04 October, 2011 05:00:00 AM
‘ओझोन होल’ हा शब्दप्रयोग वापरता येईल इतक्या प्रचंड प्रमाणात उत्तर ध्रुवावर ओझोनचा थर वेगाने नाहीसा झाला असल्याचं आढळलं आहे.
28 September, 2011 08:10:00 AM
दासबोधात समर्थानी म्हटलंय ते अगदी खरं आहे. दिवसातील 24 तासांत मनुष्य जवळजवळ 21,600 वेळा श्वासोच्छ्वास करतो. या श्वासोच्छ्वासावर त्याने लक्ष केंद्रित केल्यास ‘सोऽहम्’ अनाहतनाद ध्वनीचा प्रत्यय येतो. अंतर्यामी सखोलरूपात परमसूक्ष्म होऊन हा ध्वनी श्रवण केल्यास सुख, समाधान, शांती मिळू शकते आणि निरोगी आरोग्य व दीर्घायुष्याचा लाभ होऊ शकतो. ...
27 September, 2011 08:05:00 AM
तेलशुद्धीकरणाच्या तंत्रज्ञानातील सुधारणांच्या आधारे समाजहितकारक पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती केली जाते. गेल्या दोन वर्षापासून या क्षेत्रातील जगभरचे तंत्रज्ञ एकत्र जमून परिसंवाद घडवून आणताहेत. 28-29 सप्टेंबरला अमेरिकेतील ह्युस्टन इथे तिसरी परिषद भरत आहे....
27 September, 2011 07:30:00 AM
अल्बर्ट आइनस्टाइनने 1905 मध्ये मांडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामुळे भौतिकशास्त्रासह विज्ञानातील सर्व रूढ कल्पनांना छेद गेला आणि गेल्या 100 वर्षामध्ये विज्ञानाने वेगाने प्रगती केली. मात्र, या सापेक्षतावादाला छेद देत, अणुकणांमधील न्यूट्रिनो या कणांचा वेग प्रकाशापेक्षाही अधिक असल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी अलीकडेच नोंदवलं आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये किंवा सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये या संशोधनामुळे फार फरक पडणार नसला तरीही त्यास दुजोरा मिळाल्यास विज्ञानाचं गूढ उलगडणाऱ्या संकल्पनांची आणि भौतिकशास्त्रातील सर्व संकल्पनांची नव्याने मांडणी करावी लागणार आहे. त्यामुळे ‘सर्न’ प्रयोगशाळेत नोंदवलं गेलेलं निरीक्षण विज्ञानक्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे....
20 September, 2011 07:30:00 AM
ग्रह एकाच सूर्याभोवती (केंद्राभोवती) फिरतात, हे सर्वज्ञात आहे. परंतु शास्त्रज्ञांनी आता अशा एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे जो एकाऐवजी दोन सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. या वैशिष्टय़पूर्ण शोधामुळे ता-यांची निर्मिती, त्यांच्यातील सारखेपणा, एकाच स्त्रोतापासून निर्माण झालेल्या ताऱ्यांमधील समान वैशिष्ट्य वगैरे मुद्दय़ांवर खगोल अभ्यासकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे....
20 September, 2011 07:55:00 AM
भारतासारख्या लहरी हवामान प्रदेशात वर्षभरातील साधारणत: चार महिनेच पाऊस पडतो. या कालावधीत पडणा-या पावसाच्या पाण्यावर संपूर्ण देश अवलंबून असतो. पावसानंतर होणा-या पाणीटंचाईला सामोरं जाताना जमिनीखाली झिरपून साठलेलं पाणी मिळवण्यासाठी कूपनलिका वरदान ठरतात....
13 September, 2011 05:30:00 AM
रुग्णांना दिलासा मिळावा याच एकमेव हेतूने वैद्यकीय संशोधन प्रेरित झालेलं असतं. मानवी शरीरातील विविध रसायनं व त्यामधील परस्पर क्रियांचा संबंध जाणून वैद्यक शास्त्रज्ञ संशोधनाचा आराखडा पक्का करत असतात. आरंभी व्याधीची बाह्य लक्षणं आणि त्यांचं निवारण या पुरतं मर्यादित असलेलं संशोधन आता नॅनो परिणामावर, जनुकीय स्तरावर होत आहे....
13 September, 2011 06:00:00 AM
माणूस स्वत:ला कितीही सामर्थ्यशाली समजत असला तरीही वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींपुढे हतबल ठरतो. या आपत्ती उद्भवण्यामागच्या कारणांची मीमांसा संशोधक करत आहेत....
06 September, 2011 07:55:00 AM
‘देवाघरची लूट.. देवाघरची लूट.. तुम्हा आम्हा सर्वाना एकेक शेपूट..’, प्राण्यांच्या शेपटाविषयीचा असा एक उल्लेख एका गाण्यात आहे. निसर्गातील प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या कारणासाठी शेपटीचा उपयोग होत असतो. तांत्रिक, शारीरिक आणि संपर्क अशा तीन क्षमतांसाठी शेपटीचा वापर केलेला आढळून येतो....
06 September, 2011 07:30:00 AM
मानवी जीवन अधिकाधिक आरामदायी बनवण्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा प्रचंड वापर होतोय. त्यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण होतो आहे. या पार्श्वभूमीवर सूर्याच्या उष्णतेचा वापर करून विकसित झालेली वातानुकूलन यंत्रणा ही एक दिलासादायक गोष्टच म्हणावी लागेल....