23 August, 2011 05:30:00 AM
स्तनपान हे बालकांना मातांकडून मिळणारं एक वरदान आहे. मानवी आरोग्य आणि कुटुंबनियोजनाशी निगडीत तो एक नैसर्गिक स्रेत आहे. स्तनपानाचं धोरण सुव्यवस्थित राबवलं गेलं तर बालमृत्यूंचं प्रमाण घटू शकेल. आया आणि मुलांचं स्वास्थ्य अबाधित राहील. सार्वजनिक आरोग्य बिघडणार नाही. पर्यायाने राष्ट्रीय संपत्ती वाचू शकेल. म्हणूनच ही श्वेत-क्रांती वेगाने होणं निकडीचं आहे.
23 August, 2011 05:30:00 AM
जलचरांचं जीवन ध्वनिसंकेतांवर अवलंबून असतं. मात्र, खोल समुद्रातील मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 30 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये युनेस्को, लष्कर आणि जीववैज्ञानिकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त या समस्येवर एक नजर..
...
16 August, 2011 04:30:00 AM
मेंदूतील वेगवेगळ्या जाणिवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे मन, असं मानणारा संशोधकांचा एक गट आहे तर संपूर्ण मेंदूतील सर्व चेतापेशींच्या एकत्रित कार्यामुळे हे सहावं इंद्रिय निर्माण होतं, असं दुस-या गटाला वाटतं. मनाचा थांग नेमका कुठे, याविषयी संशोधकांत असलेल्या वेगवेगळ्या मतप्रवाहांचा आढावा घेणारा या लेखमालेतील हा शेवटचा लेख....
16 August, 2011 04:30:00 AM
संपूर्णत: मानवी शक्तीवर चालवल्या जाणाऱ्या या सायकल-रिक्षांचं रूपांतर आता ‘सोलेक्षा’ नावाच्या अभिनव वाहनात केलं जात असून, त्यामध्ये मानवी बळासोबतच सौरउर्जेचाही वापर होणार आहे. अनेक सायकल-रिक्षा चालकांना या नवतंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे. शिवाय ती प्रदूषणरहित असल्यामुळे ‘ग्लोबल वॉर्मिग’ कमी होण्यास हातभार लागणार आहे.
...
09 August, 2011 08:00:00 AM
पृथ्वीच्या वातावरणाचं संरक्षक ओझोन-कवचही प्रदूषणामुळे आणि ‘ग्रीनहाउस गॅसेस’मुळे फाटू लागलं असताना, लाख-मोलाचं ऊर्जाकार्य करणारी झाडं हाच आपला आधार आहे .. ‘कार्बन फूटप्रिंट’चं मोजमाप करून त्यानुसार उपाय योजणं आता शक्य आहे.....
09 August, 2011 07:30:00 AM
कवटय़ा फोडून मेंदूचा शोध घेण्याचं जे शास्त्रीय कुतूहल दोन हजार वर्षापूर्वी जागं झालं, ते आता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जिवंत मेंदूच्या प्रतिसादांचा शोध घेण्यापर्यंत पोहोचलं आहे.. मात्र माणसाचं मन असतं कुठे, मनात काहीतरी होतं तेव्हा मेंदूत काय होत असतं, याची स्पष्ट आणि पुरावाजन्य उत्तरं सध्या शोधली जाताहेत.. मनाचा शोध कसकसा पुढे गेला, हे सांगणाऱ्या लेखमालेतला हा दुसरा लेखांक.. ...
02 August, 2011 07:35:00 AM
मन म्हणजे नक्की काय, हा प्रश्न माणसाला संस्कृतीची बाधा झाली तेव्हापासून सतावतो आहे. जवळपास सर्व धर्मग्रंथांमध्ये तत्त्वज्ञांनी या प्रश्नाचा विचार केला आहे. मानवी मनाचा शोध घेण्यासाठी हजारो वर्षापासून चाललेल्या संशोधनाचा आढावा घेणा-या लेखाचा हा पहिला भाग...
02 August, 2011 07:50:00 AM
नायट्रोजन वायू हा जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा घटक आहे. अन्नधान्याचं उत्पादन नायट्रोजनवर अवलंबून असतं. मानवी विकासाच्या संबंधित विविध क्रियांतून, विशेषत: शेतीव्यवसाय आणि खनिज तेलांचा वापर करून ऊर्जा उत्पादन करताना, त्याची होणारी भरमसाठ निर्मिती पर्यावरणाला तसंच मानवी स्वास्थ्याला हानीकारक ठरते. पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. त्यातूनच सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम उभे ठाकतात....
26 July, 2011 07:00:00 AM
कामजीवनाचा हेतू केवळ प्रजनन नसून सहजीवनाची ती एक मूलभूत गरज आहे. फ्राउडने मानवी जीवनातील कामरंगाचं महत्त्व शास्त्रोक्त पद्धतीने उघड केल्यानंतर संशोधक आजवर या विषयाचा बारकाईने मागोवा घेत आहेत. यासंबंधी अलिकडेच पाच देशांत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांतून कामजीवनाचे नवनवे कंगोरे समोर आले आहेत....
26 July, 2011 07:00:00 AM
19व्या शतकात त्रावणकोर आणि शहर परिसात चुंबकीय वेधशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या स्थापन करण्याचं सारं श्रेय त्यावेळचे त्रावणकोरचे महाराज श्रीराम वर्मा (स्वाती थिरूनल) यांना जातं. या ज्ञानी राजाला वैज्ञानिक क्षेत्रात जागतिक स्तरावर होणा-या प्रगतीची जाण होती....