PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साय-फाय सौर उर्जा कूल. कूल.. ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 06 September, 2011 07:30:00 AM मानवी जीवन अधिकाधिक आरामदायी बनवण्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा प्रचंड वापर होतोय. त्यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण होतो आहे. या पार्श्वभूमीवर सूर्याच्या उष्णतेचा वापर करून विकसित झालेली वातानुकूलन यंत्रणा ही एक दिलासादायक गोष्टच म्हणावी लागेल. हिसेचं मूळ ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 30 August, 2011 07:55:00 AM आधुनिक मानवाची हिंसक वृत्ती हा आज चिंतेचा विषय आहे. शास्त्रज्ञांना या हिंसक वृत्तीमागचं रहस्य उकलता आल्यास, ते निश्चितपणे समाजासाठी मोठं वरदान ठरू शकेल. कृष्णविवराचं गूढ भेदताना.. ================================================================================ मधुबन पिंगळे on 30 August, 2011 07:30:00 AM कृष्णविवरं हा विज्ञानप्रेमींसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. तारे नष्ट होण्याच्या प्रक्रियेतलं कृष्णविवरांचं गूढ कायम असलं तरी त्यासंबंधी ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना अलिकडेच आढळून आलेल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आणि त्यांनी त्यांची नोंदवलेली निरीक्षणं खगोल संशोधनासाठी मैलाचा दगड ठरू शकतील. नवी ‘श्वेतक्रांती’ ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 23 August, 2011 05:30:00 AM स्तनपान हे बालकांना मातांकडून मिळणारं एक वरदान आहे. मानवी आरोग्य आणि कुटुंबनियोजनाशी निगडीत तो एक नैसर्गिक स्रेत आहे. स्तनपानाचं धोरण सुव्यवस्थित राबवलं गेलं तर बालमृत्यूंचं प्रमाण घटू शकेल. आया आणि मुलांचं स्वास्थ्य अबाधित राहील. सार्वजनिक आरोग्य बिघडणार नाही. पर्यायाने राष्ट्रीय संपत्ती वाचू शकेल. म्हणूनच ही श्वेत-क्रांती वेगाने होणं निकडीचं आहे. जलजीवन विस्कळीत ================================================================================ विलास सावंत on 23 August, 2011 05:30:00 AM जलचरांचं जीवन ध्वनिसंकेतांवर अवलंबून असतं. मात्र, खोल समुद्रातील मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे जीवसृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 30 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये युनेस्को, लष्कर आणि जीववैज्ञानिकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त या समस्येवर एक नजर.. मनाचा थांगपत्ता कुठे? ================================================================================ निरंजन घाटे on 16 August, 2011 04:30:00 AM मेंदूतील वेगवेगळ्या जाणिवांचा एकत्रित आविष्कार म्हणजे मन, असं मानणारा संशोधकांचा एक गट आहे तर संपूर्ण मेंदूतील सर्व चेतापेशींच्या एकत्रित कार्यामुळे हे सहावं इंद्रिय निर्माण होतं, असं दुस-या गटाला वाटतं. मनाचा थांग नेमका कुठे, याविषयी संशोधकांत असलेल्या वेगवेगळ्या मतप्रवाहांचा आढावा घेणारा या लेखमालेतील हा शेवटचा लेख. सौरऊर्जेची कल्पक धाव ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 16 August, 2011 04:30:00 AM संपूर्णत: मानवी शक्तीवर चालवल्या जाणाऱ्या या सायकल-रिक्षांचं रूपांतर आता ‘सोलेक्षा’ नावाच्या अभिनव वाहनात केलं जात असून, त्यामध्ये मानवी बळासोबतच सौरउर्जेचाही वापर होणार आहे. अनेक सायकल-रिक्षा चालकांना या नवतंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे. शिवाय ती प्रदूषणरहित असल्यामुळे ‘ग्लोबल वॉर्मिग’ कमी होण्यास हातभार लागणार आहे. कार्बनच्या पाऊलखुणा ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 09 August, 2011 08:00:00 AM पृथ्वीच्या वातावरणाचं संरक्षक ओझोन-कवचही प्रदूषणामुळे आणि ‘ग्रीनहाउस गॅसेस’मुळे फाटू लागलं असताना, लाख-मोलाचं ऊर्जाकार्य करणारी झाडं हाच आपला आधार आहे .. ‘कार्बन फूटप्रिंट’चं मोजमाप करून त्यानुसार उपाय योजणं आता शक्य आहे.. मनाचं घर मेंदूतच! ================================================================================ निरंजन घाटे on 09 August, 2011 07:30:00 AM कवटय़ा फोडून मेंदूचा शोध घेण्याचं जे शास्त्रीय कुतूहल दोन हजार वर्षापूर्वी जागं झालं, ते आता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जिवंत मेंदूच्या प्रतिसादांचा शोध घेण्यापर्यंत पोहोचलं आहे.. मात्र माणसाचं मन असतं कुठे, मनात काहीतरी होतं तेव्हा मेंदूत काय होत असतं, याची स्पष्ट आणि पुरावाजन्य उत्तरं सध्या शोधली जाताहेत.. मनाचा शोध कसकसा पुढे गेला, हे सांगणाऱ्या लेखमालेतला हा दुसरा लेखांक.. शोध मनाचा ================================================================================ निरंजन घाटे on 02 August, 2011 07:35:00 AM मन म्हणजे नक्की काय, हा प्रश्न माणसाला संस्कृतीची बाधा झाली तेव्हापासून सतावतो आहे. जवळपास सर्व धर्मग्रंथांमध्ये तत्त्वज्ञांनी या प्रश्नाचा विचार केला आहे. मानवी मनाचा शोध घेण्यासाठी हजारो वर्षापासून चाललेल्या संशोधनाचा आढावा घेणा-या लेखाचा हा पहिला भाग