PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: श्रद्धा-संस्कृती परिसस्पर्श ================================================================================ डॉ. गोपालकृष्ण शेणॉई on 16 May, 2012 06:10:00 AM महापुरुष म्हणजे दयेची अभिव्यक्ती. ते प्रत्येक भक्ताला त्याच्या गुणवैशिष्टय़ांसकट स्वीकारतात. त्याच्यात आमूलाग्र बदल घडवतात. थोडक्यात परिसाच्या सान्निध्यात लोखंड आल्यावर त्याचं सोनं होतं. तेच महापुरुषांच्या सहवासाने होतं. बाबा नित्यानंद आणि स्वामी समर्थही याला अपवाद नाहीत. त्यांनी चुकीच्या मार्गावर चालेल्या दोघींना योग्य वळणावर आणून त्यांचा उद्धार केला. अहंकार तोडी मना.. ================================================================================ प्रहार on 16 May, 2012 05:55:00 AM अहंकार माणसाला पोखरतो. त्याचा -हास करतो. व्यक्तीच्या प्रगतीमध्ये हाच अहंकार कोलदांडा ठरू शकतो. संतांनी भल्याभल्यांचे अहंकार तोडले. समर्थ रामदासांनी अहंकरी गृहिणीचं गर्वहरण कसं केलं, त्याची ही गोष्ट. आदिशक्ती मुक्ताबाई ================================================================================ शामसुंदर सोन्नर on 16 May, 2012 05:50:00 AM गूढगंभीर ज्ञान ज्योतीचा आविष्कार म्हणजे मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण इतकीच त्यांची ओळख नाही, तर चांगदेवांसारख्या योग्याला, तपस्वीलासुद्धा त्यांनी अहंकारमुक्त करून ज्ञानदृष्टी दिली. यावरून मुक्ताबाईंची योग्यता स्पष्ट होते. ज्ञानाला ज्ञान सांगणा-या मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमीला, 15 मे रोजी, मंगळवारी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा मागोवा. श्रीदेव पूर्वस ================================================================================ किशोर राणे on 16 May, 2012 05:40:00 AM प्रत्येक मंदिरात देवाची मूर्ती निश्चित असते. पण पाठीला पाठ लावून उभा असणारा देव माळगावात पाहायला मिळतो. या देवाचं नाव आहे पूर्वस. देवाच्या मूर्तीच्या एका हातात तलवार आणि दुस-या हातात ढाल आहे. मुद्रा प्रसन्न आहे. कपाळावर चिंतेच्या रेषाच नाहीत. उजवा पाय किं चित पुढे टाकत, कुठल्याही विघ्नाशी आपण दोन हात करण्यास सदैव तत्पर असल्याच्या आविर्भावात तो उभा आहे. भवानी वाघजाई माता ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 May, 2012 08:15:00 AM तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिराव्यतिरिक्त कोकणात टेरव इथेही भवानीमातेचं मंदिर आहे. या देवीचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार 8 मे 2012 रोजी उत्साहात पार पडला. संकट विमोचक, भक्तांच्या हाकेला धावून येणारी, नवसाला पावणारी असा लौकिक असणा-या या देवीच्या वर्धापनदिन सोहळय़ाला हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. चोख भक्तीचा मळा ================================================================================ श्यामसुंदर सोन्नर on 09 May, 2012 07:55:00 AM खालच्या समाजात जन्म घेऊनही चोखामेळा यांनी आपल्या शुद्ध भक्तीची दवंडी पिटवली. स्वत: आत्मशुद्धीचा मार्ग स्वीकारलेला असतानाच इतरांनीही उच्च-नीच असल्या भेदाभेदाच्या भ्रमातून मुक्त व्हावं, अशी शिकवण दिली. जातीव्यवस्थेच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावणारे चोखामेळा यांची पुण्यतिथी उद्या गुरुवारी वैशाख वद्य पंचमीला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या शुद्ध, सात्विक विचारांचा घेतलेला धांडोळा.. तुझ्या पाठीशी आहे.. ================================================================================ डॉ. गोपालकृष्ण शेणॉई on 09 May, 2012 07:30:00 AM बिकट वेळी संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला कुणी धावून आलं, तर म्हटलं जातं देवासारखा धावून आलास. मात्र, संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीला देवानं धावून येणं, याचे अनेक दाखले पौराणिक वाङ्मयात वाचायला मिळतात. नित्यानंद बाबा आणि स्वामी समर्थ तर अनेकदा यायचे. तसंच स्वामींचं तर बोधवाक्यच आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्यानंद बाबांचं वर्तनही या वाक्याला साजेसं आहे. हवा एकच मार्गदर्शक ================================================================================ डॉ. गोपालकृष्ण शेणॉय on 02 May, 2012 07:40:00 AM गुरू घेऊनही शंकर, गणपती, दुर्गा, पार्वती यांसारख्या देवीदेवतांची पूजा करणारे भाविक आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. एकापेक्षा जास्त देवांची भक्ती केल्याने परमेश्वरकृपा लवकर लाभते, अशी या भक्तांची समजूत असते. मात्र प्रत्यक्षात असं करणं म्हणजे भगवंतकृपेसाठी केलेली दिशाहीन भटकंती आहे. एका देवावर श्रद्धा ठेवण्याचं महत्त्व श्री स्वामी समर्थ आणि नित्यानंद बाबा यांनी सांगितलं आहे. एकाग्रतेचं महत्त्व ================================================================================ प्रहार on 02 May, 2012 07:20:00 AM एकाग्रतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी ‘अर्जुन आणि त्याने केलेल्या मत्स्यभेद’ या पौराणिक गोष्टीचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. मात्र इतिहासातील स्वामी विवेकानंदांची एकाग्रतेची गोष्ट तेवढीच बोधप्रद आहे. स्मरण तुकडोजी महाराजांचं ================================================================================ प्रहार on 02 May, 2012 07:10:00 AM ‘राष्ट्रसंत’ ही पदवी मिळालेल्या तुकडोजी महाराजांची 109वी जयंती परवा 30 एप्रिल 2012 रोजी संपूर्ण महाराष्ट्राने साजरी केली. अंधश्रद्धा, जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. ‘ग्रामगीता’ या काव्यातून त्यांनी आत्मसंयमनाचे विचार मांडले. स्त्रीपुरुष समानता, महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या तुकडोजी महाराजांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत..