ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 17 April, 2012 07:10:00 AM लोहचुंबकीय क्षेत्र आणि कंपनं असलेल्या पथप्रदर्शक खुणांचा मुंग्या आपल्या वाटचालीसाठी वापर करतात. वाळंवटासारख्या दिशाहीन प्रदेशात जमिनीवर एखाद्या भोकाच्या रूपात असलेल्या घरात अचूक परततात. नजरेस पडणा-या खाणाखुणा, गंध आणि सूर्यप्रकाशाचे ध्रुवीकरण यांचा वापर करून मुंग्या मार्गक्रमण करत राहतात. जोसेफ तुस्कानो छोट्या मुंग्यांना आपली दिवसभराची वाटचाल आणि मार्गक्रमण करताना विविध क्लुप्त्या वापराव्या लागतात. त्यामुळे तर वाळवंटासारख्या दिशाहीन प्रदेशात, अन्नाच्या शोधार्थ भटकून झाल्यावर त्या अचूक आपल्या घरट्यात परतू शकतात. आपलंच घरटं सापडणं हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं, अन्यथा त्यांना इतर जातीबांधवाच्या स्पर्धात्मक हल्ल्याला तोंड द्यावं लागतं. शोध निसर्गमित्र डिटर्जन्ट्सचा ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 03 April, 2012 08:05:00 AM सर्वसामान्य माणसांत पर्यावरणाविषयी जागृती निर्माण झालेली असल्यामुळे अलिकडे, ‘निसर्गमित्र’ वस्तूंच्या उत्पादनांना बाजारात भरपूर मागणी आहे. याला अपवाद धुणकं-डिटर्जन्ट्सही नाहीत. त्यामुळे आता शास्त्रज्ञ जैविक विघटन होणा-या पण विषारी नसलेल्या आणि प्रदूषण न करणारी डिटर्जन्ट्स शोधण्यावर भर देत आहेत. सफर गुहांची ================================================================================ प्रवीण गवळी on 03 April, 2012 08:05:00 AM ‘राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा..’ ही ओळख असणा-या महाराष्ट्रात अनेक गुहा आहेत. यातल्या गुहांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तसा त्यांचा भूगोलही पाहण्यासारखा आहे. गुहांच्या दगडी सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी जसे पर्यटक उत्सुक असतात, तशीच त्यांची ओळख करून देण्यासाठी गाइडही पुढे येत आहेत.. पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज अंगठ्याहून लहान ================================================================================ प्रहार on 03 April, 2012 07:55:00 AM कॅनडातील योहो नॅशनल पार्कमध्ये सापडलेला सुमारे पाच कोटी वर्षापूर्वीचा चिमुकला जीवाश्म स्वरूपातील पृष्ठवंशीय प्राणी सर्वात पहिला ज्ञात पृष्ठवंशीय प्राणी आहे व म्हणूनच हा प्राणी मानवासहित सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज म्हणता येऊ शकेल. प्राचीन इस्लामिक विज्ञानशोधांचा उलगडा ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 27 March, 2012 08:50:00 AM इस्लामच्या सुवर्णकाळात नामवंत संशोधक होते. आठव्या ते तेराव्या शतकाच्या काळातील मुस्लिम विद्वान मंडळींनी लावलेल्या शोधांचा जगभर उदो उदो झाला होता. आपल्याकडील आयुर्वेदाप्रमाणेच, इस्लामिक वैज्ञानिकांनी लावलेले वैद्यकीय क्षेत्रातले शोध आधुनिक वैद्यकशास्त्राचा पाया ठरले आहेत. आपोआप तयार होणारे सांधे ================================================================================ प्रहार on 27 March, 2012 08:40:00 AM सांधेदुखीने किंवा संधिवाताने त्रस्त असलेल्या आणि कृत्रिम सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचीही भीती वाटते, अशा रुग्णांना आता घाबरण्याची गरज नाही. हानिकारक धुरकं ================================================================================ संदीप नलावडे on 27 March, 2012 08:20:00 AM औद्योगिकदृष्ट्या प्रगत शहरांमध्ये कारखाने, गिरण्या, विविध दुचाकी वा चारचाकी वाहने यातून बाहेर पडणा-या धुराच्या कणांभोवती बाष्पाचं संद्रवण होऊन धुरकं तयार होतं. वातावरणातील नायट्रोजन ऑक्साइड, पेरोझायकल नायट्रेट, ट्रोपोस्फेरिक ओझोन यांसारखे रासायनिक घटक हवेत मिसळतात. हवेतील बाष्पात हे घटक मिसळल्यानंतर आरोग्यास हानिकारक धुरकं तयार होते. नव्या रक्तगटांचा शोध ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 20 March, 2012 08:05:00 AM आतापर्यंत आपल्याला ए, बी, एबी आणि ओ या रक्तगटांची माहिती आहे. -हेसूस पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे प्रकार आपल्याला माहीत असतात. मानवी शरीरात बाहेरून रक्त भरताना, हे घटक व त्यांचे प्रकार यांची सांगड घालावी लागते. अन्यथा, जीव गमावण्याची वेळ येते, परंतु आता या रक्तगटात नव्याने भर पडत आहे. तीव्र श्रवणशक्तीचे निळे देवमासे ================================================================================ प्रहार on 20 March, 2012 07:50:00 AM अतिशय खोल आणि विशाल समुद्रात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निळ्या रंगाचे देवमासे ढगाच्या गडगडाटाप्रमाणे खूप जोराचा आवाज काढत संवाद साधतात.