PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय केवळ नावात गोडवा.. ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 15 November, 2011 05:30:00 AM मधुमेहामुळे हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार बळावतात आणि चेतासंस्थेलाही धोका पोहोचू शकतो. या विकारांत देशाला पुरतं उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात सात कोटी 50 लाख मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत, हे गंभीर आहे. आठ अब्ज होण्यापूर्वीच.. ================================================================================ चित्रा नित्सुरे on 08 November, 2011 08:00:00 AM पृथ्वीची लोकसंख्या सात अब्जावर पोहोचल्याने समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ मानवाच्या भवितव्याविषयी विवंचनेत पडले आहेत. काळजीच्या सुरात ते सावधगिरीचा इशारा देत आहेत. त्यांनी प्रश्न सतावतोय की, पृथ्वीवरील मर्यादित साधनसामग्री या अतिप्रचंड जनसमुदायाला पोसू शकेल का? अंतराळातली ट्रॅफिक वाढता वाढता वाढे.. ================================================================================ मधुबन पिंगळे on 08 November, 2011 07:30:00 AM दळणवळण क्षेत्रांमध्ये क्रांती झाल्यानंतर तसंच अवकाश मोहिमांचं तंत्रज्ञान इतर देशांनाही अवगत झाल्यावर अमेरिका-रशियाव्यातिरिक्त चीन, जपान, युरोपीय महासंघ आणि भारतासारख्या देशांनीही अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षामध्ये या देशांच्या अंतराळ महत्त्वाकांक्षा आणि त्यांच्या मोहिमांमध्ये वाढ होत गेल्यामुळे अवकाशातील उपग्रहांची वाढती संख्या आणि कच-याची समस्या निर्माण झाली आहे. भविष्यात अवकाशातील मोहिमांमधून प्रगती साधण्याचा विचार करतानाच, या ट्रॅफिक आणि कच-याच्या समस्येचाही विचार करावा लागणार आहे. साखरेचे खाणार त्याला.. ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 01 November, 2011 05:30:00 AM मधुमेहींना शरीरातील साखरेवर नियमित लक्ष ठेवावं लागतं. सी.जी.एम.द्वारे त्वचेखालील पेशीतून द्रव गोळा करून शर्करा मोजणारी पद्धती त्यासाठी उपकारक ठरणार आहे. भरारी जैव इंधनाची ================================================================================ वैभव शिरवडकर on 01 November, 2011 05:30:00 AM चीनने जैव आणि पारंपरिक इंधनाच्या समसमान मिश्रणाच्या साहाय्यानं बोईंगचं प्रवासी विमान उडवून दाखवलं, ही घटना गेल्याच आठवडय़ातली. या यशस्वी चाचणीमुळे येत्या काही वर्षात पारंपरिक इंधनाऐवजी जैवइंधनाचा वापर करण्याकडे विमान उद्योगाचा कल राहील असं दिसतं. विद्युत, सौर आणि अणुऊर्जेचा वापर हा विमान इंधनाला पर्याय ठरत नसल्यामुळे जैवइंधनाकडे मोठय़ा आशेने पाहिलं जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज ================================================================================ डॉ. आशुतोष मुळ्ये on 25 October, 2011 07:30:00 AM कुतुहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीतील कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून विज्ञानाची प्रगती झाली. पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रूजली नाही. मुलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत सगळ्याच गोष्टी विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. पण या सगळ्या प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, तिचा मात्र अभाव आहे. विश्वविस्ताराच्या संकल्पनेला नोबेल मान्यता ================================================================================ मधुबन पिंगळे on 18 October, 2011 05:00:00 AM विश्वाच्या विस्ताराचा वेग सातत्याने बदलत असतो, असा शोध एडविन हबल या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने 1927 मध्ये लावला होता. या शोधालाच दुजोरा देत 1998 मध्ये विश्वाच्या विस्ताराचा वेग वाढत असल्याचं संशोधन तीन शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केलं होतं. या शास्त्रज्ञांना यंदाचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला असून, यातून विश्वविस्ताराची एडविनची संकल्पनाही अधोरेखित झाली आहे. काळाची गरज ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 18 October, 2011 05:00:00 AM पेट्रोलियम इंधनाची बचत ही काळाचीच गरज आहे. त्यावर पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर हा एक पर्याय आहे. पण त्याच्या अमलबजावणीसाठी ठोस कायदे, सखोल तंत्रशुद्ध संशोधन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन याद्वारे वाजवी खर्चाच्या उपाययोजना राबवाव्या लागतील. ब्रिटिश पेट्रोलियमचा धडा ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 11 October, 2011 08:10:00 AM सुरक्षा हा उद्योगाचा आत्मा असतो; ब्रिटिश पेट्रोलियम या बडय़ा कंपनीला गेल्या वर्षी बसलेल्या हादऱ्यानंतर पुन्हा मूळपदावर येण्यासाठी कराव्या लागलेल्या महत्प्रयत्नानंतर हेच सिद्ध झालं. त्यांचा विसर न व्हावा.. ================================================================================ प्रतिनिधी on 11 October, 2011 07:30:00 AM रसायनशास्त्राचा इतिहास हा मानवसंस्कृतीचा इतिहास आहे. तो घडवण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी योगदान दिलं. ज्या महान शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या माध्यमातून मानवसेवेसाठी आयुष्य समर्पित केलं त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी २०११ ‘आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष’ म्हणून जाहीर केलं गेलं.